कुंभमेळ्यातल्या लाखाहून अधिक कोरोना चाचण्या बनावट

कुंभमेळ्यातल्या लाखाहून अधिक कोरोना चाचण्या बनावट

नवी दिल्लीः कोरोनाच्या दुसर्या लाटेला कारणीभूत ठरलेल्या कुंभ मेळ्यातल्या सुमारे १ लाख कोरोना चाचण्या बनावट असल्याचे उत्तराखंड आरोग्य खात्याला आढळले आह

कोविडचे लाखांहून अधिक रुग्ण व गैरव्यवस्थापनाने परिस्थिती आटोक्याबाहेर
राज्यात ४ जिल्ह्यांत पॉझिटिव्हीटी दर जास्त
राज्यात कोरोनाची नवी नियमावली जाहीर

नवी दिल्लीः कोरोनाच्या दुसर्या लाटेला कारणीभूत ठरलेल्या कुंभ मेळ्यातल्या सुमारे १ लाख कोरोना चाचण्या बनावट असल्याचे उत्तराखंड आरोग्य खात्याला आढळले आहे. या संदर्भात अधिक चौकशी सुरू करण्यात आली असून कोरोना चाचण्यात मोठ्या प्रमाणात अनागोंदी व बेजबाबदारपणा खासगी प्रयोगशाळांकडून झाल्याचे दिसून आले आहे.

उदाहरण घ्यायचे झाल्यास, या खासगी प्रयोगशाळांक़डून कोरोना चाचणीसाठी एकाच मोबाइल क्रमांकाचा वापर करून ५० हून अधिक जणांची नोंद केल्याचे तसेच एकाच अँटिजन टेस्ट किटवर ७०० हून अधिक सॅम्पल तपासल्याचे आरोग्य खात्याला आढळले आहे.

त्याच बरोबर खासगी प्रयोगशाळांनी कोणाचेही नाव नोंदवून खोट्या कोविड चाचण्या केल्याचे आढळून आले आहे.

उत्तराखंड सरकारने राज्यातल्या २२ खासगी प्रयोगशाळांना कोविड-१९ चाचण्यांचे कंत्राट दिले होते.

१ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान झालेल्या कुंभ मेळ्यात लाखो भाविकांची गर्दी पाहून उत्तराखंड सरकारने खासगी प्रयोगशाळांच्या मदतीने हरिद्वार, देहराडून, टेहरी जिल्ह्यात कोविड-१९ चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला होता. पण या चाचण्यांवर कुंभ मेळ्यादरम्यान संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे हरिद्वार जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. या चौकशीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे दिसून आले आहे.

हा घोटाळा व बेजबाबदारपणा दिसून आल्यानंतर ज्या खासगी प्रयोगशाळांमार्फत आरटी पीसीआर व रॅपिड अँटिजन चाचण्या करून घेण्यात आल्या, त्यांची बिले सरकारने रोखून धरली आहेत, या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर या बाबत निर्णय घेतला जाणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: