नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शहरातील शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलकांवर दहशत दाखवण्याच्या उद्देशाने एका युवकाने हवेत दोन गोळ्या झाडल्या. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही पण जामियातील विद्यार्थ्यांवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर ही घटना घडल्यामुळे दिल्लीत तणाव पसरला आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली.
हवेत गोळी झाडणाऱ्याचे कपिल गुज्जर असून तो पूर्व दिल्लीतील दल्लूपुरा गावात राहणारा आहे. त्याने गोळ्या झाडताना ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या आणि या देशात कोणाचेही नाही पण केवळ हिंदुंचेच चालेल, अशा तो धमक्या देत होता. त्याच्याकडे सेमी ऑटोमेटिक पिस्तुल होती. हवेत दोन गोळ्या झाडल्यानंतर नागरिक सैरावैरा पळायला लागले. त्यावेळी त्याचे पिस्तुल लॉक झाल्याने त्याला पकडण्यासाठी नागरिकांसह पोलिस धावले. या दरम्यान कपिल गुर्जरने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने आपले पिस्तुल झाडीत फेकूनही दिले. पण पोलिस त्याच्या नजीक असल्याने त्याला लगेच पकडण्यात आले.
मूळ बातमी
COMMENTS