नागरिकत्व कायद्याला विरोध: प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहांना अटक

नागरिकत्व कायद्याला विरोध: प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहांना अटक

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आज देशभर निदर्शने होत आहेत.

पुणे पोलिसांचा भयंकर अनुभव
भारतीय मुसलमान त्यांचा नागरिकत्वाचा हक्क बजावत आहेत
मोदीच शहांना खोडून काढत आहेत – विरोधकांची टीका

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शने करत असलेल्या प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना बेंगलुरु पोलिसांनी अटक केली आहे.

एनडीटीवीवरील बातमीनुसार, गुहा यांच्या व्यतिरिक्त अन्य ३० लोकांनाही अटक करण्यात आली आहे. हे लोक बेंगलुरू येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने करत होते. गुहा हे मुलाखत देत असताना पोलिसांनी जबरदस्तीने त्यांना अटक केली आणि बसमध्ये ओढत घेऊन गेले.

६१ वर्षीय गुहा हे शहरातील टाऊन हॉल येथे निदर्शनांमध्ये सहभागी होते, जिथे १४४ कलम लागू करण्यात आले होते.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0