सत्य हीच महान साहित्यिकांची जीवनप्रेरणा

सत्य हीच महान साहित्यिकांची जीवनप्रेरणा

उस्मानाबाद येथे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे पूर्ण अध्यक्षीय भाषण आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

वृत्तपत्रांच्या संपादकीयांमध्ये दिल्ली पोलिसांचा निषेध
मुंबईतील रुग्णालये, कोविड केंद्रांच्या ऑडिटच्या सूचना
लँडमार्क माइलस्टोन – अमिताभ बच्चन

नमस्कार!

९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. श्री. नितीन तावडे, उद्घाटक ज्येष्ठ कविवर्य ना. धों. महानोर, ९२व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा ढेरे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठालेपाटील, साहित्य महामंडळाचे कार्यवाह श्री. दादासाहेब गोरे, अन्य मान्यवर आणि माझ्या प्रिय रसिक मित्रांनो, साहित्य महामंडळ गेल्या वर्षापासून अनेक धाडसी आणि स्वागतार्ह निर्णय घेत आहे. उदा. अध्यक्षांची निवड महामंडळ सर्व घटक साहित्य संस्थाच्या अनुमतीने करत आहे. त्याच्या पहिल्या मानकरी होत्या श्रीमती अरुणा ढेरे. नव्या पद्धतीने झालेल्या निवडीचे सर्वत्र स्वागत झाले. माझ्या ध्यानीमनी आणि स्वप्नीदेखील नसताना ह्यावर्षी तो मान माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाला मिळालेला आहे. त्याचाप्रथमत: आनंद झाला, परंतु जबाबदारीचे भान येताच मनावर दडपण आले. अ. भा. म. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे पवित्र आहे. ह्या व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची पात्रता माझ्यामध्ये आहे का? असा

प्रश्न मी स्वत:ला विचारीत राहिलो. निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातूनआणि महाराष्ट्राबाहेरूनही मला अभिनंदनाचे फोन आले, पत्रे आली आणि अजूनही येत आहेत. राकट देशा, दगडांच्या देशाअसे

महाराष्ट्राबद्दल बोलले जाते. मला मात्र आता वेगळाच अनुभव आला; प्रेमळ देशा, साहित्यप्रेमी देशा, माझ्या महाराष्ट्र देशा.मी खरोखर भारावून गेलो आहे. हे माझ्याकरता आयुष्यभर पुरेल इतके पाथेय आहे.

माझी निवड झालेल्या दिवसापासून तालुक्याच्या सर्व घटकांमधून रसिक आणि सामान्यजन अभिनंदनासाठी धावले. शाली आणि पुष्पगुच्छ ह्यांचा खच पडला.

उस्मानाबाद हा दुष्काळी जिल्हा आहे, याची माहिती मला आहे. पुष्पगुच्छ आणि शाली ह्यांच्याऐवजी उस्मानाबाद येथील पीडित कुटुंबासाठीनिधी गोळा केला, तर अधिक उचित होईल, असे मी सुचवले.

वसईतील प्रबोधन प्रतिष्ठानने ती कल्पना उचलून धरली. तालुक्यातीलअनेक संस्थांनी आणि सामान्य नागरिकांनी वेदना जाणवाया, जागवूसंवेदना’, ह्या भावनेने प्रेरित होऊन आमच्या आवाहनाला उत्स्फूर्त

प्रतिसाद दिला. त्यापैकी काहीजण शेतकरी आहेत. त्यांच्यापैकी अनेकजणह्या संमेलनासाठीही हजर आहेत.

 

प्रिय उस्मानाबादकरांनो, ‘उस्मानह्या अरेबिक शब्दाचा एक अर्थ आहे – लार्क पक्षाचे पिल्लू’, दुसरा अर्थ खास निवड झालेला असा आहे. यावर्षी तुम्हा उस्मानाबादकरांची महामंडळाने खास निवड केली आहे. तुमची मने आकाशाएवढी मोठी अन् पक्ष्यासारखी निरागस आहेत. शासनाचे अनुदान पुरेसे नाही, ह्याची तुम्हांला जाणीव होती; तरी तुम्ही महामंंडळाच्या निर्णयााचे आनदांने स्वागत केले आणि गावागावांतून निधी गोळा केला. अजूनही आपल्याला काही अपुरे पडत असेल तर, तुमची गरज भागवण्यास महाराष्ट्र सरकार पुढे येईल, याची मला खात्री आहे. गरिबीमुळे किंवा कर्जाच्या ओझ्यामुळे येथील काही शेतकऱ्यांना दुर्दैवी निर्णय घ्यावे लागले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खामध्ये मी सहभागी आहे. फडणवीस सरकारने २०१५ साली नेमलेल्या समितीने ह्या जिल्ह्याला ४५० एमएलडी पाणी पुरवण्याची शिफारस केलेली आहे. माझी नव्या सरकारला खास विनंती आहे, आपण अग्रक्रमाने उस्मानाबादची गरज लवकरात लवकर पुरी करावी.

मराठवाडा ही संतांची भूमी. इथल्या मातीचा प्रत्येक कण आणि कण संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेला आहे. उस्मानाबाद हा जिल्हा कृष्णा आणि गोदावरी ह्या दोन्ही नद्यांनी सुपीक बनवला आहे. जिल्ह्याचा इतिहास सातव्या शतकापर्यंत मागे जातो. ह्या जिल्ह्याचा भाग असलेले शहर लातूरहे राष्ट्रकूट राजांची जन्मभूमी! ऐतिहासिक आणि ज्ञात कालखंडाचा विचार करता मौर्य काळात उस्मानाबाद जिल्ह्याचा परिसर सम्राट अशोकांच्या आधिपत्याखाली होता. सातवाहन राजांनी इ.स.पूर्व २४० ते इ.स.२६० अशी जवळपास साडेचारशे ते पाचशे वर्ष येथे प्रदीर्घ राज्य केले. १९०५ सालीलोकमान्य टिळकांनी शहराला भेट देऊन इथे वाचनालयाची स्थापना केली आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन दिले. १९४१ साली भारतरत्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी जिल्ह्याला भेट देऊन शिकण्याचा आणि संघर्ष करण्याचा संदेश दिला. उस्मानाबादच्या पदरी असे कितीतरी पुण्य आहे.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्रातील जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. महाराष्ट्र ही संतांची भूमी.संत गोरा कुंभार ह्यांच्या वास्तव्याने मराठवाड्याची ही भूमी पावन झाली आहे. समाजातल्या सर्व स्तरांतील संतांनी महाराष्ट्रात आध्यात्मिक लोकशाहीचा पाया घातलेला आहे. जीवनमुक्त होणे । हे त्यांचे जीवितध्येय होते. म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे जग हे करणे शहाणे बापा।। आपणा सर्वांना साहित्याच्या मार्गाने शहाणे करण्याची प्रतिज्ञा गोरोबांनी केलेली आहे. त्यांच्या

कृपाछायेखाली हा तीन दिवसांचा ज्ञानसोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्व संतांकडून आपण ९३व्या अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलनासाठी आशीर्वाद मागू या.

वसईतील एका अशिक्षित, परंतु सुसंस्कृत शेतकरी कुटुामध्ये माझा जन्म झाला. मराठी माध्यमाच्या शाळेत माझे शिक्षण झाले. फादर थॉमस स्टीफन्स ह्यांनी खिस्तपुराणह्या महाकाव्यात म्हटलेले आहे.

‘‘म्हणोनि आमीं तुमी सर्व जनीं ।

बंदुवर्ग ऐसे मानावे मनीं ।

फ्रिंग्री हिंदु आदीं करुनि ।

येकमेकांचे बंदु ।’’ (भाग १-३ ओवी ६४)

अशा प्रकारे सर्वधर्म मैत्रीच्या वातावरणात मी मोठा झालो. पुढे रेव्हरंड नारायण वामन टिळक हे तुका नामक सेतूवरुनी खिस्तचरणी आले आणि महाराष्ट्रातील खिस्ती समाजाला त्यांनी भजने आणि भक्तिगीते शिकवली. त्यांचे एक भजन मला आठवते. खिस्त गुरुमाऊली गं माय माझी खिस्त गुरु माऊली । टिळकांनी आम्हांला परमेश्वराला गुरु माऊलीम्हणायला शिकवले. लक्ष्मीबाई टिळकांनी त्यांच्या स्मृतिचित्रेया आत्मचरित्राद्वारे प्रभू खिस्ताचे कसे अभ्यासपूर्ण अनुकरण करावे, हे आम्हांला दाखवून दिले. त्यांचा खिस्ताकडचा प्रवास पाहून माझी श्रद्धा दृढ झाली. कॅथॉलिक परंपरेतील रेव्हरंड फादर जे. एस. मिरांडा, बिशप डॉमनिक डिआब्रियो ह्यांनी

आम्हांला कॅथॉलिक नियतकालिकांद्वारे मराठी भाषेची गोडी लावली. खिस्ती साहित्याचा हा चार दशकांचा वारसा आमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. त्या सर्वांचे ऋण शब्दांच्या पलीकडचे आहे. पुढे मला माझ्या अभ्यासात संत साहित्याची ओळख झाली. माझा आध्यात्मिक पिंड घडवण्यात संत साहित्याचे आणि सर्व धर्मग्रंथांचे फार मोठे योगदान आहे. माझे एक बोट प्रभू येशूच्या हातात असले, तरी दुसरे बोट आपल्या संतांच्या हातात आहे.

००००

१. साहित्याचे प्रयोजन

सह नेते ते साहित्य’, अशी साहित्याची एक व्याख्या केली जाते.समाजाला सत्याचे भान देऊन भविष्याचे वेध घेण्याची दृष्टी देणारा एक संस्कार म्हणजे सााहf त्य. आज येथे संपूर्ण महाराष्ट्रातून आणि बृहन्महाराष्ट्रातून आपण सर्व हजारोंच्या संख्येने एकत्र जमलो आहोत. साहित्यावरील प्रेमाने आपणा सर्व साहित्यभक्तांना आपल्याला इथे एकत्र आणले आहे. हीसाहित्यनिष्ठांची मांदियाळी आहे. या तीन दिवसांत विचारांचे आदान-प्रदानहोईल; आपल्या एकमेकांच्या गाठी-भेठी होतील, ग्रंथांचा सहवास विचारांचेधन लाभेल ही फार मोठी कमाई आहे.

मित्रांनो, मानवी जीवन हे गूढ आणि रहस्यमय आहे. आपल्याजीवनाला अनेक पदर आहेत. त्यांपैकी साहित्य हा एक पदर आहे. मानवी जीवनातील गूढ जाणून घेण्याची माणसाला सतत उत्सुकता लागलेली असते. माणसाच्या मनात विचारांचे आणि भावनांचे सतत कल्लोळ उठत असतात. आपल्या विचारांना आणि भावनांना एखादा साहित्यिक शब्दरूप कसे देतो? कवयित्री संजीवनी मराठे आपल्या एका कवितेत म्हणतात, ‘मी न सांगायची कुणाला, कविता स्फुरते कशी?’ कवीला कविता, लेखकाला कथा, कादंबरी, निसर्गलेखन कसे

काय साधते? त्याच्या मनात विचारा घुसळण सतत चालत असते आणि कळीला जसे उमलून यावेसे वाटते, तसे एक दिवस लेखकाला लिहावेसे वाटते. कळीला जसे उमलण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही, तसेच लेखकाला व्यक्त होण्यास कुणी प्रतिबंध करू शकत नाही. ही चिंतनशीलता अबोध मनाचा ताबा घेते आणि एक दिवस ती शब्दांच्या रूपाने प्रकट होते. ह्या लेखनप्रक्रियेची तुलना एखाद्या गर्भवती स्त्रीबरोबर करता येईल. जेव्हा तिला जाणवते की, तिच्या उदरात अंकुर फुलतो आहे, तेव्हा तीही फुलते आणि तो आनंद व्यक्त केल्याशिवाय तिला राहावत नाही. चंद्र जसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला पूर्णबिंब साकारते, त्याचप्रमाणे ती नऊ महिन्यांच्या खडतर प्रवासात अनेक अनुभवांच्या दिव्यातून जाते. तिचे लक्ष त्यादिवसाकडे लागलेले असते. जेव्हा बाळ आतून ढुशा मारू लागते,तेव्हा बाळ सांगते की, ‘माझी यायची वेळ जवळ आली आहेआणि एकदिवस दिव्य घडते, त्यासाठी तिला जीवघेण्या वेणांची किंमत मोजावीलागते. बाळ जन्मल्यावर मात्र सृजनाचा तो चमत्कार पाहून ती प्रसूतीचे दु:ख हरवून बसते. ती त्याच्यामध्ये गुंतत जाते. लेखनाचा प्रवासही काहीसा असाच असतो. विचाराचे एखादे बीज कवी-लेखकाच्या अंतर्मनात पडते. कधी ते त्याच्या अबोध मनात जाते. दरम्यान लेखक अनेक प्रकारच्या अनुभवातून जात असतो. ते बीज मात्र आतून काहीतरी सांगत असते. काही प्रकारांचे बी मातीत पेरले की, दिवसा-दोन दिवसांत सशाच्या डोळ्यांनी लुकलुक पाहू लागते. पहिल्या

पावसामध्ये हा अनुभव येतो. चैत्रामध्ये भाजून निघालेली भूमी पहिल्यापावसानंतर अचानक बिजांकुरित होते. आफ्रिकेमध्ये मात्र काही वृक्ष असेआहेत की, त्यांची बीजे मातीत पडल्यानंतर खूप वर्षांनंतर त्यांना कोंब

फुटतात. लेखकाचे असेच असते. कधी त्याची चिंतनशीलता मनाच्यागाभाऱ्यामध्ये काही दिवस, काही महिने, कधीकधी काही वर्षेही दडून बसतेआणि मगच ती शब्दरूप घेते.

साहिात्यिकाच्या ह्या सृजनशीलता आपण प्रतिभाम्हणता.े प्रतिभा,प्रतिभा म्हणजे काय? एका थेंबातून निर्झराचा प्रवास सुरू होऊन पुढे अनेकनिर्झर त्याला मिळत जातात, तो विस्तारत जातो. झाडाझुडपांतून,

खाचखळग्यांतून, कधी उंचावरून, कधी सपाटीवरून तो बहरतच जातो आणि मग एक दिवस हा महाप्रपात एखाद्या कड्यावरून उसळतो, कोसळतो आणि साऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. त्याला आपण धबधबा म्हणतो. प्रतिभेचा खडतर प्रवास असाच काहीसा असतो. लेखक जेव्हा लिहायला बसतो, तेव्हा त्याची अंतर्दृष्टी जागृत होते आणि मनाच्या कोषात साठवलेले सगळे अनुभव कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललित लेख ह्यांच्या रूपाने कागदावर उतरतात. साहित्यिकाचे अनुभवविश्व जितके व्यापक, त्याची चिंतनशीलता जितकी सखोल, त्याची कल्पनाशक्ती जितकी प्रत्ययकारी आणि त्याची अंतर्दृष्टी जितकी जागृत, त्या प्रमाणात त्याच्या साहित्याची गुणवत्ता ठरत असते आणि ते अभिजात पदाला पोहोचते. उदा. जॉन स्टाइनबर्ग ह्यांची द ग्रेप्स् ऑफ रॉथही कादंबरी. तीसच्या दशकातील मंदीच्या काळामध्ये अमेरिकेत अनेकांची अन्नान्न दशा झाली. काम मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरे होऊ लागली. ओक्लोहोमा ह्या विभागातून बेकारांचे तांडेच्या तांडे कॅलिफोर्नियाच्या दिशेने निघाले. अनेकांनी हे तांडे जाताना पाहिले, मात्र जॉन स्टाइनबर्ग ह्यांना त्यांची होणारी होरपळ, त्यांना होत असलेल्या यातना, ते उपसत असलेले कष्ट, त्यांची चाललेली धडपड आणि जगण्याची जिद्दही जाणवली. त्यांच्यातला संवेदनशील लेखक जागृत झाला आणि द ग्रेप्स् ऑफ रॉथ ह्या अजरामर ग्रंथाची निर्मिती झाली.

हे अंतदृष्र्ट ीचे किंवा प्रतिभेचे वरदान वैज्ञानिकाला किंवा आध्यात्मिकव्यक्तीला देखील लाभलेले असते. वैज्ञानिक त्यामुळे शोध लावतात. उदा.गॅलिलिओला लागलेला सूर्य स्थिर असल्याचा शोध आणि आध्यात्मिक

क्षेत्रात मदर तेरेजा ह्यांना लाभलेली अंतर्दृष्टी. त्यामुळे जे रंजले-गांजलेआहेत, त्यांच्यात त्यांना देव दिसू लागला. थोडक्यात आपण पाहतो, पणआपल्याला दिसत नाही. प्रतिभावंतांना मात्र ते दिसते. हाच त्यांच्यामधील व आपल्यामधील फरक आहे. उत्तम साहित्याच्या वाचनामुळे आपल्याला पराकोटीचा विविधांगी

अनुभव येतो. कधी आपण आनंदाच्या लाटेवर लहरतो, तर कधी दु:खाने गहिरवतो. कधी आपल्याला जीवनाच्या अर्थाच्या प्रश्नांविषयी उत्तरे मिळतात, तर कधी व्यसनांच्या किंवा वासनांच्या गर्तेतून बाहेर पडण्यास मदत होते. कधी आपल्याला विश्वाच्या अनंततेचे भान येते, कधी विश्वाचे आर्त हृदयाला भिडते; तर कधी मानवी आत्म्याच्या महत्ततेचे दर्शन घडते. अशा प्रकारे आपले जीवन सुंदर व संपन्न होऊन आपल्या

जीवनाला दिशा मिळू शकते.

मराठी साहित्य – मुमुर्षू ?

अलीकडे मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जाते. ती मुमुर्षू, म्हणजे मरणपंथाला लागली आहे, असे सांगितले जाते. जे जे जिवंत असते, त्यांच्यापुढे जगण्याची आव्हाने असतात. त्यावर मात करून ते टिकाव धरते. त्याचप्रमाणे मराठी भाषेपुढे आव्हाने आहेत. उदा. आजची सर्वव्यापी डिजिटल साधने, लोकव्यवहारातील हिंदीचे वाढते प्रस्थ, परदेशी भाषांचे वाढते महत्त्व आणि विशेष म्हणजे मराठी माणसाचा जन्मजात

न्यूनगंड, इ… परंतु तसे जर असेल, तर आजघडीला शेकडो दिवाळीअंकप्रसिद्ध होतात, लक्षवेधी मराठी साहित्य निर्माण होते, मराठी वृत्तपत्रांत दोन-दोन पानांच्या मराठी नाटकांच्या जाहिराती येतात, गाजलेल्या मराठीपुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध होतात. या सर्वांचा आस्वाद मराठीमाणूसच घेतो आहे ना? तसेच आज ह्या संमेलनस्थळी लागलेले पुस्तकांचेअसंख्य स्टॉल्स व त्यात गर्दी करीत असलेले दर्दी वाचक हे सुचिन्ह आहे.एका मराठी वृत्तपत्राची दिल्ली आवृत्ती प्रसिद्ध होते. म्हणन्ू ाच मराठी माणसाला विचारावेसे वाटते, ‘भ्रांत तुम्हां का पडे? मायबोलीचे दूध प्याला आहात ना?’ आता गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मराठी बाळे इंग्रजी माध्यमातशिकून वाघिणीचे दूध पिऊ लागली आहेत, हे खरे; परंतु आजही महाराष्ट्रातील ऐंशी टक्के शाळा मराठी माध्यमांच्याच आहेत ना? पूर्व दिव्य ज्यांचे, त्याना रम्य भावी काळअसे कवी विनायक सांगून गेले. आपले पूर्वदिव्य काय, ते संतसाहित्याने सिद्ध केलेले आहे. आज चार मराठी लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत. (अर्थात हिंदीला अकरा व कन्नडला आठ पुरस्कार मिळालेले आहेत. आपल्याला

खूप पल्ला गाठायचा आहे.) काही मोजक्या मराठी पुस्तकांची अन्य भारतीयआणि परदेशी भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत आणि होत आहेत. हे सर्वआश्वासक आहे. किती भारतीय भाषांमध्ये नेमाने अखिल भारतीय साहित्य संमेलने साजरी होतात? पहिले मराठी साहित्य संमेलन ११ मे १८७८ रोजीन्यायमूर्ती माधवराव गाोविंद रानडे आाणि गोपाळराव देशमुख (लोकहितवादी) ह्यांच्या प्रेरणेने पुणे येथे भरले होते. त्यांनी लावलेला साहित्य संमेलनाचा वेलू आता गगनावरी जातो आह.े त्या संमेलना साहित्याची,साहित्याविषयक प्रश्नांची आणि विशेष म्हणजे तत्कालीन परिस्थितीची नोंद घेतलेली आढळते.

१९०५ सालच्या तिसऱ्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष पांडरु ंग तथा दादासाहेब करंदीकर ह्यांनी साहित्य आणि सामाजिक सुखदु:खे ह्यांचे नाते जुळले पाहिजे, देशाला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांवरही चर्चा-चिंतन झाले पाहिजे, असे आग्रहाने म्हटले होते. आज स्वातंत्र्योत्तर काळातही जेव्हा जेव्हालोकशाहीचा गळा घोटला जातो, मानवी हक्क किंवा मानवी प्रतिष्ठा ह्यांनाधोका पोहोचतो, तेव्हा तेव्हा साहित्य संमेलनाने भूमिका घेतलीच पाहिजे,याबाबत दुमत होण्याचा प्रश्नच नाही.

चौथे साहित्य संमेलन १९०६ रोजी पुणे येथे वासुदेव गोविंद कानिटकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठात मॅट्रिकच्या अभ्यासक्रमात मराठीचा विषय ऐच्छिक न ठेवता अनिवार्य ठेवला याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले होते. सुमारे ११४ वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारला स्थानिक भाषेचे महत्त्व कळून आले व त्यांनी त्याप्रमाणे पावले उचलली ह्याचा आपल्याला अभिमान वाटतो. त्यांनी दूरदृष्टी ठेवून मराठीच्या अध्ययनाला चालना द्यावी हे विशेष.

१९०७ साली विष्णु मोरेश्वर महाजनी ह्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पाचव्या साहित्य संमेलनात मराठीप्रमाणेच इंग्रजी साहित्याचे अध्ययन करणे हे कसे आवश्यक आहे, ह्याचे प्रतिपादन केले. किती द्रष्टे होते आपले पूर्वाध्यक्ष! व्यक्तीच्या जीवनाबरोबर साहित्याच्या जीवनातही चढउतार असतात. रविकिरण मडं ळाच्या अस्तानंतर मराठी कविता जवळजवळअज्ञातवासात गेली असे वि. स. खांडेकर ह्यांनी २५व्या साहित्यसंमेलनातम्हटले आहे. असे साठोत्तरी कवितेबद्दल म्हणता येणार नाही. मराठीचा प्रवाह वेगवेगळ्या वाटा-वळणाने पसरत आहे. साहित्य हे जीवनावर केलेले भाष्य आहे. कवी, लेखक हे समाजाचे अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे समाजाची सुखदु:खे, आशा-आकांक्षा, वेदना-व्यथा आणि जे-जे मानवी आहे, मानवाच्या इतिहासाशी आणि वर्तमानाशी निगडित आहे, त्या सर्वांचे प्रतिबिंब साहित्यिकाच्या हृदयात उमटते व ते त्याच्या लेखनातून व्यक्त होते.

वेदना-साहित्याची जननी

वेदना हा एक मूलभूत मानवी अनुभव आहे. वेदनेतून प्रेरणा घेऊन अनेक साहित्यिकांनी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली आहे. साहित्यिकाच्या, अस्तित्वाच्या अंतरात्म्यापर्यंत ती पोहोचलेली असते म्हणून वेदना ही साहित्याची जननी ठरलेली आहे. वेदना ह्या मनुष्यमात्रांच्या असोत, पशु-पक्ष्यांच्या असोत किंवा वृक्षवेलींच्या असोत, त्या माणसाला, त्याच्या आत्म्याला गदगदून हलवतातच. वाल्मिकी ऋषंनी स्नान करून परतत असताना शिकाऱ्याने मारलेल्या बाणामुळे जखमी झालेली क्रौंच पक्ष्याची मादी पाहिली, तिच्याभोवती

आक्रोश करणारा व्यथित नर पाहिला आणि ते विव्हळ झाले. त्या पक्ष्याच्यावेदनेशी ते ऋषी तादात्म्य पावले व उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून निघालेलामहानिषाद श्र्लोक अजरामर झाला.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम:

शाश्वती: समा: ।

यत्क्रौंच मिथुनादेकमवधी

काममोहित्म ।।

ज्यांची शंभरावी पुण्यतिथी यावर्षी साजरी होत आहे, त्या रेव्हरंड नारायण वामन टिळक ह्यांनी लिहिलेली केवढे हे क्रौर्यही कविता आपणपाठ्यपुस्तकात शिकलो. जखमी झालेली पक्षिणी आपल्या चोचीत घास

घेऊन कशीबशी घरट्याकडे परतत असताना, तिची धडपड कवीने पाहिलीआणि क्षणोक्षणी पडे, उठे परि बळे,’ ही कविता जन्माला आली. तिचे वाचन करताना पाषाणहृदयी माणसालाही पाझर फुटतो. एकोणिसाव्या शतकात विकसित झालेल्या ब्लॅक लिटरेचरमध्ये तत्कालीन गुलामगिरीत खितपत पडलेल्या कृष्णवर्णीयांच्या नरकयातनांचे दर्शन घडते. साहित्याला दिलेले ते वेगळे वळण होते आणि जगाचे त्या साहित्याकडे लक्ष वेधलेेले,े कारण वेदनेबरोबर त्या साहित्यात अभिजातताही होती. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी साहित्याच्या वृक्षाला दलित साहित्याच्या रूपाने रसरशीत धुमारे फुटले आणि कवितांच्या व आत्मचरित्रांच्या रूपात ते व्यक्त होऊ लागले. वंचित व शोषितांची दखल घेण्यात आणि त्यांच्या साहित्याचे योग्य मूल्यमापन करण्यात प्रस्थापित समीक्षक कमी पडले. वेदना ही सर्वव्यापी आहे. त्याचे उदाहरण म्हणजे पॅलेस्टिनी लोक कसे इस्रायलपुरस्कृत अत्याचाराला अलिकडे (१९४८नंतर) तोंड देत आहेत, हे मी पॅलेस्टिनमधल्या माझ्या वास्तव्यात डोळ्यांनी पाहिले आणि तेथल्या अभ्याससत्रावेळी त्याविषयी ऐकलेसुद्धा. मनुष्य जेव्हा वेदनेत असतो आणि त्याचे तोंड बंद केले जाते, तेव्हा त्याचे हृदय बोलू लागते. काही पॅलेस्टिनी कवितांचा अनुवाद माझ्या वाचनात आला. रक्तात बुडवलेल्या लेखणीने केलेले ते काव्यलेखन आहे. तेथील कवी गसान झक्तान म्हणतात,

सामूहिक मृत्यू

अंधाराशिवाय एकही गोष्ट मिळाली नाही,

झोपलो आम्ही छपराशिवाय,

पण घेऊन पांघरूण अंगावर

आणि वाचलेला जीव.

कुणीही आला नाही त्या रात्री

सांगायला आम्हांला इतरांच्या मृत्यूबद्दल.

रस्ते वाजवत राहिले शिट्ट्या

आणि रस्ते खून झालेल्यांनी खच्चून भरलेले,

आले होते ते शेजारच्या प्रदेशातून

ज्यांच्या किंकाळ्या

सुटून आल्यागत आमच्याकडे,

आम्ही पाहिलंय आणि ऐकलंयही

मेलेला माणूस हवेतून चालताना,

त्यांच्या बसलेल्या

धडकीच्या दोरीनं बांधलेला

खळखळाट खेचून घेतोय

चमकणाऱ्या गवताच्या पात्यांतून

धगधगत्या गवताच्या चटयांवरून

पडत राहिलंय सारं रस्त्यांवर,

स्त्रियांनी दिलाय जन्म

फक्त या जगाचा निरोप घेतलेल्यांना

आणि त्यानंतर आता

स्त्रिया देणार नाहीत जन्म.

(‘पॅलेस्टिनी काविता’, अनुवाद रमेशंद्र पाटकर. लोकवाङ्मयगृह प्रकाशन २०१८)

जे काळजातून निघते, ते काळजाला भिडतेच आणि वाचकाला अंतर्मुख करते. साहित्य हा सत्याचा आविष्कार आहे. लेखक आपल्यासाहित्यकृतीतून माणसाचा शोध घेत असतो आणि विशेषत: स्खलनशीलमाणसामध्ये असा शोध लवकर लागतो. कारण माणसाचे हृदय हे कुरूक्षेत्रआहे. तिथे बऱ्यावाईटांचा संघर्ष होत असतो. त्या संघर्षाला भिडता भिडतामाणूस थकून जातो. परंतु संघर्ष जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नजरेसमोरमोठमोठे आदर्श ठेवून एक अतिशय देखणा तरणाबांड तरुण फादरहीउपाधी मिळवतो. तो अतिशय बुद्धिमान असतो. त्याचे भवितव्यही उज्ज्वलअसते. तो स्वत:ला खूप सांभाळतो. आपल्या ब्रह्मचर्य व्रताची त्याला जाणीव होती. त्यामुळे लोकांमध्ये मिसळताना तो स्त्रिया आणि मुली ह्यांच्यामध्ये अंतर ठेवत असे. एक वयस्क स्त्री त्याला नादी लावण्याचा प्रयत्न करते. परंतु तो ताकास तूर लावत नाही. त्याचे फार मोठे नाव होते. त्याच्या प्रवचनाला लोक मोठ्या संख्येने गर्दी करीत. सर्व धार्मिक विधी तो चित्त लावून साजरे करीत असे.

काही वर्षे जातात. कार्य करीत असताना त्याची नजर एका निळ्या डोळ्यांच्या आणि परीसारखी दिसणाऱ्या एका मुलीकडे जाते आणि मुलीचीहीत्याच्याकडे. दोन्ही गोष्टी नकळत घडतात. कुठेतरी एक सुप्त भावना जन्माला येते आणि दोघांनाही सर्व जाणवते. कुणाच्याही ध्यानात येणार नाही अशाप्रकारे त्यांचे प्रेमसंबंध रंगत जातात, परंतु ते लपून राहत नाहीत आणि त्याचा बभ्रा होतो. त्या दोघांना प्रचंड यातनेमधून जावे लागते.

त्याचे भवितव्य धोक्यात येते. त्या दोघांच्या मनांची झालेली होरपळ,उलाघाल अतिशय धारदारपणे ऑस्ट्रेलियन लेखिका मेरी मॅक्लो ह्यांनीआपल्या द थॉर्नबर्ड्सह्या कादंबरीत वर्णिलेली आहे. कंटकपक्षी

(थॉर्नबर्ड) नावाचा एक जगावेगळा पक्षी असतो. तो आयुष्यात फक्त एकदाच गातो. त्याची सूर आळवायची वेळ जवळ आली की तो काटेरी वृक्षाचा माग काढतो. अतिशय तीक्ष्ण आणि अणुकुचीदार अशा काट्यावर तो स्वत:ला झोकून देतो. काटा त्याच्या हृदयातून आरपार गेला म्हणजे त्याच्या कंठातून एक सुरेल गीत बाहेर पडते. ते ऐकून सारं जग स्तिमित होते आणि जीवाचे कान करून त्या गाण्याचा आस्वाद घेते त्यावेळी

स्वर्गातून देव मंद स्मित करतो… ज्याच्या काळजातून काटा आरपार जातो आणि त्या काट्याची

लेखणी करून जो लिहितो, अशी साहित्यकृती अभिजात पदाला पोहोचते.कलात्मकरितीने वर्णन केलेली वेदना रसिकाला एक प्रकारचा इंद्रियातीतआनंद देत असते. ह्यालाच समीक्षक ब्रह्मानंदाच्या जातीचा आनंद समजतात.

साहित्याचे व्यासपीठ

प्रत्येक क्षेत्राचे स्वतंत्र व्यासपीठ असते. त्यांचे व्यासपीठ त्या त्या क्षेत्रापुरते मर्यादित असते आणि असले पाहिजे. आपण कधी कधी राजकीय व्यक्तींना अनेक प्रकारच्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावर बसवत असतो. उस्मानाबादच्या संमेलनाचे व्यासपीठावर स्थानापन्न न होण्याचा निर्णय राजकारणी मंडळीने मोठ्या मनाने घेतलेला आहे. एक नवीन पायंडा उस्मानाबादच्या संमेलनातून सुरू होत आहे. त्याबद्दल पुढाऱ्यांचे आणि

उस्मानाबादकरांचे अभिनंदन! साहित्य संमेलने हे साहित्यिकांचे व्यासपीठआहे आणि तिथे अग्रपूजेचा मान साहित्यिकांचाच असतो. एक साहित्यप्रेमी म्हणून राजकीय व्यक्तींनी अवश्य संमेलनाला हजर राहाव. सरकारने आपल्या सांस्कृतिक धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पुतळे उभारण्याऐवजी साहित्य संमेलनाला पुरेसे अनुदान द्यावे. दुष्काळग्रस्त भागात आणि श्रीमंत भागात जेव्हा संमेलने होतात, तेव्हा शासनाने अनुदान देताना त्याचा विचार करावा. राजकारण ही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया आहे. एखाद्या देशाचे भवितव्य त्या देशाच्या भल्या-बुऱ्या राजकारणावर अवलंबून असते. निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपले नागरी जीवन राजकारण्यांच्या हवाली करीत असतो. म्हणून साहित्यिक ह्या प्रक्रियेपासून अलिप्त राहू शकत नाही. जेव्हा लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही प्रवृत्ती अवतरते, तेव्हा साहित्यिकांनी स्पष्ट बोलले पाहिजे आणि लिहिले पाहिजे. अशा वेळी मौन राखणे हा भेकडपणा आहे. समर्थ रामदास ह्यांनी आपल्यादासबोधह्या ग्रंथात म्हटले आहे,

मुख्य ते हरिकथा निरूपण

दुसरे ते राजकारण

तिसरे ते सावधपण सर्व विषयी ।

राजकारण का करावे आणि कसे करावे, ह्याचा वस्तुपाठ समर्थांनी घालून दिलेला आहे. पोप अकरावे पायस (१८५७-१९३९) ह्यांनी आपल्या एका लेखात म्हटले होते, ‘ज्यांना राजकारणात रस आहे, जे राजकारणात सक्रिय भाग घेतात, त्यांनी अतिशय अवघड परंतु अतिशय सन्माननीय अशा राजकारणाच्या कलेत पारंगत झाले पाहिजे.पोप पायस ह्यांच्या ह्याविधानाला हिटलर आणि मुसोलिनी ह्यांची पार्श्वभूमी होती. ज्यूंचा संहार होत असताना पोप पायस बारावे ह्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल संदिग्धता व्यक्त के ली जाते. सध्याचे पोप फ्रान्सिस ह्यांनी त्याकाळचे सगळे दस्तऐवज आता खुले केले आहेत. योग्य वेळी सत्य बाहेर येईलच. जेव्हा समाजात असाधारण परिस्थिती निर्माण होते, जेव्हा हुकूमशहा आणि लष्करशहा ह्यांचा उदय होतो, जेव्हा मानवी हक्क, प्रतिष्ठा आणि जीवन पायदळी तुडवले जाते, तेव्हा साहित्यिक, विचारवंत, धर्माचार्य ह्या सर्वांनी एखाद्या द्रष्ट्याप्रमाणे स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. आपल्याकडचे उदाहरण म्हणजे स्वामी अग्निवेश . ते एका धर्मसंघटनेचे अध्यक्ष आहेत. तरीही मानवी हक्कांची पायमल्ली होताच त्यांनी लोकशाही मार्गाने आपला विरोध दर्शविला. त्यांच्यावर तथाकथित धर्मवाद्यांनी हल्ले केले. पोलंडमध्ये जेव्हा एकाधिकारशाहीचा कहर झाला तेव्हा पोप दुसरे जॉन पॉल ह्यांनी; जेव्हा फिलिपाइन्समध्ये मार्कोस आणि त्याची पत्नी इमेल्डा ह्यांनी आपली हुकूमशाहीची वाघनखे बाहेर काढली तेव्हाकार्डिनल सिन ह्यांनी आणि एल्-साल्वादोरमध्ये हुकूमशाहीने उग्र रूप धारण केले, तेव्हा आर्चबिशप रोमेरो ह्यांनी ठाम भूमिका घेतली आणि लोकशाहीचा पुरस्कार के ला. १९८१मध्ये पोप दुसरे जॉन पॉल ह्यांच्यावर प्राणांतिक हल्ला झाला आणि आर्चबिशप रोमेरो ह्यांची निर्घृण हत्या झाली; कारण त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती. ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेतादेवी ह्या बंगाली लेखिका होत्या. बंगाली साहित्यामध्ये त्यांनी मोलाची भर घातली आहे. मात्र स्वत:ला अभ्यासिकेत कोंडून न घेता, त्यांनी रस्त्यावर उतरून गोरगरिबांसाठी संघर्ष केला. नयनतारा सहगल ह्या गाजलेल्या लेखिका आहेत. भारतात अलिकडे अनेक प्रकार घडत आहेत, ज्यांमुळे कायद्याची पायमल्ली होते, लेखनस्वातंत्र्य मर्यादित केले जाते त्याबद्दल त्या आपले मत स्पष्टपणे मांडतात. त्यामुळे अनेकांना त्यांना कार्यक्रमांना बोलावण्याची भीती वाटते. ज्यांच्या लेखणीत नैतिकता ठासून भरलेली असते आणि वृत्तीमध्ये एकप्रकारचा बेडरपणा असतो, त्यांचा समाजमनाला धाक वाटतो. ज्यांच्याविषयी धाक वाटावा असे किती साहित्यिक आपल्या आजुबाजूला आहेत? आपल्या महाराष्ट्रात आपण नेहमी दुर्गाबार्इंची आठवण काढतो. दुर्गा भागवत ह्यांना साहित्यातील रणरागिणीअसे म्हटले जाते. कारण त्या भूमिका घेत आल्या अन् भूमिका लढवत आल्या.

जेव्हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच होतो, तेव्हा समाजामध्ये धर्माच्या नावाने भेदाभेद केला जातो आणि समाजाचे वांशिक शुद्धिकरण करण्याचा निर्णय घेतला जातो. जेव्हा एखाद्या प्रदेशाला नजरकैदेचे स्वरूप येते, जेव्हा दोष नसताना अश्राप नागरिकांची उपासमार होते, त्यांचे उपजिविकेचे साधनहिरावून घेतले जाते तेव्हा विचारवंतांनी आणि साहित्यिकांनी गर्जना केलीपाहिजे. राजा कठोर आत्मपरीक्षणाची वेळ जवळ आली आहे.

००००

 

२. अभिव्यक्ती स्वातंत्र्य

मानवाचा इतिहास हा अन्यायाचा, गुलामगिरीचा, विषमतेचा आणिभेदभावाचा आहे. लिंग, वंश, जात, धर्म आणि जन्मस्थान या कारणांवरूनमाणसाने माणसावर, सबलांनी दुर्बळांवर, उच्च वर्णीयांनी कनिष्ठांवर,पुरुषांनी स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले आहेत आणि अन्यायाची हीमालिका अजूनही खंडित झालेली नाही. माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आपलेसुरूच आहे. मात्र शत्रू खूप प्रबळ आहे. त्याला सात जीव आहेत. प्रतिगामीशक्तींचा सहज पराभव होत नाही. वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या रितीने हाअन्याय सुरू असतो. त्याची कारणमीमांसा बदलत जाते, परिस्थिती बदलतजाते, परंतु अन्याय बदलत नाही. उदा. आधुनिक काळामध्ये इलेक्टा्र ॅनिक्स साधनांद्वारे होणारे शोषण. १४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री आपण नियतीबरोबर ऐतिहासिक करार केला. त्यावेळी अवघे जग झोपी गेले असता, भारत देश मात्र जागा

होता. – आपल्या स्वातंत्र्याच्या जन्मघटिकेची प्रतीक्षा करीत होता. तो क्षणआला आणि स्वातंत्र्याचा आनंद आपण उपभोगला. भारतीय घटना जे स्वातंत्र्य आपण अनुभवले, ते आपल्या भावी पिढ्यांनाही उपभोगता यावे, त्यासाठी आपल्या घटनाकारांनी अथक कष्ट करून २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधानाची निर्मिती पूर्ण केली व २६ जानेवारी १९५० रोजी संविधानाची कार्यवाही सुरू झाली. आपल्या संविधानातील उद्देशिका (प्रीअँबल) म्हणजे एक महाकाव्यच आहे. भारतीय घटनेने स्वीकारलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुत्व या मूल्यांच्या प्रकाशात आपल्याला नव्या संस्कृतीच्या मंदिराची उभारणी करायची आहे. या चार महान मूल्यांबरोबर भारतीय संविधानाने आपल्याला समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाच्या विरोधाचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक संरक्षणाचा हक्क असे सहा मूलभूत हक्क बहाल केले आहेत. वास्तविक, कोणतीही राज्यसंस्था ा किंवा व्यक्ती, कितीही शक्तिशाली असो, एक मानव म्हणून आपण आईच्या उदरातून हे हक्क घेऊन जन्माला आलेलो आहोत. या हक्कांमुळे प्रत्येक भारतीयाला प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. भारत हे बहुवांशिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक, बहुभाषिक राष्ट्र आहे. गेली हजारो वर्षे भारताने ही विविधतेतील एकता जपली आहे,जोपासली आहे व भारतीय घटनेनेही ती मान्य केली आहे. विविधतेतीलएकता हीच भारताची जगाला ओळख आहे, तीच आपली अस्मिता आहे.भारतीय संविधानाला एका रथाची उपमा दिली, तर स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व सामाजिक न्याय ही चार मूल्ये त्या रथाची चार चाके आहेत, सहा मूलभूत हक्क त्या रथाचे सहा अश्व आहेत, ‘सेक्युलरह्या इंग्रजी शब्दाला काही जण आक्षेप घेतात. या इंग्रजी शब्दाचा उगम युरोपमध्ये झालेला आहे. तिथे सेक्युलर म्हणजे केवळ इहवाद किं वा धर्मविहीनता असा केला जातो. आपली सेक्युलर ही कल्पना त्याहून खूप भिन्न आहे. तिचा अर्थ सर्वसमावेशकता म्हणजे सर्वांना समान वागणूक आणि कुठलाही एक धर्म राष्ट्रधर्म नाही, असा आहे. पंडित नेहरूंनी सेक्युलॅरिझमची ही भारतीय संकल्पना जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा स्पष्ट केली आहे.त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सेक्युलॅरिझम (धर्मनिरपेक्षता,सर्वसमावेशकता) हा भारतीय घटनेचा आत्मा आहे. तो रथाचा सारथी आहे. जोपर्यंत सारथी सुरक्षित आहे, तोपर्यंत आपल्या देशाच्या अखंडतेलाकुठलाही धोका नाही, असे मला वाटते. म्हणूनच आपल्या एका हातातआपापल्या धर्माचा धर्मग्रंथ असला, तर दुसऱ्या हातात भारतीय संविधानाचीप्रत असली पाहिजे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली

सर्जनशील व्यक्ती अनेकदा द्रष्टी असते. जे सर्वसामान्यांना दिसत नाही, ते त्यांना दिसत असते. आपले द्रष्टेपण ते कलात्मकरीत्या व्यक्त करीत असतात. त्यांचा लेखन किंवा कलाविष्कार प्रक्षोभक असू शकतो. हे सर्व स्वीकारणे आणि पचविणे परंपरावाद्यांना आणि संस्कृती-संरक्षकांना प्रसंगी अवघड जाते. लोकशाही एक जिवंत वस्तुस्थिती आहे. जिवंत व्यक्तीला आजार होतात, कधी ते प्राणांतिकही ठरतात, त्याचप्रमाणे लोकशाहीलाही आजार होऊ शकतो. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली आणि ती १८ महिने पुरली. उत्तर प्रदेश सरकार विरुद्ध राजनारायण हाखटला अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये चालवला जाऊन १२ जून १९७५रोजी निर्णय दिला गेला. त्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीह्यांच्यावर मतदानामध्ये गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवला गेला आणि सत्तासोडावी लागण्याची शक्यता दिसू लागताच त्यांनी आणीबाणी जाहीर केली. त्याआधी चालवलल्े या भष्ट्राचारविरोधी चळवळीमध्ये लोकनेते जयप्रकाश नारायण ह्यांनी लष्कराला कायदेभंग करण्याचा सल्ला दिला होता. तोही घातक होता.

मूठभर स्वातंत्र्यप्रिय कार्यकर्त्यांनी आणीबाणीला निकराने विरोध केला. त्यांना गजांआड जावे लागले. तरीही तुरुंगांच्या भिंतीच्या उंचीपेक्षा त्यांची लोकशाही मूल्यांवरील निष्ठा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह अधिक उंच होता. त्या अठरा महिन्यांच्या कालावधीत अनेक लोकशाहीप्रेमी नागरिकही गजांआड केले गेले होते. त्या कालावधीत त्यांनी लिहिलेले साहित्य नंतर प्रकाशित झाले आणि ते लोकप्रियही झाले.

आणीबाणीच्या कालावधीत माझे वास्तव्य पुण्याला स्नेहसदन ेथे होते आणि मी साप्ताहिक साधनामध्ये माझ्या नावाानिशी आणीबाणीविरोधी उपरोधिक पत्रे लिहीत होतो. इंदिराजी, सिंपली ग्रेट!ह्या नावाने मीसाप्तााहि क साधनाकडे एक पत्र पाठवल.े २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. तरी अजूनही पोलिसराज सुरूच होते. साधनाने २७ मार्चच्या अंकात माझे पत्र प्रसिद्ध केले. त्यानंतर माझ्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागला. (ते पत्र मी माझ्या नाही मी एकला…ह्या आत्मचरित्रात (पृष्ठ क्र.११०) प्रसिद्ध केले आहे.) तेव्हा माझे नाव पुण्यात झाले नव्हते. आणीबाणी उठवण्याच्या जवळपास शेवटच्या काळात पोलिसांना माझा थांग लागला व साधनामध्ये लिहिणारी ती व्यक्ती मीच आहे का, असे त्यांनी मला विचारले. मी त्यांना सांगितले, ‘‘मी कुठल्याही एका पक्षाचा सदस्य नाही. मी नैतिक मूल्ये मानणारा एक भारतीय आहे. त्या भूमिकेतून मी ते लिहिले आहे. त्याची जी काही शिक्षा असेल, ती भोगण्यास मी तयार आहे…’’ ते मुकाट्याने परत गेले आणि पुन्हा फिरकले नाहीत.

लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादताही लोकशाहीचा गळा घोटता येतो, हादेखीलोकशाहीला फार मोठा धोका आहे. असे जेव्हा जेव्हा घडते, तेव्हा तेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रियनागरिकांनी व विशेषत: साहित्यिकांनी व विचारवंतांनी सजग राहून स्पष्टभूमिका घेतली पाहिजे, असे मला वाटते.

२६ नोव्हेंबर १९४९ ला संविधानसभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे समारोपाचे भाषण होऊन त्यादिवशी आपले संविधान संमत झाले. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे २५ नोव्हेंबर १९४९ ला भारतीय संविधानाचे शिल्पकार या शब्दांनी ज्यांचा सार्थ गौरव होतो, त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानसभेत शेवटचे भाषण झाले. त्या भाषणात त्यांनी देशाला सावध केले होते. ते संपूर्ण भाषण अभ्यासनीय आहे. त्याची एक प्रत प्रत्येक स्वातंत्र्यप्रेमीने आपल्या घरी फ्रेम करून लावावी, असे मला वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते. त्यांच्या त्या भाषणातले विचार मी येथे उद््घृत करीत आहे.

‘‘लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, लोकांनी आपले स्वातंत्र्य, कितीही मोठा माणूस असला, तरी त्याच्या

चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की, जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद््ध्वस्तकरण्यासाठी उपयोग करील… विभूतिपूजा ही जगातील इतर कोणत्याहीराजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणातदिसते. राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत:हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरते.’’

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार आपण नेहमीच लक्षात ेवणे गरजचहे. आपण भारतीय स्वभावाने भाबडे आणि भावनाशीलआहोत. राजकीय नेत्यांनी केलेल्या घोषणाबाजीचा आपण डोळे बंद करूनस्वीकार करतो. त्यांचे स्तोम माजवतो. उक्ती आणि कृतीह्याच्यात मेळआहे की नाही, हे आपण तपासून पाहिले पाहिजे. म्हणून तर संतांनीआपल्याला सांगितले आहे बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.

प्रसार-साधनाा लोकांच्या मनांवर व मतांवर खूप प्रभाव पडत असतो. प्रसिद्ध झालेली प्रत्येक बातमी ही काही लोकांना धर्मवचनाप्रमाणे वाटते, परंतु आज पेड न्यूजआणि फेक न्यूजअसे प्रकार चालू झाले आहेत. कधी-कधी राजकीय पक्षांची भूमिका बातम्यांच्या स्वरूपात अगदी पहिल्या पानावर झळकत असते. हादेखील लोकशाहीवर केलेला एक छुपा हल्ला आहे. तोसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे.

उलटी गंगा

आपल्याकडे संविधानासारखे धन आ. त्यानुसार आपण आभिाव्यक्तीस्वातंत्र्य अनुभवत आहोत. जगातील सर्वांत मोठी लोकशाहीअशा शब्दांतआपण आपलीच पाठ थोपटून घेत आहोत. हे सगळे खरे आहे, परंतु दुर्दैवाने अधूनमधून आपल्याकडे विचारांची गंगा उलट्या दिशेने वाहू लागते.

आपला प्रवास सहिष्णुतेतून असहिष्णुतेकडे, विशालतेकडूनसंकुचितपणाकडे आणि अहिंसेकडून हिंसेकडे होऊ लागतो. काहींच्या भावना अतिशय हळव्या असतात. त्या पटकन दुखावल्या जातात. धर्म, जात, भाषा, प्रांत, ऐतिहासिक व्यक्ती ह्यांच्याविषयी चिकित्सक भाष्य केले की, संबंधित गट उसळून उठतात. कायदा हाती घेतात, प्रसंगी हिस्ं ााचाराचा अवलंब करतात. अहिंसेकडून हिंसेकडे चाललेल्या अशा प्रवासाची अलीकडची उदाहरणे म्हणजे नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरीलंकेश यांच्या झालेल्या भेकड हत्या. कुणाच्या ताटात काय आहे? कुणाच्या वाटीत काय आहे? ह्यावर एखाद्याचे जगणे किंवा मरणे अवलंबून असावे ही अतिशय दु:खद बाब आहे. काही ठिकाणी जमावाकडून गायीच्या नावाने विशिष्ट समाजातील व्यक्तींच्या हत्या करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर ह्यांनी गायीविषयीची केलेली चिकित्सा अतिशय पुरोगामी आहे. गाय जगली पाहिजे, तसा माणूसही जगला पाहिजे. म्हणून गायीच्या नावाने केलेल्या हत्या हा सावरकरांच्या विचारांचा केलेला पराभव आहे. देशभरात झालेल्या इतर २०८ पत्रकारांच्या हत्यासुद्धा तशा निषेधार्ह आहेत. तसेच विभूतिपूजा, कर्मठपणा, पोथिनिष्ठा वाढत आहे. त्यामुळे हाडाच्या संशोधकांची कुचंबणा होते. विचारवंतांचा कोंडमारा होतो. विविध प्रकारच्या दडपणांमुळे शास्रशुद्ध संशोधन आणि धर्मचिकित्सा करणे अवघड होते. ही देशाची सांस्कृतिक हानी आहे. निखळ व शास्रशुद्ध संशोधन करण्यासाठी निर्मळ वातावरणाची गरज असते. आपल्याकडे मुळात संशोधक वृत्तीचा हवा तितका विकास

झालेला नाही. संशोधनामुळे नवी आणि निराळी माहिती उपलब्ध होते.त्यामुळे धर्मग्रंथांचे, ऐतिहासिक गोष्टींचे, व्यक्तींचे वस्तुनिष्ठ पुनर्मूल्यांकनकरता येते. याचे उदाहरण म्हणजे प्रभू येशू खिस्त. ते ज्यू धर्मात वाढले. जुना करारहा त्याकाळच्या ज्यू लोकांचा धर्मग्रंथ. त्यात अनेक परमसत्ये आहेत. त्याचबरोबर काही आक्षेपार्ह विधानेसुद्धा आहेत. प्रभू येशूंनी त्या विधानांची चिकित्सा केली अन् तिथे जे जे मानवताविरोधी होते, त्यात

बदल के ला आणि तसे शिकवले. जुन्या करारात मोझेसने डोळ्यासाठी डोळाअशी शिकवण दिली होती. त्याची पाश्र्वभूमी अशी होती, प्राचीनकाळी एखाद्याच्या अपराधाबद्दल संपूर्ण गावाला सामुदायिक शिक्षा केली जात असे. मोझेसने त्यात बदल केला व एकासाठी एकहा नियम केला. प्रभू येशूंनी आणखी एक पाऊल पुढे टाकून शत्रूला क्षमा करून त्याच्यावर प्रेम करण्याचा आदेश दिला.

मोझेसने सांगितले होती की, ‘व्यभिचार करू नये,’ परंतु माणूस हा केवळशरीराने नव्हे तर मनानेदेखील इजा करू शकतो. म्हणून प्रभू येशू म्हणाले,जो कोणी एखाद्या स्रीकडे कामूक नजरेने पाहतो, त्याने तिच्याशी आपल्यामनात व्यभिचार केला आहे.प्रभू येशूंनी धर्मग्रंथांची प्रतिष्ठापना माणसाच्याअंत:करणात केली. मासिक धर्मासंबंधी ज्यू समाजात प्रचंड सोवळेओवळेहोते. त्याकाळात स्रीला अशुद्ध समजले जात होते. तिला घराबाहेर पडण्याचीमुभा नव्हती. मासिक धर्माने पीडित एक स्री येशूंकडे आली. प्रभू येशूंनी तिला स्पर्श केला आणि साव्े ाळ्या-आव्े ाळ्याचे सर्व नियम धाब्यावर बसवले. त्यामुळे तत्कालीन धर्ममातर्डं ांचा रोष झाला. प्रभू येशूना सुळावर चढवण्यामागे तेही एक कारण होते. थोडक्यात धर्मचिकित्सा करणाऱ्यांना प्रसंगी आपल्या प्राणांचेही मोल मोजावे लागते.

आपला देश बहुधार्मिक आहे. प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ आहेत. त्या धर्मग्रंथांना काळाचा आणि तत्कालीन संस्कृतीचा संदर्भ आहे. धर्मग्रंथांतील काही वचने कालबाह्य होऊ शकतात. त्या वचनामुळे मानवी स्वातंत्र्याचे, प्रतिष्ठेचे आणि हक्कांचे उल्लंघन होऊ शकते. धर्मग्रंथातील अशा वचनांची शास्रशुद्ध चिकित्सा झाली पाहिजे आणि ती चिकित्सा त्या त्या धर्मातील धर्मपंडितानी केलेली उत्तम. दुसऱ्याचे मत विरोधी असले, तरी ते मांडण्याचा त्याचा हक्ककुणी हिरावून घेऊ शकत नाही. या संदर्भात फ्रेंच विचारवंत व्हॉल्टेअरचे एक वचन उद््बोधक आहे. ते वचन असे आहे की, ‘तू जे बोलतोस, ते मला मान्य नाही, तथापि तुला तुझी भूमिका मांडता यावी म्हणून मी माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत लढत राहीन.’ (I do not agree with what you say. Sir, But I shall guard your right to express your opinion till the last drop of my blood)

स्वत:ची भूमिका पक्की व ठाम असली की, आपल्याला निराळ्या विरोधी मताची भीती वाटत नाही. उलट निराळ्या विचारांचे स्वागत केले जाते. अशा प्रकारचा उदारमतवाद हे प्रगल्भतेचे लक्षण असते. अशा वातावरणातच लोकशाही मूल्यांचे संवर्धन होत असते.

मूलतत्त्ववाद आणि देशाचे खरे प्रश्न

भारतीय घटनेने आपल्याला मूलभूत स्वातंत्र्य बहाल केले आहे. तुम्हांला सत्य कळेल आणि सत्य तुम्हांला बंधमुक्त करील,’ याऐवजी सत्य तुम्हांला कळणार नाही, सत्य तुम्हांला अंधारात ठेवील,’ अशी काही

उद्योगपतींची भूमिका आहे. त्या भूमिकेमुळे प्रसारमाध्यमे आपल्या कह्यातठेवता येतात. सत्य सांगण्याचा, गैरकृत्ये उघड करणाऱ्या वाहिन्यांच्यापत्रकारांचा आवाज दडपला जातो. त्या वाहिन्या त्यांना सोडाव्या लागतातकिंवा अशा निर्भिड पत्रकारांना साम, दाम, दंड, भेद वापरून बोलायला बंद केले जाते. कधी आपल्याला प्रश्न पडतो, आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत का? आत्माविष्कार करण्यासाठी कलाकार, पत्रकार व साहित्यिक मुक्त आहेत का? एक प्रकारच्या अदृश्य दडपणाखाली तर आपण वावरत नाही ना? त्यावेळेस जर्मन कवी मार्टिन न्यूमायर ह्यांनी लिहिलेली कविता तत्कालीन परिस्थितीवर विदारक प्रकाश टाकते.

जर्मनीमध्ये नाझी पहिल्यांदा कम्युनिस्टांवर येऊन थडकल,े धडकले

मी कम्युनिस्ट नव्हतो म्हणून गप्प बसलो.

त्यानंतर ते ज्यू लोकांवर येऊन घसरले

साहजिकच, ज्यू नव्हतो ना मी मग गप्पच बसलो.

नंतर कर्मचारी संघटनांवर ते अगदी तुटून पडले

आपण म्हणजे, मी ब्रसुद्धा काढला नाही.

आपला कर्मचारी संघटनाशी काय संबंध?

ते मग कॅथोलिकांच्या पाठीस हात धुवून लागले

अगदी… तरीपण मी काहीच म्हटलं नाही

मी प्रोटेस्टंट होतो

अखेरीस…

म्हणजे आता ते माझ्या मागे लागले आहेत

आणि काय

ह्यावेळेस अवाज उठविण्यासाठी

हाळी देण्यासाठी माझ्यासाठी काय

पण अगदी कुणासाठी कुणीच उरलं नाही…?

मूलतत्त्ववादाने जगभर आपले विद्रूप डोके वर काढले आहे आणि आपल्या ऑक्टोपसी पंजात सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा संकोच केला जात आहे. समाजात पद्धतशीरपणे उन्माद निर्माण केला जातो. भावना भडकावल्याजातात. हिंसाचाराची प्रकरणे घडतात आणि क्रिया-प्रतिक्रियाहा न्यायलावून हिंसेचे समर्थन केले जाते. हे सर्व आपण प्रत्यक्ष पाहात आहोत.अहिंसा परमो धर्म:ही आपल्या देशाची शिकवण आहे. संत तुकारामम्हणतात, ‘कुणाही जिवाचा न घडो मत्सर.नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत प्रत्येकाला जगण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. वाऱ्याची पेरणी करा आणि झंझावाताची कापणी करा’ (Saw the wind & reap the Whirlwind) अशी बायबलमध्ये एक म्हण आहे. म्हणून प्रभू येशूने क्षमाधर्माचा पुरस्कारकेला. हिटलरने द्वेषाच्या विखाराची पेरणी केली आणि त्याने हिंसेचे उदंडपीक घेतले. आर्य वंश सर्वश्रेष्ठहा विचार त्याने मांडला. तो विचारतत्कालीन जर्मन तरुणांना भावला. हिटलरने जर्मनी आणि युरोपच्या इतरदेशांमध्ये मिळूनमध्ये सुमारे साठ लाख ज्यूंचा संहार केला. एली वायझेलआणि व्हिक्टर फ्रँकेल यांच्यासारख्या काही विचारवंतांनी त्या नरकवासातूनबाहेर पडल्यावर छळछावण्यांतील क्रौर्याची वर्णने आपापल्या ग्रंथात केलीआहेत. ती वाचून आपल्या अंगावर शहारे येतात. हिटलरच्या काळी बहुसंख्य जर्मन विचारवंत गप्प बसले, परंतु डिआट्रिच बॉनहॉफर, जेम्स डेल्प आणि इतर काहीजण मात्र हिटलरच्या विरोधात उभे राहिले. त्याबद्दल त्यांना आपल्या प्राणांची किंमत मोजावी लागली… प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या कुणीही हिटलरच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करू शकत नाही. तो राक्षसीपणा होईल. ज्यांना हिटलरचे तत्वज्ञान मान्य आहे, ते माणुसकीचे मारेकरी असतात. विचारवंतांची निष्क्रियता हा विसाव्या शतकावरीलएक लााजिरवाणा कलंक आहे.

रोगाचे अचूक निदान झाले की, त्यावर जालीम इलाज करता येतात. आजच्या घडीला आपल्या देशाचे खरे शत्रू दुसरा धर्म, दुसरी जात, दुसरा देश नाही तर बेकारी, बरजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अतिवृष्टी,अनावृष्टी आणि दुष्काळ, ग्रामीण-शहरी ह्यांच्यातील वाढलेली दरी, धर्मांधताव त्यामुळे होणारे उत्पात इ. आहेत. आर्थिक क्षेत्रातील घसरण, बंद होतचाललेले उद्योगधंदे, लघुउद्योगांवर आलेली संक्रांत, त्यामुळे निर्माण झालेलेबेकारांचे तांडे व त्यांचे उद्ध्वस्त होत चाललेले संसार ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे समाजाच्या सहनशीलतेची हद्द होत आहे.

कवी गिरिजाकुमार माथुर म्हणतात,

सब्र करने की हद भी

एक दिन टूट जाती है

जब कुछ नहीं होता

तब क्रांति हो जाती है

आपले राज्यकर्ते त्याची वाट पाहात आहेत काय? सैतानाप्रमाणे क्रांती आपल्याच लेकरांचा घास घेत असते, हे आपण लक्षात ठेवू या. सत्य म्हणजे जणू एक तळपती तलवार असते. ते पवित्र असते. सत्य हीच महान साहित्यिकांची जीवनप्रेरणा असते. त्यामुळे अनेकांना विशेषत: लोकशाहीच्या विरोधकांना सत्य मानवत नाही आणि पचतही नाही.साहित्याच्या निर्मितीसाठी लेखकावर कुठल्याही प्रकारची बंधने नकोत. जेव्हा त्याच्यावर बंधने येतात, तेव्हा त्याचे लेखन पोपटपंची ठरण्याची शक्यता जास्त असते. लेखकाला हुजऱ्याची भूमिका पार पाडायची नसते; तर त्याला द्रष्ट्याच्या भूमिकेत जावे लागते. त्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नितांत आवश्यकता आहे. मातृभाषा हे आपल्यासाठी सहजसोपे असे अभिव्यक्तीचे साधन आहे.

००००

३. मातृभाषेस जिवे मारिले?

आपण आईच्या दुधातून आपल्या बोलीभाषेचे धडे घेतले. त्यानंतर अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मायबोलीतून आपले शालेय शिक्षण झाले आणि मायबोली मराठीशी आपली नाळ जुळली गेली. मातृभाषेबरोबरची नाळ तुटली की संस्कृतीपासून फारकत होण्यास फारसा वेळ लागत नाही. भाषा ही संस्कृतीकडे उघडणारी खिडकी असते. आपल्या अस्तित्वाचा अर्थ आपल्या अध्यात्म-जीवनात दडलेला आहे. खिस्ती अध्यात्म आणि धार्मिक जीवनाचा परिचय मला मराठीच्याच माध्यमातून झाला. चर्चमध्ये मराठी भक्तिगीते कानांवर पडली. आत्म्याचे पोषण करणारी येशूची वचने मराठीतून ऐकली. धर्मगुरूंनी मराठीतून केलेल्या बायबल निरूपणाचे धडे काळजाच्या कप्प्यात साठवले. थोडक्यात, आमचा आध्यात्मिक पिंड मराठीवर पोसला गेला. पडक्या किल्ल्याच्या बुरुजावर डौलाने वाढणाऱ्या पिंपळरोपट्याची मुळे जीवनाचाशोध करीत करीत धरणीमातेच्या गर्भात पोहोचावीत, त्याप्रमाणे मायबोलीच्या संस्काराची पाळेमुळे मराठी माणसाच्या अस्तित्वाच्या वंâदापर्यंत पोहोचली आहेत. मातृभाषेच्या परिचयामुळे ज्ञानोबांचे काव्यमय गीता-तत्त्वज्ञान, तुकोबांचे रांगडे अध्यात्म, जनाबार्इंची भावविव्हळ भक्ती, फादर स्टीफन्सनी केलेला शोकरसाचा हृदय हेलावणारा आविष्कार, शाहिरांच्या लावण्यांतून व्यक्त होणारा खट्याळ शृंगार, दलित साहित्यातून व्यक्त होणारी भळभळती वेदना या साऱ्यांचा आस्वाद मला मराठी भाषेतून घेता आला. किती परमभाग्ययोग आहे हा !

इंग्रजी माध्यमाचे आव्हान

१९८०च्या दशकात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची त्सुनामी देशभर आली. १९९१मध्ये आपल्या देशाने मुक्त आर्थिक धोरणाचा अवलंब केला. मुक्त बाजारपेठ आली. सर्व क्षेत्रांत स्पर्धा आली. राष्ट्राराष्ट्रांतील सीमारेषा पुसट झाल्या. ग्लोबलाइज्डजगामध्ये टिकून राहण्यासाठी इंग्रजी भाषा सर्वांना आवश्यक आणि अपरिहार्य वाटू लागली; कारण ती धनाची भाषा झाली होती. आपण मराठी माणसे तशी चतुर आहोत. आपण अगोदरच सोयीस्कर म्हणींचा साठा करून ठव्े ाला आहे. माय मरो नि मावशी जगो’, ही अशीच एक म्हण आहे. मराठी माय मरो नि इंग्रजी मावशी जगो’, असेच जणू आपण ठरवले आहे. इंग्रजी ही जागतिक संपर्काची भाषा आहे. तिच्यावर निश्चितच प्रभुत्व मिळवावे. आजच्या परिस्थितीमध्ये फ्रें, जर्मन, जपानी आदी इतर परदेशी भाषाही शिकाव्यात, कारण त्या आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक झाल्या आहेत. न्यूनगंडाच्या किंवा वृथा राष्ट्राभिमानाच्या आहारी जाऊन, ंग्रजी किंवा कुठल्याही भाषेचा दुस्वास करणे अयोग्य आहे. बहुभाषिक असणे ही आधुनिक काळाची गरज आहे. जगभर इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढतो आहे, हे सूत्र फ्रान्स, जर्मन,इटली, पोर्तुगाल, स्पेन इ. युरोपियन राष्ट्रांनी मान्य केले आहे. तथापिइंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडलेल्या नाहीत, तर ते आपल्या राष्ट्रीय भाषेतच शिकत आहेत. इंग्रजी शिकण्यासाठी ब्रिटनने सुलभ अभ्यासक्रम तयार केले आहेत. सट्टु ीच्या दिवसांत युरोपातील मुले त्या अभ्यासक्रमांचा लाभ घेतात व कामचलाऊ इंग्रजी शिकतात. याच धर्तीवर परदेशी नागरिकांनी फ्रेंच शिकण्यासाठी फ्रान्सने अलायन्स फ्रान्से व जर्मनीने जर्मन भाषा शिकण्यासाठी गटे इन्स्टिट्यूटसुरू केल्या आहेत व आपली भाषा परकीयांना दोन-तीन महिन्यांत शिकण्याची सोय केली आह.े त्या संस्थांच्या शाखा पुणे-मुंबईत आहेत. आपल्याकडे अन्य भाषकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी डेक्क्नकॉलेज निरनिराळे प्रयोग कर आहे. ोडक्यात शिक्षणाचे माध्यम आमल्ूाग्र न बदलतासुद्धा एखादी भाषा शिकता येते.

इंग्रजी भाषा शिकताना मायबोलीचा बळी का द्यावा? इंग्रजी भाषा महत्त्वाची असली, तरी ती मातृभाषेची जागा कधीच घेऊ शकत नाही, हे वास्तव आहे. इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढत गेले, तेव्हा देशातील शिक्षणतज्ज्ञ, भाषापंडित आणि शासन ह्यांनी एकत्र येऊन, मायबोलीचे संवर्धन करीत असताना, सुलभपणे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व कसे मिळवावे, यासंबंधी पर्याय शोधून काढायला हवा होता. त्यात ते कमी पडले. काही मोजक्या व्यक्तींनी तशा प्रकारचे प्रयोग सुरू केले. उदा. मायबोलीकडे दुर्लक्ष न करता इंग्रजी कसे अस्खलितपणे शिकता येते, हा प्रयोग मॅक्झिम बर्नसन ह्यांनी फलटणलाआपल्या शाळेत यशस्वीपणे राबवला. हसत-खेळत कसे शिकवावे, हे तंत्रही त्यांनी आपल्या शाळेला लागू केले. मी त्या शाळेला भेट दिली व तेथील विद्याथ्र्यांशी संवाद साधला. मी त्यांना विचारले, ‘तुम्हाला सुट्टी आवडते की शाळेत यायला आवडते?’ त्यांनी एकसुरात उत्तर दिले, शाळेत, शाळेत, शाळेत !मॅक्झिमबार्इंनी आपल्या मुलांना फक्त विषय शिकवले नाहीत, तर त्यांना शाळेचा लळा लावला. तसे प्रयत्न पुण्यालाही झाले; परंतु दुर्दैवाने ते लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले नाही. उलट इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी पालकांनी सोपा मार्ग स्वीकारला, तो म्हणजे बालवर्गापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा स्वीकार केला. प्रश्न माध्यमांचा नसून शिक्षणाच्या दर्जाचा आहे. तो दर्जा आपण मराठी माध्यमांच्या शाळांत सांभाळला आहे का?

पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांती मोहिनी पडली आहे. इग्रजांनीदीडशे वर्षे राज्य केल्यामुळे इंग्रजी भाषेचा पगडा शहरातल्या लोकांवरअजूनही आहे. त्यांच्या भाषेबरोबर त्यांच्या संस्कृतीचाही ! मे. पु. रेगे ह्यांनीआपल्या मधली स्थितीया लेखात म्हटले आहे की, आपण फक्त भाषा घेत नाही, तर तिच्याबरोबर आलेले पॅकेजही आपल्याला स्वीकारावे लागते.भाषेबरोबर संस्कृतीचे आदिबंध जोडलेले असतात. विशिष्ट भाषा ज्यासंस्कृतीमधून विकसित झालेली असते, ती त्या संस्कृतीमधील भल्या-बुऱ्यागोष्टी आपल्याबरोबर घेऊन येत असते. इंग्रजी भाषा ही पाश्चात्त्य संस्कृतीचीअग्रदूत आहे. उदा. इंग्रजी माध्यमातल्या मुलांनी आईनि बाबाहे शब्दहद्दपार केलेले आहेत, त्याऐवजी ते मम्मीआणि डॅडीअसे म्हणतात.त्याची काही जरूरी आहे का? अन्य भाषेतून मराठी शिकणारे त्यांच्यामातृभाषेतील संज्ञा बदलत नाहीत. आपणास ती गरज का भासते? कारणआपला न्यूनगंड ! मल्याळी, तमिळ, कोकणी, बंगाली आदी भाषक अवश्य इंग्रजी शिकतात, मात्र एकमेकांशी संवाद साधताना कटाक्षाने आपल्या मातृभाषेचाच वापर करतात. शिकले, सवरलेले शहरांतले लोक ज्या मार्गाने जातात, त्यांचेच अनुकरण बहुजन समाज करीत असतो. आज खेड्यापाड्यांपर्यंत इंग्रजी

माध्यमाच्या शाळांचे लोण पसरत आहे. याचे कारण पुण्या-मुंबईतील उच्चभ्रू समाजाने मराठी माध्यमाचा पूर्णपणे त्याग करून इंग्रजी माध्यमांच्याशाळांचा केलेला स्वीकार. त्याअर्थाने ते खरे मराठी भाषेचे मारेकरी आहेत.यांची मुले शिकून परदेशी जाणार आणि आमची मुले मात्र खेड्यांतच राहणार का? या भयगंडाने इतरांना पछाडले आह.े म्हणून खेड्यापाड्यांतीललोकांचा इंग्रजी माध्यमाकडे ओढा वाढला आहे. कारण त्यांच्यापुढे इंग्रजीभाषा सुलभपणे शिकण्याचा दुसरा पर्याय नव्हता.

 

मायबोलीचा प्रश्न

प्रत्येक लोकसमहू ाचे सांस्कृतिक ंचित असते. रीतीभाती, सणसोहळे भावभावना असतात. त्यांचा आविष्कार त्या त्या लोकसमुदायाच्या मातृभाषेतून होत असतो. त्या त्या भाषेच्या शब्दकळेतून, म्हणी-वाक्प्रचारांतून, लोकसंगीतातून संस्कृती व्यक्त होत असते. त्यासाठी मायबोलीचे संवर्धन करणे अत्यावश्यक असते. भाषेच्या माध्यमातून मनाच्या मातीत मूल्ये झिरपत असतात. नातेसंबंधाच्या धाग्यांची घट्ट वीण साधण्यासाठी भाषा मोलाचे योगदान देत असते. आपल्या देशात भाषावार प्रांतरचना हे सूत्र लावण्यात आले. हेतू हा की, त्या त्या राज्यातील मातृभाषेचा सर्व बाजूंनी विकास व्हावा. त्या दृष्टीने सुरुवातीला काही प्रयत्नही झाले. मात्र अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे स्तोमवाढल्यामुळे मायबोलीकडे दुर्लक्ष होत आह. जागतिकीकरणाच्या महापुरात अनेक वृक्ष कोसळून पडत आहेत. देशीवादाची पाळमुुळे उखडली जात आहेत. ज्यांच्या अबोध मनात न्यूनगंडाने घर केले आहे, ते सहज परक्या संस्कृतीला बळी पडतात आणि हळूहळू त्यांना आपल्या अस्मितेचा विसर पडतो. आज पाश्चिमात्य संस्कृतीने जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापली आहेत. अशा वेळी आपल्या देशीपणाचे, आपल्या मायबोलीचे जतन करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. एकेकाळी बीबीसीचे भारतातील प्रतिनिधी असलेले मार्क ली हे ब्रिटिश पत्रकार सांगतात, ‘तुम्हांला एखादा समाज नष्ट करायचा असेल, तर त्याची मातृभाषा नष्ट करा.’ (If you want to destroy a people, destroy it’s language). मायबोलीची हेळसांड करून आपण निराळे काय करीत आहोत?

 

मराठीच्या अस्तित्वाचा लढा

निझामशाहीत मराठी भाषेची गळचेपी होत होती, तेव्हा (१९४३साली) श्री. म. माटे म्हणाले होते, ‘‘आपली मातृभाषा जितक्या ठिकाणांहून हाकून देता येण्यासारखी आहे, तितक्या ठिकाणांहून तिची हकालपट्टी होत आहे. मराठीच्या शाळा बंद होत आहेत. राजदरबारी तिला कसलीही प्रतिष्ठाउरलेली नाही.’’ ही स्वातंत्र्यपूर्व काळातली व्यथा.

स्वातंत्र्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे १९५७ साली झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना श्री. वि. द. घाटे यांनी एक स्वप्न रंगवले होते. ते म्हणाले होते, ‘‘माझी मायमराठी भाषा महाराष्ट्राच्या सिंहासनावर बसली पाहिजे आणि तिने प्रेमाने भरवलेला घास आमच्या सर्वांच्या पोटात गेला पाहिजे.’’

१९६० साली महाराष्ट्राला सिंहासन लाभले. मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आले, तरी मराठी भाषेला सिंहासन लाभले का? या प्रश्नाचे उत्तर १९८९ साली झालेल्या जागतिक मराठी परिषदेत सापडते. परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना कवी कु सुमाग्रज गहिवरून म्हणाले,‘‘स्वातंत्र्याच्या चाळीस आणि राज्यस्थापनेच्या पंचवीस वर्षांनंतरहा,r मराठीला आपले हक्काचे सिंहासन अद्याप मिळालेले नाही आणि ते मिळत नाही याचे कारण ते रिकामे नाही. या मातीशी कोणतेही नाते नसलेल्या एकापरकीय भाषेने, इंग्रजीन ते बळकावले आहे. आज मराठी भाषा लक्तरांमध्येमंत्रालयाच्या दाराशी उभी आहे.’’ भाषा केवळ व्यवहाराचे नियमन करणारेनिर्जीव साधन नाही, ती भावभावनांच्या प्रकटीकरणाची जातिवंत वस्तुस्थितीआहे, हे आपण केव्हा लक्षात घेणार आहोत?

अव्वल इंग्रजी काळात उच्चभ्रू वर्गाने इंग्रजीच्या बळावर सरकारी नोकऱ्यामिळवल्या. इमानेइतबारे त्यांनी परक्या सरकारची सेवा केली. दुसऱ्याबाजूला परकीय मिशनरी मात्र मराठी भाषेची सेवा करीत होते आणि

मराठी भाषेमध्ये लेखन करीत होते. उदा. मोल्सवर्थचा शब्दकोश (१८३१).विल्यम कॅरी ह्यांनी मराठी भाषेचे व्याकरण १८०५मध्ये लिहिले. त्यांनीवैजनाथ पंडित ह्यांच्या सहकार्याने मॅथ्यूचे शुभवर्तमानहे बायबलमधील

पुस्तक देवनागरी लिपीत बंगालमधील सेरामपूर येथून प्रसिद्ध केले. त्यांनी१८१५मध्ये कोकणीतही हेच शुभवर्तमान प्रसिद्ध केले. विल्यम कॅरीप्रमाणे थॉमस कँडीनेही मराठी भाषेची केलेली सेवा मोलाची आहे. त्याने विरामचिन्हांची परिभाषाहे पुस्तक १८५० साली प्रसिद्ध केले, तसेच त्याने मराठी भाषेमध्ये पाठ्यपुस्तकेही लिहिली. मिशनऱ्यांच्या मराठी साहित्याचा सविस्तर परिचय डॉ. श्री. म. पिंगे, डॉ. गंगाधर मोरजे ह्यांनी मराठी वाङ्मयाचा अभ्यासह्या आपल्या ग्रंथात करून दिलेला आहे. बाबा पद््मजींनी (१८३१ ते १९०६) शब्द रत्नावलीहा कोश लिहिला, तसेच संस्कृत-मराठी कोश तयार केला. त्यांनी म्हटले आहे, ‘सर्वांस इंग्लिश भाषेने वेडावून टाकले आहे. त्यांचा मातृभाषेबाबत अभिमान व प्रेम कमी व ती शुद्ध रीतीने बोलणे व लिहिणे याबाबत उपेक्षा वृत्ती फार. हायस्कूलांतून सर्वच विषय इंग्रजीतून शिकवितात. त्यामुळे मूल जसे लहानाचे मोठे होते, तसे त्यास इंग्रजी भाषेचा संबंध अधिक जडतो. इंग्रजीचा अधिक प्रभाव राहतो व मराठीची उपेक्षा होते.

इंग्रजीबद्दल अहंगंड व मराठीबद्दल न्यूनगंड हा आजार खूप जुना आहे. साहेब गेल्यावरही, साहेबांच्या भाषो fवषयी अतिप्रेम आणि स्वत्वाविषयीसुप्त न्यूनगंड उच्चवर्णीयांत कायम आहे. त्याला आपल्या पोटापाण्याचीआणि नोकरीधंद्याची फार मोठी काळजी. आज इंग्रजी उपयुक्त आहे म्हणूनइंग्रजी माध्यमाच्या शाळांपुढे लांबलचक रांगा लागलेल्या दिसतात.

परभाषेच्या माध्यमामुळे भाषा आणि संस्कृती यांच्यावर विपरीत परिणाम होतोच. परंतु त्यापेक्षा एक मोठे संकट देशावर ओढवते आहे, ते म्हणजे देशाच्या अभंगत्वाला सुरुंग लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

आहे रेआणि नाही रेअसे दोन वर्ग देशात आहेत. आहे रेहे इंडियाचे(रेसिडेंट) सिटिझन, तर नाही रेहे भारताचे साधेभोळे नागरिक. इंग्रजीमाध्यमाच्या शाळांतील विद्यार्थी हे इंडियातील असतात. इंग्रजी शाळांत

प्रवेश मिळवणे हे त्यांच्यापुढील एकमेव ध्येय असते. महागडी कॅपिटेशन फी त्यांनाच परवडते. सुटाबटु ांतील ती मुले सहलीसाठी परदेशांतही जातात.याउलट, भारतातील मुलांच्या काही शाळांत, अजून खडूफळा पोहोचलेलानाही. उच्चभ्रू शाळांतील मुले पॉकेटमनी म्हणून जितका खर्च महिन्यालाकरतात, तितके या गरीब मुलांच्या या पालकांचे माासिक उत्पन्नसुद्धा नसते. भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षा इंडिया-भारत ही फाळणी अधिक घातक आहे. मायबोली मराठीवर आपले आतड्यापासून प्रेम आहे का? हा खरा प्रश्न आहे. ज्याच्यावर आपले प्रेम असते, त्याच्यासाठी आपण कुठलाही त्याग करण्यास, दिव्य करण्यास, अगदी प्राण द्यायला सुद्धा तयार असतो. सगळा न्यूनगंड दूर सारून, आपल्या ओठांनी नव्हे, तर आत्म्याने मराठीत बोलू या आणि मुला-नातवंडांशी मराठीत संभाषण करू या. त्यामुळेच त्यांना मायबोलीची गोडी लागेल.

मायबोलीवर कसे प्रेम कराव,े हे गोव्यातील कोकणी भाषक लोकांकडूनआपण शिकू शकतो. गेल्या पन्नास-साठ वर्षांत कोकणी भाषकांनी आपल्यामायबोलीला वैभव प्राप्त करून दिले आहे. शासनाकडे आशाळभूत नजरेने न पाहता, प्रसंगी शासनाची उदासिनता असतानाह त्यांनी कोकणी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. स्वबळावर पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली. व्याकरणाची पुस्तके उपलब्ध नसताना, श्री. सुरेश बोरकार ह्यांनी व्याकरण रचले. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि विश्वविद्यालयीन स्तरांवर कोकणी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्याविद्यार्थ्यांच्या संख्येत सारखी वाढ होते आहे. प्राथमिक शाळेत कोकणी माध्यम आणि पुढे इंग्रजी माध्यम असा प्रयोग गोव्यात सुरू आहे.

वयाच्या सातव्या वर्षांपर्यत जे संस्कार होतात, ते धन आयुष्यभर पुरत असते. ह्याच वयात मातृभाषेचा संस्कार झाला पाहिजे, ह्याची जाणीव जगात सर्वत्र आहे म्हणून मूठभर आशियाई देश साडे ले (त्यात भारत आघाीवर आह)े , तर सर्वत्र मायबोली हेच शिक्षणाचे माध्यम आहे. तिथे दुय्यम भाषा म्हणून अन्य भाषा आवडीने शिकवल्या आणि शिकल्या जातात.मायबोलीच्या संवर्धनाचे आणखी एक उदाहरण. इसवी सनाच्या पहिल्या शतकात इस्राएलमध्ये झालेल्या परकीय अत्याचारामुळे मोठ्या प्रमाणात ज्यू लोक जगभर पांगले गेले. ते त्या त्या देशाच्या संस्कृतीशी एकरूप झाले. त्यांनी स्थानिक भाषा अवगत केल्या. त्यांच्या प्रार्थना मात्र हिब्रू भाषेत होत असत. १९४८ साली इस्राएलला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर जगभर विखुरलेले ज्यू लोक इस्राएलला परतू लागले. त्या सर्वांना एकत्र ठेवून संस्कृ तीऐक्य कसे साधावे, असा प्रश्न तत्कालीन शासनाला

पडला. म्हणून त्यांनी प्राचीन हिब्रू भाषेचे आधुनिकीकरण केले. एक माणूसआपल्या जिद्दीच्या बळावर कसे आपल्या प्राचीन भाषेचे पुनरुज्जीवन करूशकतो हे आपल्याला एलिझेर बेन यहुदा यांच्या टंग ऑफ द प्रॉफेट्सयाचरित्रावरून जाणवते. हिब्रू भाषा ही इस्राएलची राष्ट्रभाषा असून ती त्यांचीसंपर्क भाषा आहे. त्यांचे इंग्रजीवरही प्रभुत्व आहे. कोकणी आणि हिब्रू ह्या भाषांनी आपले अस्तित्व टिकवले, त्यासाठी त्यांना भगीरथ प्रयत्न करावे लागले. आपल्यालाही मातृृभाषेचा बळी न देता इंग्रजी शिकता येईल की नाही? इच्छा असेल तर अशक्य असं काहीच नाही. जी मुले मातृभाषेत अस्खलितपणे वाचन करू शकतात, ती नंतर इंग्रजीतही चांगली प्रगती करतात. झांबिया देशाने केलेल्या प्रयोगाचे उदाहरण घेऊ या. त्या प्रयोगानुसार, काही निवडक मुलांना पहिल्या इयत्तेत इंग्रजी व मातृभाषेचे धडे देण्यात आले, तर इतर मुलांना पहिल्या इयत्तेत फक्त मायबोलीचे आणि दुसऱ्या इयत्तेपासून इंग्रजीचे शिक्षण देण्यात आले. त्यानंतर निरीक्षण केल्यावर आढळून आले की, पहिल्या इयत्तेत ज्यांना दोन भाषा शिकवल्या गेल्या त्या मुलांपेक्षा, ज्यांना पहिल्या इयत्तेत फक्त मायबोली आणि दुसऱ्याइयत्तेपासून इंग्रजी शिकवण्यात आले त्यांनी इंग्रजी वाचन आणि लेखन या दोन्ही बाबतींत लक्षणीय प्रगती केली. तसेच त्यांचे मातृभाषेचे ज्ञानही मोठ्या प्रमाणात वाढले. झांबियन शासनाने ही पद्धत नंतर संपूर्ण देशाला लागू केली.

बालवर्गापासून मायबोली मराठीचे बाळकडू पाजणे हाच मराठी वाचवण्याचा रामबाण उपाय आहे. त्याला पर्याय नाही.

ट्यूशन संस्कृती

वाचन संस्कृती मंदावली आहे, अशी सर्वत्र ओरड आहे. त्याची अनेक कारणे असू शकतात. शिक्षणाचे माध्यम बदलले. वर्गात इंग्रजीत शिकवलेले मुलांनाफारसे समजायचे नाही. त्यासाठी ट्यूशनची गरज भासू लागली. कारणघरातील व व्यवहारातील भाषा मराठी अन् शाळेतील भाषा इंग्रजी आणि सर्व विषय इंग्रजीत. मुलांची इंग्रजी शब्दसंपत्ती अतिशय मर्यादित, त्यामुळे त्यांना शिकणे अवघड झाले. पालकांना चिंता लागली आणि इंग्रजीवर तितके प्रभुत्व नसल्यामुळे ते इंग्रजी शिकवणी घेऊ शकले नाहीत. आणि ट्यश्ून संस्कृती उदयास आली. हळहू ळू तो जोड धंदा बनला. त्याचे व्यापारीकरण झाले. त्याला संस्थात्मक रूप प्राप्त झाले व त्यातून ट्यूशनसम्राट निर्माण झाले. लाखो रुपयांची पॅकेजेस जन्माला आली.

ट्यूशनसंस्कृतीचे अजन्ू ा एक कारण म्हणजे शाळा-महाविद्यालयातील शिक्षणाचा घसरलेला दर्जा. ट्यूशन-सम्राटांनी शाळेतील उत्तम शिक्षकांनाआपल्याकडे ओढले. ते वर्गात थातुरमातुर शिकवायचे आणि ट्यूशनवर्गात

मात्र जीव ओतून शिकवू लागले. शाळा-महाविद्यालय आणि ट्यूशनवर्गह्यांतील फरक विद्याथ्र्यांना जाणवला. आता तर इंटिग्रेटेड कॉलेजहा नवाप्रकार चालू झाला आहे. ही पद्धत म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस आहे. त्यात

सामील झालेले सारे शिक्षक व प्राध्यापक ह्यांना शिक्षकदिनी आणिगुरुपाौर्णमेला गुरु: साक्षात परब्रह्मम्हणून विद्याथ्र्यांकडून स्वत:भोवती आरती ओवाळून घेताना काहीच वाटत नसेल का? ट्यूशनसंस्कृतीमुळे बिचाऱ्या पालकांवर लाखो रुपयांचा भार पडतो आहे. म्हणजे शिक्षण ही फक्त श्रीमंतांचीच क्तेदारी बनली आहे.

युरोपात कुठेही मुलांसाठी ट्यूशन्स लावल्या जात नाहीत, कारण खाजगी किंवा सरकारी शाळांचा दर्जा सारखाच आहे. पालक आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवण्याचा प्रयत्न करतात, कारण खाजगी शाळांची फी अव्वाच्या सव्वा असते. तसेच तेथे पालकांसाठी ट्यूशन्स असतात, पण त्या सुजाण पालकत्वासाठी! आता बिगरीपासून डिगरीपर्यंत ट्यूशनशिवाय मुलांचे पान हलत नाही. त्यामुळे मुलांचा सगळा वेळ निरनिराळे छंदवर्ग, शाळा-महाविद्यालय व ट्यूशन वर्गात जातो. पावसात भिजायचे त्यांचे वय निघून जाते आहे. त्यांना ना अवांतर वाचनासाठी वेळ, ना खेळासाठी वेळ. हा मुलांवर केला जाणारा जुलूम आणि अत्याचार आहे. या जुलमाचे वाटेकरी पालक, शासन आणि ट्यूशनसम्राट आहेत. आपल्याला ट्युशनमुक्त भारत कसा करता येईल? निदान ट्यूशनमुक्त रविवार तरी करता येईल का? म्हणजे मुलांना पालकांच्या आणि पालकांना मुलांच्या संगतीत एक दिवस तरी घालवता येईल. पालकांनी मुलांसाठी वेळ काढून ठेवला पाहिजे.

पालक आणि मार्कांचा बुडबुडा

मुलांची स्थिती आज शर्यतीच्या घोड्यासारखी झाली आह.े घोड्यावरज्यांनी पैसे गुंतवले आहत्े ा, त्यांना आपला घोडा पहिला यावा, असे वाटते; पण घोड्याला तसे वाटते का? आपल्या मुलाने ९८ टक्के , ९९ टक्के मार्क मिळवावेत, त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा व परदेशातजाता यावे, ही पालकांची इच्छा असते. या संदर्भात डॉ. अमर्त्य सेन ह्यांचे मत लक्षणीय आहे. ते म्हणतात, ‘‘भारतात पहिला येणाऱ्याचे फाजील लाड होतात. भारतामध्ये आय. टी., आय. ए. एस., डॉक्टर, इंजिनियर, सी.ए. ह्यांना विशेष भाव आहे. त्यासाठी पालकांचे प्रयत्न चाललेले असतात. त्यामुळे पहिला क्रमांक हे भारतीयांचे सामाजिक वेड झाले आहे’’

ह्या वेडामुळे पालकांना वाचनसंस्कृतीचे काहीही पडलेले नाही. डॉ. अमर्त्य सेन ह्यांच्या ह्या मार्मिक चिंतनाकडे आपण कधी लक्ष देणार आहोत? मुलांचा कल जिकडे असतो, त्याविषयात त्यांना रस असतो. एखादा कमी गुण मिळालेला मुलगा आयुष्यात आपल्या आवडीच्या क्षेत्रात नावही काढू शकतो. ह्या गुणांच्या स्तोमाचा प्रभाव प्रसारमाध्यमांवरही पडत आहे. त्यांची छायाचित्रे पहिल्या पानावर प्रसिद्ध करून बालवयामध्ये त्यांना अवास्तव प्रसिद्धी दिली जाते. कधीकधी दहावी-बारावीत प्रथम आलेल्या मुलांची ही धुंदी पुढच्या प्रवासात उतरते. अशा उच्च गुण मिळालेल्या मुलांचे काही संस्था गुणवंतांचे सत्कारह्या नावाखाली सत्कार करीत असतात. अशा किती गुणवंतांनी पुढे देशाची, गोरगरिबांची सेवा केलेली आहे? अण्णा हजारे ह्यांनीनापासांची शाळाहा वेगळाच प्रयोग चालू केला आहे. तथाकथितगुणसम्राट विद्याथ्र्यांचा गौरव करण्याऐवजी ज्यांचा बुद्ध्यांक कमी आहे,त्यांना इतरांबरोबर वर कसे आणता येईल, याचा विचार करणे आवश्यकआहे.

००००

४. मराठीच्या बोली

 

बोलीभाषा हे मातृभाषेचे निर्झर आहेत. बोली ही जीवनपद्धतीचा आविष्कार असते. त्या संस्कृतीच्या पाऊलखुणा असतात. बोलीला आणिसमाजजीवनाला विभक्त करता येत नाही. आपल्या मातीचा गंध घेऊनयेणारी बोली मातेच्या गर्भाशयाचे जणू अस्तर असते. शब्दकोश ह्या शब्दाचा अर्थ असा की कोश जसा एखाद्या किटकाच्या गर्भातील तंतूपासून निर्माण होतो आणि त्यातूनच नवा जीव जन्माला येतो. तसेच आईच्या गर्भकोशातून बाळ जन्माला येते. ती ज्या संस्कृतीत वावरते, ज्या भाषेत विचार करते त्याच भाषेत बाळ बोलू लागते आणि परिसराच्या परिणामातून त्याची भाषा जन्माला येते. त्यातून भावनांची अभिव्यक्ती होऊ लागते आणि सांस्कृतिक शब्दकोश विणला जाऊ लागतो. भाषेच्या अंकुराचा शाध्े ा घेण्याचाप्रयत्न मोल्सवर्थ (१७९५ – १८७१), जॉर्ज आब्राहाम ग्रिअर्सन (१८५१ १९३९) आणि अलीकडे गणेश देवी (१९५०) इत्यादींनी आपल्या भाषाशास्त्रीय अभ्यासातून केलेला आहे. शब्दकोश तयार करून आपल्या तळपातळीचा शोध त्यांनी घेतलेला आहे. येथेच आपल्या संस्कृतीच्या खुणा आपणास सापडतात. महाराष्ट्रामध्ये शेकडो बोली भाषा आहेत. ह्या बोली मराठी नामकमहानदीचे झरे आणि ओढे आहेत. ह्याचे प्रत्यंतर बोली भाषांमधून आणि

बोलींमधून विशेषकरून दिसून येते. आपल्या एका गीतात बहिणाबाई चौधरी म्हणतात,

माय म्हणता म्हणता होट होटालागी भिडे ।

आत्या म्हणता म्हणता केवडं अंतर पडे ।

ताता म्हणता म्हणता दातांमधी जीभ अडे ।

काका म्हणता म्हणता कशी मांदे मांदे दडे ।

जिजी म्हणता म्हणता झाला जिभेले निवारा ।

सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा ।

भारतीय संस्कृती कुटुंबवत्सल आहे. नात्यागोत्यांच्या जाळ्यात आपण वावरत असतो. त्याचे प्रत्ययकारी प्रतिबिंब या गीतात पडले आहे.

प्रतिभावंत बहिणीबाईनी नात्यातील जवळीक किंवा दुरावा उच्चारांवरूनगमतीदारपणे स्पष्ट करून दाखवला आहे. इंग्रजीने कजन’ (cousin) याएका शब्दात सर्व नात्यांची एक मोळी बांधली आहे. मराठीत मात्र प्रत्येकनात्याचे वेगळेपण दाखवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ही आमचीभाषिक श्रीमंती नाही का? बहिणाबाईच्या या गीताचे इंग्रजीत भाषांतर करतायेईल का? प्रत्येक भाषेचे आणि बोली भाषेचे अशा प्रकारचे अंगभूत सौंदर्यआहे. त्यामुळे सांस्कृतिक वारसा अधिक संपन्न होत असतो. नदीप्रमाणे संस्कृती गतिशील असते. आपल्या मूळ स्वभावाशी एकनिष्ठ राहून, ती नवनवे बदल स्वीकारीत असते आणि असे करून अधिकाधिक संपन्न होत असते. भाषेचेही तसेच आहे. हे सूत्र ब्रिटिशांनी जपले. त्यांनी सर्व भाषांमधून उधारउसनवारी करून त्यांची भाषा संपन्न केली आणि आजमितीसही ते करीत आहेत. मराठीमध्ये प्रमाण भाषेच्या शुद्धीसाठी प्रयत्न झाले. दरवर्षी इंग्रजी भाषेमध्ये परक्या भाषेतून घेतलेल्या शब्दांची यादीच प्रसिद्ध केली जाते व ती त्यांच्या शब्दकोशात समाविष्टही केली जाते. उदा. बंदोबस्त, गुरू, योग, ठग हे भारतीय मराठी शब्द.

 

भाषाशुद्धी की भाषावृद्धी?

आपल्याला भाषाशुद्धी पाहिजे की भाषावृद्धी पाहिजे? भाषेचा कल नेहमी सुलभीकरणाकडे असतो. स्टेशनह्या शब्दासाठी अग्निरथविश्रांति स्थळ असा शब्द भाषा शुद्ध करणाऱ्यांनी सुचवला होता, त्याचे काय झाले? ग्रामीण भाषेमध्ये त्याऐवजी ठेसनअसे म्हटले जाते, तर उत्तरेकडे इस्टेशनअसे बोलले जाते. डेक्कनक्वीन जेव्हा धावू लागली, तेव्हा रेल्वेकामगार म्हणायचे, ‘डाकीणआली. डाकीणहा शब्द किती सार्थ शब्द होता ! राक्षसिणीसारखी ती धाडधाड धावत जायची. आपल्याकडे परकी शब्दांना पर्यायी शब्द काढण्याऐवजी त्याचे आपण सरसकट भाषांतर के ले व त्याला आपण भाषाशुद्धी हे नाव दिले. अभिजनांवर संस्कृत भाषेचा पगडा होता. पंडिता रमाबाई ह्यांनी हिब्रू आणि ग्रीक भाषांमधून बायलबचेमराठी भाषांतर के ले. ते संस्कृत प्रचर झालेले आहे. त्यामुळे ते दुर्बोध वाटते. संस्कृतला देववाणी म्हटल्यामुळे प्राकृत भाषांकडे तुच्छतेने पाहिलेगेले.

संस्कृतवाणी देवे केली

प्राकृत काय चोरापासूनी आली?

असा सवाल एकनाथांना विचारावा लागला. संस्कृत ही एक प्राचीन भाषा आहे आणि इतर प्राचीन भाषांप्रमाणे

तिचेही अंगभूत सौंदर्य आहे. भारतात ती उच्चवर्णीयांची भाषा होती. एकप्राचीन भाषा म्हणन्ू ा तिचे जतन अवश्य व्हावे, परत्ं ाु ती कु णावरही लादण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. जेव्हा भाषा लादली जाते तेव्हा प्रतिकार होतो. संस्कृतच्या दबदब्यामुळे पाली आणि अर्धमागधी ह्या भाषा विकसित झाल्या.

बोली भाषांचे भांडार

मराठी भाषा संपन्न करण्यासाठी बोली भाषांचे खूप मोठे भांडार आपल्या पदरी आहे. शुद्ध भाषा आणि अशुद्ध भाषा असा भेदभाव केल्यामुळेआपल्या बोली अंधारात राहिल्या. परंतु आपल्या पूर्वजांनी विशेषत: स्त्रियांनी, बोली भाषेतील लोकगीतांद्वारे तिचे जतन केले आहे. खरे म्हणजे भाषेला मातृभाषा असे म्हटले जाते, कारण आपल्या पोटच्या पोराप्रमाणे स्त्रिया आपल्या भाषेचे संगोपन व संवर्धन करीत असतात. प्रमाण भाषेचा आग्रह आणि त्यानंतर इंग्रजीचे आगमन ह्या प्रकारामुळे बोली भाषेत संभाषण करणे हे अनेकांना कमीपणाचे वाटते. वास्तविक प्रमाण भाषा ही कधी एकेकाळी बोली भाषाच होती ना? बोली भाषांमध्ये शब्दांचे फार मोठे भांडार दडलेले आहे. त्या शब्दसंपत्तीच्या खाणी आहेत. मराठी भाषेने आता आपल्या बोली भाषांतून शब्दसंपत्ती स्वीकारण्याची वेळ आलेली आहे आणि अशा बोली भाषांच्या शब्दांचे व म्हणींचे कोश तयार झालेले आहेत. उदा. सामवेदी (कुपारी) ही माझी बोली भाषा. सामवेदी बोलीमध्ये म्हणींचे संपन्न भांडार आहे आणि ते लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. उदा. सक्की आय अन वडापिपळाई हाय, हवतार आय आन ताडामाडायी हाय’ (सख्खी आई म्हणजे वडापिंपळाची सावली, सावत्र आई म्हणजे ताडामाडाची सावली.) तसेच पुढच्याच ठेच मागचा शहाणाया म्हणीसाठी सामवेदी भाषेत म्हटले आहे. पुडश्याओ तुटल्यो वानो, मागसो जालो शानो.’ (पुढच्याच्या तुटल्या वहाणा, मागचा झाला शहाणा.) मराठी भाषेनेदेखील सोवळ्याओवळ्यातून बाहेर पडून, अन्य भाषाभगिनींकडून आणि विशेषत: बोली भाषांकडून चपखल प्रतिशब्दांचा स्वीकार करायला हवा. आमच्या वसई तालुक्यात दर दहा मैलांवर बोली भाषा बदलते. उदा. कुठे चाललासह्या प्रमाण भाषेतील शब्दांसाठी वाडवळी भाषेत कटे सालला?’, सामवेदी भाषेत कडे साललो?’ वलकर भाषेत कंला चालला?’ आणि कोळी भाषेत तू कंय चालला?’ अशीविविधता सापडते. भाषा-अभ्यासकांच्या अंदाजानुसार जवळजवळ सहा हजार भाषा व असंख्य बोली अस्तित्वात आहेत. जर योग्य उपाययोजना केली नाही तर येत्या शतकभरात चार हजार भाषा व त्याहून अधिक बोली संपून जातील. मराठीलाही तोच धोका आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

बोली भाषांचा अभ्यास

महाराष्ट्रात गणेश देवी ह्यांनी भारतीय भाषांचे सर्वेक्षण करून बोलींच्या अभ्यासाचा प्रकल्प पूर्णत्वास नेला. त्यामध्ये महाराष्ट्रातील ६० बोलींचा स्वतंत्र खंड आहे. त्या अत्यंत अभ्यासपूर्ण ग्रंथाचे संपादन श्री. अरुण जाखडे ह्यांनी केले आहे. डॉ. अशोक केळकर, डॉ. ना. गो. कालेलकर ह्या भाषाशास्रज्ञांनी मराठीला आधुनिक भाषाविज्ञानाची ओळख करून दिली. डॉ. हरिश्चंद्र बोरकर ह्यांनी बोलीविषयीचा अभ्यास मांडलेला आहे. बोलींचे महत्त्व ओळखून आज पाठ्यपुस्तकातही त्यांचा समावेश होत आहे. मराठी साहित्यात अनेक कथा, कादंबरीकारांनी वऱ्हाडी, वाडवळी, सामवेदी, मालवणी आणि बोली भाषांचा आपल्या साहित्यात यशस्वीपणे वापर केला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही बोली भाषा जिवंत राहाव्यात म्हणून प्रयत्न केले जातात. उदा. लॅटिन अमेरिकेमध्ये सुमारे ८० लाखांपेक्षा जास्त केचुआह्या बोली भाषेतून व्यवहार करतात. ह्या भाषेला स्वतंत्र लिपी नव्हती. पण १९७५ पासून पेरू देशामधील सरकारने प्रयत्न करून रोमन लिपीतून ह्या भाषेचे लिखित स्वरूपात पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रोक्साना क्युसो कोलान्तेस हिने केचुआभाषेचा अभ्यास

करून त्या भाषेमध्ये पीएच.डी.चा प्रबंध सादर केला आहे. भाषेची मुळं निवडुंगासारखी असतात. ती खूप खोल पोहोचलेली असतात. त्याप्रमाणे मायबोलीची मुळे आपल्या अबोध मनाच्या कोशामध्ये गेलेली असतात. ती उपटून काढता येत नाहीत. परिस्थितीमुळे व्यवहाराच्या भाषेमध्ये बदल झाला तरी भाषा बोलीच्या रूपाने आपल्या काळजाच्या कोशात ती जाऊन बसलेली असते. उदा. वसई-मुंबईतील वळकर किंवा ईस्ट इंडियन बोली. हा समाज मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांच्या सेवेत होता. काहींनी वसई-उत्तनमधून मुंबईला स्थलांतर केले. मात्र त्यांना आपल्या वळकर बोलीचा मळु ीच विसर पडला नाही. वळकर भाषेतील लोकगीतांच्या दरवर्षी स्पर्धाही होतात. यावरून काय दिसून येते? बोलीला मरण नाही. आपणही जर प्रयत्न केले, बोली भाषेशी एकनिष्ठ राहिलो, तर कुठलीही भाषा नष्ट होत नाही. त्यासाठी अथक प्रयत्न मात्र करावे लागणार आहेत आणि ते तसे होत आहेत, ही आशादायक बाब आहे.

००००

५. लेखन, अनुवाद आणि प्रकाशन

आज महाराष्ट्रातील तळागाळातील घटक साक्षर होऊ लागले आहेत.ज्ञान ही शक्ती आहे, ह्याचा अनुभव ते घेत आहेत. ते शब्दांद्वारे व्यक्त होऊलागले आहेत, डोंगरदऱ्यांतून, शेताशिवारांतून, गिरण्याकारखान्यातून मराठीसाहित्याला नवनवे अंकुर फुटू लागले आहेत. मराठीच्या भवितव्याच्यादृष्टीने हे शुभचिन्ह आहे. अलीकडे काही नवोदित लेखकांना साहित्यअकादमीचे युवा पुरस्कार मिळत आहेत. राज्य परुस्कार व साहित्य अकादमीचे युवा पुरस्कार मिळालेले काही नवे लेखक, कवी हे पेशाने शेतकरी आहेत. त्यांना त्यांच्या साहित्याचे विषय, त्यांच्या कसत्या जमिनीतून आणि उन्हातगाळलेल्या घामातून स्फुरतात. सध्या मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जाते आणि शहराकडे पाहिले तर ते खरे वाटू लागते. परंतु महाराष्ट्र खूप मोठा आहे, व्यापक आहे. तिथे मराठी साहित्याच्या निर्मितीसंबंधी नवनवे प्रयोग चालू आहेत. ही अतिशय स्वागताची बाब आहे. अशा प्रयत्नांना प्रोत्साहन द्यायला हवे. लेखक, कवी हे काही प्रयोगशाळेत तयार केले जात नाहीत. तरीदेखील नवोदित लेखकांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. याबाबत काही प्रकाशनसंस्था तीन-तीन दिवसांच्या लेखन कार्यशाळा आयोजित करतात. त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. नामवंत लेखक आणि प्रकाशक त्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे त्यांना लिहिण्यासाठी दिशा सापडू शकते. अनेक संस्था निबंध, कथा, व कवितांच्या स्पर्धा घेतात. होतकरू लेखकांकडून लेखन करवून घेतात. ह्या लेखनस्पर्धांमध्ये इंग्रजी माध्यमातील मराठी भाषक विद्यार्थीदेखील सहभाग घेऊन उत्कृष्ट लेखन करतात. काही दिवाळी अंंकांमध्ये कादंबऱ्या प्रसिद्ध होतात. नंतर त्या पुस्तकरूपाने बाहेर येतात. लेखनसंस्कृती वाढविण्यासाठी हे सर्व स्तुत्य उपक्रम आहेत.

अनुवाद संस्कृती

जागतिकीकरणामुळे जगाला एका खेड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आपले अनेक मराठी तरुण-तरुणी परदेशात नोकऱ्या करीत आहेत आणि तिथे वास्तव्य करून राहत आहेत. इंग्रजी, अन्य युरोपियन भाषांतून इंग्रजीत भाषांतरित झालेल्या पुस्तकांची भांडारे त्यांच्यासाठी खुली झाली आहेत. त्यात वाचलेले आणि भावलेले उत्कृष्ट साहित्य हे लेखक, कवी मराठीमध्ये अनुवादित करीत आहेत. केल्याने भाषांतर हे अनुवादाला वाहिलेले मासिक, आंतरराष्ट्रीय साहित्याचा मराठी वाचकांना परिचय करून देते. काही मराठी प्रकाशक उत्कृष्ट अनुवादकांचा शोध घेऊन त्यांच्याकडून उत्तमोत्तम साहित्याची पुस्तके मराठीत प्रकाशित करीत आहेत. दिलीप चित्रे, चंद्रकांत बांदिवडेकर, शांता गोखले आदींचे अनुवादाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. गेल्या वर्षी (२०१९) मूळ स्पॅनिश लेखक रोबेर्तो आल्र्ट ह्यांच्या Los Siete Locos’ ह्या स्पॅनिश पुस्तकाचा अक्षय काळे ह्यांनी तर सात विक्षिप्त माणसेह्या नावाने सरळ मराठीमध्ये अनुवाद केला आहे (प्रकाशक – लोकवाङ्मय प्रकाशन). मराठी लेखक विश्वाची मुलुखगिरी करताना विविध भाषांत आढळलेल्या या उत्कृष्ट साहित्याचा मराठी वाचकांना लाभ होणार आहे. तसेच काही मराठी पुस्तके, विशेषत: दलित आत्मचरित्रे इंग्रजीत अनुवादित झाली आहेत आणि इंग्रजीतून ती अन्य युरोपियन भाषांमध्ये अनुवादित होत आहेत. त्यांचे चांगले स्वागत होत आहे. ह्या ग्रंथव्यवहारामुळे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळत आहे.

प्रकाशन व्यवसाय

प्रकाशन हा इतर व्यवसायाप्रमाणे एक व्यवसाय आहे. व्यवसायाची काही गणिते असतात. जिथून चार पैसे मिळतील तिथेच गुंतवणूक केली जाते. प्रकाशन व्यवसायाचे तसेच आहे. त्यामुळे दोन गोष्टी घडतात. साहित्य विश्वात ज्यांचा दबदबा आहे, त्या लेखक/कवींची पुस्तके प्रसिद्ध करण्यात प्रकाशक रस घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे मागणी तसा पुरवठा,’ हे अर्थशास्त्रातील सूत्र. कधी कधी मोठे नाव झालेल्या लेखकांचे सुमार लेखनही प्रकाशित होते व वाचकांची फसवणूक होते. काही प्रकाशक उत्तमोत्तम पुस्तकांची निर्मिती करीत आहेत. त्यासाठी खूप मोठे भांडवल गुंतवण्याची जोखीम ते घेतात. कधी त्यांना तोटाही सहन करावा लागलेला आहे. आपली पुस्तके सकस कशी होतील यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. अशा कितीतरी तरी पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध होत आहेत. हे कशाचे द्योतक आहे? वाचक चोखंदळ झााला आहे. मिळमिळीत अवघे टाकू न द्यावे आणि उत्कट, भव्य तेचि घ्यावेया नियमानुसार वाचक उत्तम साहित्याची निवड करीत आहेत आणि उत्तम वितरण व्यवस्थेमुळे त्या प्रकाशकांच्या पुस्तकांचा चांगला प्रसार होत आहे. या प्रकाशकांना आपल्या लेखकांविषयी आत्मियता वाटते आणि लेखकांना त्यांच्याविषयी. प्रकाशन व्यवसायाच्या काही अडचणी आहेत. ट्रेनमध्ये आजकाल पूर्वीसारखी कुणाच्या हातामध्ये वर्तमानपत्रे/पुस्तके दिसत नाहीत. नेटवरून

बातम्या पाहून साडे ून दिले जाते. मार्मिक अग्रलेखावर मंथन होत नाही.तसेच समाज मोबाईल, सोशल मीडिया, चॅनेलच्या अति मनोरंजनाकडेओढला जातोय. सवंग किंवा हलक्याफुलक्या गोष्टींकडे त्यांचा कल दिसतो.वाचन संस्कृतीला हा मोठा धोका आहे. पुस्तके ही विक्रीची वस्तू ठरवूनशासनाने जीएसटीचा नियम त्यांना लागू केला आहे. पुस्तक निर्मितीसाठीकूण सुमारे ४७ टक्के जीएसटी भरावा लागत आहे’, असे अखिल

भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या अध्यक्षांनी सांगितले आहे. (सकाळ१२/१२/२०१८) यामुळे प्रकाशन व्यवसायाचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. सांस्कृतिक ऱ्हासाला दिलेले हे आमंत्रण नाही का?  प्रकाशनाप्रमाणे वाचनालयांच्याही अडचणी वाढत आहेत. आपल्या वाचकांना चांगली पुस्तके उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो व अनेक वाचनालयांनाचांगला प्रतिसाद मिळत आहे. ते पुस्तकांचे डिजिटलायझेन करीत आहेत. उत्तम पुस्तके खरेदी करीत आहेत. त्यासाठी शासनाकडून मिळालेले अनुदान त्यांना पुरेसे पडत नाही व त्यामुळे ते त्यांच्याकडील सेवकांना योग्य वेतनही देऊ शकत नाही. वाचनालयांच्या अडचणीवर मात करण्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत.

पुस्तकांच्या किंमती परवडत नाहीत, अशी काहींची तक्रार असते. परंतु त्याचबरोबर सोन्याचाही भाव सारखा वाढत आहे ना? मग सोन्याच्याखरेदीमध्ये खंड पडला आहे का? सणासुदीला कपड्यालत्त्यांवर किती खर्चकेला जातो! अलीकडे मध्यमवर्गाचा आर्थिक स्तर उंचावला आहे. त्यांच्या वार्षिक बजेटमध्ये उत्तम पुस्तकांसाठी किती टक्के रक्कम बाजूला काढली जाते? समाजाचा पुस्तकांबाबत प्राधान्यक्रम बदलला आहे, ही दु:खद बाब आहे.

नवोदित लेखक

नवोदित लेखक, कवींच्या काही तक्रारी आहेत. त्यांच्यापैकी काही होतकरू आहेत. ते बऱ्यापैकी लेखन करू शकतात. परंतु त्यांची मोठ्या प्रकाशकांपर्यंत जायची हिंमत होत नाही. म्हणून ते परिचयाच्या प्रकाशकाकडे जातात. आपल्या लेखक, कवीचे नाव झाल्याशिवाय प्रकाशक सहसा त्यांचे लेखन प्रकाशित करू इच्छित नाहीत, तर काही लेखक-कवी उधार- उसनवारी करून, प्रकाशकांना पैसे देऊन आपले पुस्तक प्रकाशित करतात. पुस्तक प्रकाशित झाल्याचा आनंद त्यांना वाटतो पण पुस्तकांची विक्री किती झाली ह्याची माहिती बिचाऱ्या लेखकाला नसते. अशा व्यवहारामुळे अनेक संशयास्पद गोष्टी घडतात. ह्या खेळात लेखकांचा बळी जातो. लेखन हा फावल्या वेळातला छंद नाही. ती एक अखंड साधना आहे. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. ही गोष्ट नवोेदित कवी-लेखकांनीही ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

चांगले लेखक हुडकू, त्यांचे उत्तमोत्तम साहित्य आवर्जून प्रकाशित करणारे, लेखक घडवणारे चोखंदळ प्रकाशक लाभणे हे लेखकाचे भाग्य असते.

६. पर्यावरण : श्वासाची लढाई

लेखन, ग्रंथप्रसार आणि पर्यावरणाचा समतोल ह्यांचे घनिष्ट नाते आहे. कागद करण्यासाठी लगदा लागतो आणि लगद्यासाठी वृक्षतोड करावी लागते. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण हे आपले प्राथमिक कर्तव्य ठरते. जागतिक पर्यावरणाने जे उग्ररूप धारण केले आहे, त्याची माहिती आपणा सर्वांना आहे. ओझोन खिंडार विस्तारत आहे, नद्यांना पूर येत आहेत. अतिवृष्टी, महापूर, वणवे आणि उन्हाच्या झळा यांचे प्रमाण वाढले आहे. जैवविविधतेची अपरिमित हानी होत आहे. यावर्षी जगभरातील १५३ देशांतील ११५८ शास्त्रज्ञांनी पर्यावरणाबाबत निर्वाणीचा इशारा देत म्हटले आहे की, ‘आपण समजत होतो, त्यापेक्षा लवकर ही अत्यवस्थ स्थिती येऊन ठेपली आहे. आपल्या भवितव्याच्या भल्यासाठी आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपल्या विचारांमध्ये क्रांतिकारक बदल करावे लागणार आहेत.

गेल्या वर्षी ग्रेटा थुनबर्ग ह्या सोळा वर्षाच्या मुलीने संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून जगाच्या विवेकबुद्धीला आवाहन करणारे, हृदय हेलावणारे भाषण केले. तिने हात जोडून विनंती केली की आमच्या भवितव्याला धोकानिर्माण करू नका. आज जगाने विविध क्षेत्रात प्रचंड घोडदौड केली आहे. ज्ञान ही शक्ती आहे, हे माणसाने ओळखले. परंतु ह्या शक्तीवर विवेकबुद्धीचाअंकुश नसेल तर ज्ञान धोकादायक ठरू शकते. आपले पूर्वज तीरकामठ्यांचावापर करून युद्धे खेळत असत. आजचा मानव क्षेपणास्त्रांचा वापर करतो. ही प्रगती झाली का?

अनिर्बंध व्यक्तिस्वातंत्र्य

ज्ञानाच्या विकासाबरोबर व्यक्तिगत स्वातंत्र्याचाही विकास झाला आहे. मला जे पटते, माझ्या जे सोयीचे आहे, मला जे उपयुक्त आहे ते करण्यास मी पूर्णपणे मोकळा आहे. त्या माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर कुणीही निर्बंध आणू शकत नाही. म्हणून जे जे शक्य आहे, ते अनुज्ञ आहे. ते करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मला आह.े उदा. जीवनसंहारक अण्वस्त्र बनवायचे ज्ञान माझ्याकडे आहे आणि मी ती बनवू शकतो. समुद्रामध्ये भराव टाकू जमीन वाढवण्याचे तंत्रज्ञान मला अवगत आहे, साधनसामुग्री माझ्याकडे आहे आणि मी ते करणार. माझ्याकडे ज्ञान आहे, धन आहे आणि मला स्वातंत्र्यही आहे म्हणून मी गरीब राष्ट्रांतील साधनसामुग्रीची राजरोसपणे लूट करू शकतो. ह्याला व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विकास म्हणता येईल का? ज्ञान आणि स्वातंत्र्य अंतिम मानले गल्े ो आहे. आगीवर तल्े ा पडावे त्याप्रमाणे त्याला सापेक्षवादाची आणि उपयुक्ततावादाची जोड मिळाल्यामुळे मानवीजीवनासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ज्ञानाच्या विस्फोटानेआणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावावर सर्वकाही करता येते अशी भूमिकाघेतल्यामुळे आज जगात पर्यावरणाच्या विध्वंसाने कळस गाठला आहे. ज्ञान आणि वैयक्तिक स्वातंत्र्य ह्यांचा जसा विकास झाला, तसा नैतिकतेचा विकास झाला नाही. विवेकबुद्धीची धार तीक्ष्ण झाली नाही कारण मानवाला ते प्रश्न महत्वाचे वाटेनासे झाले आहेत.

आपण पर्यावरणाच्या विनाशावर विचार करीत आहोत. कारण पर्यावरणाचा प्रश्न केवळ वातावरणाशी निगडित नाही, तो नैतिकतेशी जोडलल्े ाा आहे. जगाने जी विकासनीती स्वीकारली आहे, त्या विकासनीतीचाहीनैतिकतेच्या निकषावर पुनर्विचार करणे आवश्यक आहे. निसर्गाचे चक्रबदलले आहे असे आपण मानतो. परंतु ते का बदलले आहे? कारण माणसाचे आणि राष्ट्रांचे विचारचक्र बदलले आहे.

नैतिकतेच्या ऱ्हासाची कारणे :

नैतिकतेचा ऱ्हास हा अचानक घडलेला नाही. त्यालाही इतिहास आहे. तो म्हणजे माणसांचा तुटलेला संवाद किंवा निर्माण झालेला दुरावा. ह्या संदर्भात बिशप रॉबर्ट मॅक एल्रॉय ह्यांनी अमेरिकेतील क्रेगटन येथे झालेल्या क्लायमेट कॉन्फरन्सह्या परिषदेवेळी केलेल्या चिंतनातील काही मुद्दे :

१. परमेश्वराबरोबर तुटलेला संवाद

पर्यावरणाच्या विनाशाच्या कारणांवर विचार करताना आपण निर्माणकर्त्या परमेश्वरापर्यंत येऊन पोहोचतो. आपला भारतीय समाज प्रामुख्याने देवावर विश्वास ठेवणारा आहे. जगात कुठे होत नसेल त्यापेक्षा जास्त देवाची उपासना आपल्या देशात होत असते. प्रार्थनास्थळे बांधण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. या सर्वांचे प्रतिबिंब आपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवनात उमटते का? ‘तोम्हणजे सर्व परम’ (absolute) मूल्यांचा संचय आहे. माझ्यासाठी तो येशू पिताआहे. सर्व मूल्यांची मुळे त्याच्यात आहेत. तो सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता आहे. त्यामुळे सृष्टीचा वापर व पर्यावरणाचा के लेला विनाश ही खरी नास्तिकता आहे. बायबलच्या पहिल्या पुस्तकात पर्यावरणाच्या हानीची मीमांसा केलेली आहे. अर्थात ती विज्ञानपूर्व भाषेत आहे. आपण तिचा मथितार्थ समजणे आवश्यक आहे. परमेश्वराने आदिमातापित्याची निर्मिती केली आणि त्यांना निसर्गसंपन्न अशा नंदनवनात ठेवले. त्या सुखाचा हेवा करणारी दुष्ट शक्ती होती. त्या दुष्ट शक्तीने त्या आदिमाता-पित्यांना वश केले. ते त्या दुष्टशक्तीच्या मोहाला बळी पडले. त्यामुळे निसर्गसंपन्न नंदनवनातून त्यांची हकालपट्टी झाली. ती दुष्ट शक्ती म्हणजे आजचे पर्यावरणाचे विरोधक होत. आपल्या पॅरेडाइज लॉस्टया महाकाव्यात कवी मिल्टनने ह्या प्रसंगाचे प्रत्ययकारी वर्णन केले आहे. खिस्ती मठामध्ये प्रार्थनेसाठी जितका वेळ दिला जातो तितकाच वेळ पर्यावरणाच्या संवर्धानालाही दिला जातो. उदा. ग्रेगोर जोऑन मेंडेल (१८२२- १८८४) हा मठवासी असून शास्त्रज्ञ होता. तो जनुुकशास्त्राचा (जेनेटिक सायन्स) पितामह मानला जातो. त्याने वनस्पतींवर अनेक प्रयोग करून मठामध्ये शोध लावले. मठवासी गोपालन करीत असत. दुग्धजन्य पदार्थांचा उदा. चीजचा त्यांनी प्रथम शोध लावला. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स शोधून काढल्या. मधमाशीपालन करून शुद्ध मध तयार केला.  मानवाची सेवा आणि निसर्गाची सेवा म्हणजे देवाची सेवा असे सर्व मठवासी मानतात.

२१व्या शतकात आपले धरतीबरोबरचे नाते बिघडले आहे, कारण आपण ह्या वसुंधरेचे विश्वस्त नाहीत मालक आहोत, असे आपण समजू लागलो आहोत. त्यामुळे प्रत्येकाला पृथ्वीवरच्या साधनसामुग्रीचा मनमानी विध्वंस करण्याचा जणू हक्कच प्राप्त झाला आहे. सबका मालिक एक आहेअशा परमेश्वराबरोबरचा संवाद तुटण्याचे एक कारण आहे. वसुंधरेला मन मानेल तसे लुटण्याचा जणू काही आपल्याला हक्क मिळालेला आहे. कारण आपण आपल्याला विश्वाचे राजे समजतो.

२. निसर्गाबरोबरचा तुटलेला संवाद

आज जगाने निरनिराळ्या क्षेत्रांत वाखाणण्यासारखी प्रगती केली आहे परंतु आपण निसर्गाचे अध्यात्म नाकारले आहे. आपल्याकडे तुकोबांनी म्हटले आहे वृक्षवल्ली वनचरे आम्हा सोयरे.तेराव्या शतकात युरोपमध्ये होऊन गेलेले संत फ्राान्सिस चंद्रसूर्याला, ताऱ्याग्रहांना, वृक्षवेलींना, हिंस्र प्राण्यांना आपले बंधू आणि भगिनी समजत असत. मात्र आज आपण ते नाते विसरलेले आहोत आणि तुकोबांनी वर्णन केलेल्या सोयऱ्यांचा आणि संत फ्रान्सिसने सांगितलल या नात्याचा आपण विध्वंस करीत चाललो आहोत.वास्तविक आपल्या देशात तरी तसे व्हायला नको होते. आपले आदिवासी बांधव निसर्गपूजक आहेत. जगातील प्रत्येक आदिम जमातीमध्ये निसर्गाचा आदर केला जातो. हिंदू धर्मात सूर्यनमस्काराची पद्धत आहे. अग्निपूजेचे अनेक मंत्र आहेत. नदी किंवा समुद्रातल्या पाण्याने सूर्याला र्ध्य देतात. सरोवराच्या किंवा तलावाच्या पाण्यात शिरताना प्रथम पाय स्वच्छ करून, नमस्कार करून, प्रार्थना करून मगच प्रवेश केला जात असे. आपले पारसी बांधव अग्निपूजक आहेत. ते अग्नीला पवित्र मानतात. खिस्ती धर्मामध्ये अग्नीचा वापर प्रार्थनेमध्ये केला जातो. आज आपण उपयुक्ततावाद हे एकमेव मूल्य मानलेले आहे. त्यामुळे आपण सरोवरांची, तलावांची डबकी करत आहोत. समुद्रकिनाऱ्यांची आपण काय अवस्था केली आहे, हे आपणांस माहीत आहेच. अगदी मध्यरात्रीसुद्धा हजारो वृक्षांची तोड करीत आहोत, जंगलांना वणवे लावीत आहोत. ह्याचे कारण निसर्गाबरोबरचा आपला तुटलेला संवाद हेच आहे. जे अस्तित्वात आहे, ते सर्व केवळ मानवासाठीच आहे, हे सूत्र मानल्यामुळे निसर्गाची फार मोठी हानी झाली आहे. त्याच्यामधून वापरा आणि फेकाही नीती जन्माला आलेली आहे आणि ती माणसाठीदेखील वापरली जात आहे.

३. सत्याबरोबरचा तुटलेला संवाद

कर्ब वायूमुळे होणारे प्रदूषण, निसर्गाचे बदललेले चक्र, पाण्याचीबिघडलल्े ाी गुणवत्ता, जैवविविधतेचा होणारा ऱ्हास, मानवी जीवनाची होणारी हानी अशा अनेक कारणांमुळे आजचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आपण सर्व एकमेकांशी जोडलेलो आहोत ह्याचा आपल्याला विसर पडलेला आहे. आर्थिक विकास आणि फसवे विज्ञान ह्यांच्या नावाखाली हवा, पाणी आणि मानवी जीवन धोक्यात आलेले आहे.

शाश्वत सत्य असा काही प्रकार नाही. त्यामुळे सापेक्षतावाद हा जगण्याचा अंतिम निकष ठरलेला आहे. परिणामत: अंतिम सत्याबरोबरचा आपला संवाद तुटला आहे. नैतिकतेचे हरवलेले भान हे आपल्या सर्व ऱ्हासाचे, मग तो पर्यावरणाचा असू द्या, राजकारणाचा असू द्या किंवा आणखी कशाचा असू द्या, एक मुख्य कारण आहे. म्हणून अंतिम सत्याकडे वळण्याशिवाय अन्य पर्याय नाही.

४. आपला एकमेकांबरोबरचा तुटलेला संवाद

उपयुक्तता आणि सापेक्षततावाद ह्यांचा अवलंब केल्यामुळे निसर्गाचीकशी हानी होते हे आपण पाहिले. हेच तत्त्वज्ञान मानवी संबंधानाही लागू केले जात आहे. जन्म आणि मृत्यू ही जीवनातील परमसत्ये आहेत. आज

ह्या दोन्ही पातळ्यांवर धोके निर्माण झालेले आहेत. त्यामुळे उदरातीलबालकाला जगण्याची शाश्वती नाही आणि वृद्धावस्थेची उपेक्षा केली जातआहे. संवेदना, करुणा, दया, सहवेदना या भावना बोथट होत आहेत.

वेश्याव्यवसाय आणि गरीब राष्ट्रांतील मुलींची व स्त्रियांची होणारी निर्यातह्यांच्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आपले वसुधैव कुटुंबकम्ह्याचाआपल्याला विसर पडलेला आहे. र्यावरणाच्या हानीमागे वरील चार प्रकारचा तुटलेला संवाद कारणीभूत आहे. संवाद तुटल्यामुळे काय अनर्थ होतात ह्याचे मार्मिक वर्णन हिंदी कवी गिरिजाकुमार माथुर ह्याच्या क्रांति की भूमिकाया कवितेत केले आहे.

सिर्फ अपनेही लिए जब जीने लगते है आदमी

तब उनकी हर चीज बिकाऊ हो जाती है !

जब जोखिम उठाने की आदत मिट जाती है

हर कौम मर जाती है …

जेव्हा मानवी संबंध धोक्यात येतात आणि मनुष्य स्वार्थाच्या आहारी जातो आणि जेव्हा त्याला आजूबाजूचे भान उरत नाही, तेव्हा समाजदेखील मृतावस्थेला पोहोचतो. आपण पर्यावरणाच्या रक्षणाविषयी खूप बोलत आहोत, नामशेष होणाऱ्या प्रजातीबद्दल चिंता व्यक्त करीत आहोत, पण त्याचबरोबर जेव्हा माणुसकीला ग्रहण लागते, गरिबांना समाजात स्थान राहत नाही, आपला सारा विकास धनधार्जिणा होतो, जेव्हा आपल्याला अडचण असलेल्या व्यक्तीला नष्ट केले जाते, तेव्हा मानवतेपुढे मोठे आव्हान उभे राहते. ह्याउलट, जेव्हा सारी मानवजात आपल्या प्रेमाचा विषय होते, त्यांचीसुखदु:खे ही आपली सुखदु:खे बनतात, तेव्हा जगण्याला आणि जीवनालाखरा अर्थ प्राप्त होत असतो. जेव्हा विश्वाच्या भल्याचा विचार मागे पडतो आणि केवळ राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य मिळते, जेव्हा माणसामाणसांमध्ये जातिधर्मावरून विभागणी केली जाते, तेव्हा मानवतेची मोठी हानी होते. माणसाचे जग कुटुंबापुरते मर्यादित होते तेव्हा भोगवादाला आणि चंगळवादाला आमंत्रण मिळते. जेव्हा माणसाचे हृदय पोकळ होते, तेव्हा तो आपले घर उंची फर्निचरने सजवत असतो. मग आपले घरगुती कार्यक्रम श्रीमंतीचे देखावे बनतात.

पूज्य विनोबा भावे नेहमी मानवतेच्या भल्याचा विचार करीत असत. यत्र विश्वं भवति एक नाडr हे सारे विश्व पक्ष्याच्या एका घरट्यासारखे व्हावे, असे त्यांचे स्वप्न होते आणि ते स्वप्न साकार व्हावे, ह्यासाठी ते प्रयत्नशील होते. अतिरिक्त राष्ट्रवाद स्वार्थाला, दहशतवादाला, राष्ट्रांच्या द्वेषाला जन्म देत असतो. तेआणि आपणअशी राष्ट्राची विभागणी किंबहुना फाळणी केली जाते. विनोबा भावेंची घोषणा असे जय जगत!ही सब भूमि गोपालकीम्हणजे ही भूमी अन् त्याच्यावर जे जे निर्मित आहे, ती परमेश्वराने मानवाला दिलेली देणगी आहे. त्या धनावर भावी पिढ्यांचाही हक्क आहे. तो नाकारून फक्त वर्तमानकाळाचा विचार करणे हा आत्मघात आहे. त्यामुळे केवळ आपल्याच नाही, तर विश्वाच्या भल्यासाठी एखाद्या द्रष्ट्याप्रमाणे विचार करणारी ग्रेटा थुनबर्ग ही जगाच्या व्यासपीठावरून भरल्या डोळ्यांनी आणि जड अंत:करणाने आपल्या आणि आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांचा विचार केला जावा असा संदेश देऊन मानवतेच्या विवेकाला आवाहन करते. तो संदेश सर्वदूर पसरवण्यासाठी आपल्या शाळेला रामराम ठोकून ती बालिका वणवण हिंडते आहे.

ह्या सगळ्यांवर विचारमंथन करणे हेदेखील आपल्या साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट असले पाहिजे. जर माणूूसच टिकला नाही, तर साहित्याची निर्मिती कोण करणार आणि वाचणार तरी कोण? आज देशाला आणि सगळ्या जगाला गांधीजींसारख्या प्रेषितांची नितांत गरज आहे. त्यांनी केवळ भारताचा नाही, तर विश्वाच्या भल्याचा विचार केला. त्यामुळे लघुदृष्टीच्या राजकारण्यांना गांधीजी नकोसे झाले आहेत. ज्या देशात, ज्या भारतीयसंस्कृतीत निसर्गाची पूजा केली जाते, त्या देशाने निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी जगात आघाडीवर असले पाहिजे.

००००

समारोप

सुसंवाद सदा घडो

सध्या हे डिजिटल क्रांतीचे दिवस आहेत. माहितीचा विस्फोट होत आहे. माहिती मिळाली म्हणजे ज्ञान मिळाले, असे नाही. ज्ञानाची भाषा निराळी असते. माहिती आणि ज्ञानविज्ञान ह्याच्यावर जेव्हा मनन- चिंतन होते, मंथन होते, तेव्हा माहितीचे रूपांतर हळूहळू ज्ञानात (Wisdom) होत असते. हे ज्ञान आपल्याला आयुष्यभर साथसंगत करते. ते कुठल्या भाषेच्या माध्यमातून दिले जाते, ह्यापेक्षा ते आपल्याला काय देते, हे महत्त्वाचे असते; कारण आपला पिंड उत्तम ग्रंथांच्या सहवासात घडवला जातो. मानवी जीवनातील ताणेबाणे, हर्ष-विमर्ष, दु:ख-वेदना, आशा- निराशा हे सारे एखाद्या शोभादर्शक यंत्राप्रमाणे (कॅलिडोस्कोप) असतात. अशी पुस्तके पुन्हा-पुन्हा वाचावीशी वाटतात, प्रत्येक वेळी आपल्याला जीवनाचे आगळे-वेगळे दर्शन घडते. उदा. कालिदासांचे शांकुतल’, भवभूतींचे मालतीमाधव’, ग्रीक लेखकांच्या शोकांतिका, शेक्सपिअरच्या मानवी जीवनावर भाष्य करणाऱ्यानाट्यकृती, लिओ टॉलस्टॉय ह्यांच्या प्रत्ययकारी कथा, गटेचे फाऊस्टआणि महाराष्ट्राकडे वळलो तर कुसुमाग्रज, दुर्गा भागवत, विंदा करंदीकर, जी. ए. कुलकर्णी, दया पवार अशा कितीतरी प्रतिभावंताच्ं या साहित्यकृतींनी आपल्या अबोध मनाचा ठाव घेतला आहे. ही ग्रंथसंपदा आपले वैचारिक धन आहे. जगायचे का आणि कशासाठी? ह्याचे उत्तर इथे आहे.

संत नामदेवांनी म्हटले आहे,

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी,

एकतरी ओवी अनुभवावी।.

त्याचप्रमाणे ह्या संमेलनातून साहित्य-सोनियांच्या खाणी अनुभवल्यानंतर एकतरी वाचनीय ग्रंथ आपापल्या

घरी घेऊन जावे.

धर्मसंवाद

माझ्या बोलण्यात आणि लेखनात बायबलप्रमाणे संत-साहित्यातील संदर्भ सहजपणे येत असतात. त्याचे कारण मला संतांच्या साहित्यामध्ये सापडते. संत तुकारामांचे अभंग अभ्यासत असताना मी तुकारामांच्या प्रेमात पडलो.बायबलमधील स्तोत्रकारांना भेटलेली तृषित हरिणी तुकोबांच्या कन्या सासुरासी जायह्या अभंगात प्रतिबिंबित होते. त्यांची रंजल्या-गांजल्यासंबंधीची कणव मला आकर्षित करते. जनाबार्इंची भावविव्हळ भक्ती पाहून मला फ्रान्समधल्या संत तेरेेजाची आठवण होते. चोखामेळ्याच्या वेड्यावाकड्या उसाच्या कांडांतून निघणारा भक्तिरस मला मोहित करतो.

केशवाचे भेटी लागलें पिसें ।

विसरलें कैसें देहभान ।

झाली झडपणी झाली झडपणी ।

संचरलें मनीं आधीं रूप ।

असे म्हणत संत गोरोबा हे कर्म, धर्म, पाप पुण्य ह्यांच्या पलीकडे गेले होते आणि त्यांना निर्गंुण निराकाराचा ध्यास लागला होता. १२ व्या शतकातील दक्षिण भारतातील संत बसवेश्वर हे रूढीपरंपरा भंजक होते. त्यांनी अनेक जुन्या प्रथा मोडीत काढल्या. त्यामुळे त्यांना विद्रोही संत असेही म्हटले जाते.संत थॉमस-ए-केम्पीस, संत बर्नर्ड, संत बेनेडिक्ट, संत फ्रान्सिस असिसी ह्यांचे लेखन म्हणजे अध्यात्मपाठ आहेत. अजूनही ते आमचे पोषण करतात.

सूफी संत रूमी, सलिम चिश्ती, गाझी पीर हे भक्ती परंपरेतले होते. शीख संप्रदायाचे गुरू हे त्यांच्या भजनाद्वारे आपल्या भक्तिरसाने भक्तांचे पोषण करायचे. ह्या सर्व संतांनी आपल्या आकाशाचे अंगण सुशोभित आणि संपन्न केले आह.े तुका नामक सेतूवरूनी रेव्ह. टिळक खिस्तचरणी लीन झाले. आपण भारतात जन्माला आलो म्हणून हे भाग्य आपल्याला लाभले आहे.

चर्चमध्ये आज मोकळेपणाचे वातावरण आहे. बिशप डॉ. थॉमस डाबरे, आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो, फादर डॉ. खिस्तोफर शेळके इत्यादींनी भागवत संतांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला आहे. २१ व्या शतकात टिकून राहायचे असेल तर सर्व धर्म मैत्री साधणे गरजेचे आहे. भूतां परस्परें पडो, मैत्र जिवांचेही आपल्या सर्वांची भूमिका आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी माझ्यासारख्या अपात्र व्यक्तीचे अत्यंत उदार अंत:करणाने स्वागत केले आणि गेल्या तीन चार महिन्यांपासून माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. म्हणून आज ह्या व्यासपीठावर उभे राहत असताना कविवर्य तांब्यांच्या ओळी माझ्या ओठांवर खेळतात.

न द्यावा जिथे पाय तेथे दिला ।

बहु लाजलो भान येता मला ।।

जय जगत ! जय भारत ! जय महाराष्ट्र !

०००

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0