युतीचे कपडे फाटले

युतीचे कपडे फाटले

सरकार स्थापन न झाल्याची जबाबदारी आज देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टाकली, तर उद्धव ठाकरे यांनी अमित शहा आणि कंपनी सेनेला खोटे ठरवत असल्याचा आरोप केला. सेना आणि भाजपने आज संध्याकाळी एकमेकांचे अक्षरशः कपडे फाडले.

सातपुड्यात सुरू आहे वाचण्या-वाचवण्याचा संघर्ष !
गृहखात्यानेच अमित शहा यांचा ‘बॉम्ब’चा दावा फेटाळला
उत्तराखंडातील मंत्र्याची शंकरावर जलाभिषेक करण्याची खात्याला सक्ती

आज संध्याकाळी भाजप आणि शिवसेनेने एकमेकांची अक्षरशः लाज काढली. भाजपने शिवसेनेने चर्चा थांबविल्याचा आरोप केला, तर भाजप सत्तेला चिकटून असल्याचा आणि अमित शहा आणि कंपनी सेनेला खोटे ठरवीत असल्याचा आरोप सेनेने आरोप केला.

शिवसेनेने आमच्याबरोबर चर्चाच करायची नाही अशी भूमिका घेतल्याचा आरोप महाराष्ट्राचे मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यपालांकडे जाऊन आल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तर आम्हाला खोटे ठरविणाऱ्या लोकांशी चर्चा कशी करणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

ते म्हणाले, “संवादाची आमची भूमिका पहिल्यापासूनच होती, पण शिवसेनेने आमच्याऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर चर्चा करण्याची भूमिका ठेवली. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्यांच्याबरोबर चर्चा करायला दररोज वेळ होता, पण आमच्याबरोबर चर्चा करायला शिवसेनेला वेळ नव्हता.”

उद्धव ठाकरे म्हणाले, की आमच्यावर फडणवीस काय पाळत ठेवत होते का?

फडणवीस म्हणाले, की राज्याला सरकार मिळावे, यासाठी जे करायचे ते आम्ही करू. आमदार फोडण्याचे जे आरोप झाले, त्याचे पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी. आम्ही कोणत्याही प्रकरचे फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. मात्र यापुढे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालीच सरकार बनेल, असे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, की अशा आजबाजूच्या लोकांमुळे दरी वाढण्याचे काम होते पण सरकार बनत नाही. ते जे बोलतात, त्याला उत्तर देण्याची क्षमता आमच्याकडे आहे, पण आम्ही ते करणार नाही.

५० – ५० टक्क्यांच्या सुत्रांबाबत ते म्हणाले, की अडीच वर्षाचा मुख्यमंत्री अशी चर्चा माझ्यासमोर तरी झाली नाही. अमित शहा यांनासुद्धा विचारले, पण असे काही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांच्यावर भयानक शब्दात शिवसेनेकडून टीका करण्यात आली, जे आम्हाला मान्य नाही. अशी टीका होत राहिली,तर टीका करणाऱ्यांबरोबर सरकार कशाला चालवायचे, अशी आमचीही भूमिका आहे.

शेतकऱ्यांबाबत अधिक चांगले निर्णय घेऊ शकलो असतो, पण युतीमध्ये असल्याने काही अधिक करू शकलो नाही, असे फडणवीस म्हणाले.

चुकीच्या माणसांबरोबर उगाचच गेलो, असे म्हणत आज उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड झाल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केले.

भाजपने खोटे बोलू नये, असा आरोप करीत अच्चे दिन, नोटबंदीसह भाजपच्या सगळ्या प्रकरणांवर उद्धव ठाकरे यांनी टीका करीत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. भाजप सत्तेसाठी देशभरात कसे चाळे करीत आहे, हे आम्हाला माहीत असल्याचे ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी हरियानाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांचे नरेंद्र मोदी यांच्याविषयीचे पूर्वीचे वक्तव्य दाखवणारी चित्र फीतच सादर केली.

भाजपने लवकरात लवकर सरकार स्थापनेचा दावा सादर करावा, म्हणजे आम्हाला इतर मार्ग उपलब्ध असतील, असे ठाकरे म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0