‘नेताजींच्या मृत्यूच्या चौकशीसाठी एसआयटी हवी’

‘नेताजींच्या मृत्यूच्या चौकशीसाठी एसआयटी हवी’

कोलकाता : गेल्या रविवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथीला प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने श्रद्धांजली वाहणारे ट्विट केल्यानंतर बोस यांचे खापर पणतू

कठुआ बलात्कार : ६ पोलिसांवर गुन्हे
लखीमपूर हत्याकांडः सुनियोजित कट, एसआयटीचा दावा
भाजप नेते चिन्मयानंद यांना अटक

कोलकाता : गेल्या रविवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथीला प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने श्रद्धांजली वाहणारे ट्विट केल्यानंतर बोस यांचे खापर पणतू व प. बंगाल भाजपचे उपाध्यक्ष चंद्रकुमार बोस यांनी नेताजींच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर नेताजींच्या कुटुंबियातील काही सदस्यांनी जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्याशी मोदी यांनी चर्चा करून जपान सरकारकडे नेताजींच्या मृत्यूसंबंधी ज्या फायली आहेत त्या डिक्लासिफाइड कराव्यात तसेच टोकयो येथील रेंकोजी मंदिरात नेताजी बोस यांच्या अवशेषाची डीएनए चाचणी करावी अशीही मागणी केली आहे.

गेल्या रविवारी नेताजींच्या पुण्यतिथी निमित्त प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने हे “#PIB remembers the great freedom fighter Netaji Subhash Chandra Bose on his death anniversary. #Netaji #subhashchandrabose.” असे ट्विट केले होते. त्यावर चंद्रकुमार बोस यांनी पीआयबीवर निशाणा साधत नेताजी बोस यांच्या मृत्यूबद्दल कोणतेच ठोस पुरावे नसताना पीआयबीने त्यांना श्रद्धांजली कशी वाहिली असा सवाल केला. नेताजींच्या मृत्यूबाबत ठोस व परिपूर्ण अशी माहिती मिळाल्यास व ती पंतप्रधानांनीच जाहीर केल्यास या विषयास कायमचा विराम मिळतो. त्यावेळी नेताजींना श्रद्धांजली वाहण्यास वावगे नाही असे बोस यांनी म्हटले आहे. चंद्रकुमार बोस यांनी स्वत: ट्विट करून पीआयबीने नेताजींना वाहिलेली श्रद्धांजली मागे घ्यावी अशी मागणी केली आहे.

नेताजी बोस यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी चौकशी व्हावी व सत्य बाहेर यावे म्हणून प्रयत्नशील आहेत पण एकूण सरकार याबाबत किती संवेदनशील आहे हा प्रश्नच आहे, असे चंद्रकुमार बोस यांनी म्हटले आहे.

चंद्रकुमार बोस यांनी एसआयटी पथक कसे असावे याच्याही सूचना सरकारला केल्या आहेत. एसआयटी पथकात केंद्रीय गुप्तहेर खाते, गृहखाते यांच्यातील वरिष्ठ अधिकारी असावेत. शिवाय नेताजींच्या कार्याचे अभ्यास करणारे इतिहासकार, फोरेन्सिक एक्स्पर्ट व नेताजींचे कुटुंबीय असावेत, अशा सूचना केल्या आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0