नवी दिल्ली : जामिया मिलिया विद्यापीठाच्या परिसरात वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर एका व्यक्तीने बुधवारी दुपारी १ वाजू
नवी दिल्ली : जामिया मिलिया विद्यापीठाच्या परिसरात वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर एका व्यक्तीने बुधवारी दुपारी १ वाजून ४० मिनिटाच्या आसपास आपल्या बंदुकीतून गोळी झाडली. यात जामियातील एक विद्यार्थी शादाब जखमी झाला.त्याच्या हातावर गोळी लागली असून त्याला होली फॅमिली इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. गोळी मारणाऱ्याचे नाव गोपाल असून तो आंदोलकांना ‘ये लो आझादी’ असे धमकावत पिस्तुल दाखवत होता.पोलिसांनी गोपालला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
या घटनेच्या फोटोत व व्हीडिओत गोपाल आंदोलकांच्या दिशेने पिस्तुल रोखून त्यांना धमकावत होता तर त्याच्यामागे पोलिस उभे असल्याचे दिसून येत आहे.
गोळीबार करणाऱ्या युवकाच्या फेसबुक प्रोफाइलवर त्याचे नाव ‘रामभक्त गोपाल’ असून तो या घटनेचे थेटप्रक्षेपण फेसबुकवरून करण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्या फेसबुकवरच्या काही पोस्टवरून तो हिंसा करण्याच्या तयारीत असल्याचेही दिसून येत होते.
COMMENTS