निर्मिती संस्थांना मूळ भाड्याच्या ४० टक्क्यांपर्यंत सवलत

निर्मिती संस्थांना मूळ भाड्याच्या ४० टक्क्यांपर्यंत सवलत

मुंबई: कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरक्षिततेच्या कारणास्तव लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात वेगवेगळ्या माध्यमांतील चित्रीकरण बंद असल्याने

साधेपणासह जगलेला उत्तुंग विचारवड
नटसम्राट कालवश
डॉक्टर आणि मी – एकत्र आलेल्या समांतर रेषा

मुंबई: कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरक्षिततेच्या कारणास्तव लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात वेगवेगळ्या माध्यमांतील चित्रीकरण बंद असल्याने निर्मिती संस्थांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे निर्मिती संस्थांना चित्रीकरण स्थळाच्या आणि दीर्घ मुदतवाढ तत्वावरील संस्थांच्या भाड्यात १५ एप्रिल २०२१ ते ६ जून २०२१ या कालावधीकरीता सवलत देण्यात येणार असून ही सवलत मूळ निर्धारीत भाड्याच्या ४० टक्क्यांपर्यंत असेल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची १५८ वी बैठक ऑनलाईन पद्धतीने मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे आणि सह व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे तसेच महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.              ​

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: