नवी दिल्ली : २०१०-१२च्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकदाही संरक्षण क्षेत्रावरील खर्चाचा मुद्दा मांडला नाही पण संरक
नवी दिल्ली : २०१०-१२च्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकदाही संरक्षण क्षेत्रावरील खर्चाचा मुद्दा मांडला नाही पण संरक्षणावर गेल्या वित्तीय वर्षापेक्षा ६ टक्के खर्च वाढवला असून ही रक्कम ३,३७,५५३ कोटी रु. इतकी झाली आहे. या रकमेव्यतिरिक्त १,३३,८२५ कोटी रु. पेन्शनसाठी राखीव असून ती एकूण जीडीपीच्या १.५ टक्के आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रावरील एकूण खर्च ४७१,३७८ कोटी रु. इतका झाला आहे. हा खर्च अन्य क्षेत्रांशी तुलना करता सर्वाधिक आहे.
या अर्थसंकल्पात केवळ चार क्षेत्रे अशी आहेत की, ज्यावर एक लाख कोटी रु.पेक्षा अधिक तरतूद केली आहे, त्यात ग्रामीण विकास (१.२२ लाख कोटी रु.), ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरण (१.२४ लाख कोटी रु.), कृषी व शेतकरी कल्याण (१.४२ लाख कोटी रु.) व गृहखाते (१.६७ लाख कोटी रु.) यांचा समावेश आहे.
मूळ बातमी
COMMENTS