मुंबईः कोविड निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी पार पडले आहे. ९ दिवसांमध्ये ६ दिवसांचे कामकाज झाले. या अधिवेशनात पुरवणी मागण्यांच
मुंबईः कोविड निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी पार पडले आहे. ९ दिवसांमध्ये ६ दिवसांचे कामकाज झाले. या अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या विधेयकांसह महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर करण्यात आली. या अधिवेशनात एकूण १० विधेयके मंजूर करण्यात आली.
- भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाबाबत अभिनंदन प्रस्ताव
- नवनियुक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव.
- औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याबाबत, तसेच नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण करण्याचा केंद्र शासनाला शिफारस करण्याचा विधान मंडळाचा ठराव.
- या अधिवेशनात विविध विभागांच्या २५ हजार ८२६.७२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागणीला मंजूरी देण्यात आली.
- थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक.
- राज्यात“एक दिवस बळीराजा” साठी ही संकल्पना राबवणार.
- सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळणार. एनडीआरएफ पेक्षा दुप्पट मदत
- पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर.
- शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा.
- आपत्तीप्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण.
- मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटचे करणार. तीन वर्षात काम पूर्ण करणार.
- धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास नेणार.
- गिरणी कामगारांना ५० हजार सदनिका देण्यासाठी उपलब्ध होत आहेत. त्या त्यांना देण्यात येतील.
- मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासाबाबत विशेष विकास नियंत्रण नियमावली.
- बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी आवश्यकतेनुसार निधी.
- बीडीडी चाळीतील पोलिसांना १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काचे घर.
- मेट्रो मार्ग ५ चा विस्तार करण्यात येणार आहे.
- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील १०० टक्के व कक्षेबाहेरील ५० टक्के पदभरती करणार.
- राज्यात सात हजार पोलिसांची भरती करणार.
- २९ हजार सफाई कर्मचाऱ्यांची घरे मालकी हक्काने देण्यात येईल.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरणार.
- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार.
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार.
- हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर
- आश्रमशाळांसाठी ६०० कोटी रु.ची तरतूद.
- राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करणार.
- कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स फी शासन भरणार
- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना २० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य
- राज्यात साकवांचे रूपांतर पुलांमध्ये करण्याचा निर्णय.
- रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची पूरक मागणी.
- पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अडीचशे कोटी रुपये वर्ग.
- स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा प्रकल्प आराखडा केंद्राला मान्यतेसाठी पाठवला.
- खडकवासला-स्वारगेट पुलगेट हडपसर-लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प.
- जलजीवन मिशन अंतर्गत रायगडमध्ये १ हजार ७० पाणी पुरवठा योजना मंजूर.
- बहिर्जी नाईक, उमाजी नाईक यांच्या स्मारक परिसराच्या विकासासाठी निधी
- दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य.
COMMENTS