पावसाळी अधिवेशनात १० महत्त्वाची विधेयके मंजूर

पावसाळी अधिवेशनात १० महत्त्वाची विधेयके मंजूर

मुंबईः कोविड निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी पार पडले आहे. ९ दिवसांमध्ये ६ दिवसांचे कामकाज झाले. या अधिवेशनात पुरवणी मागण्यांच

विरोधकांची अनुपस्थिती; ७ विधेयके ४ तासात संमत
अधिवेशनात २४ विधेयके मंजूर
‘चर्चेविना संमत १५ विधेयकांवर स्वाक्षरी करू नका’

मुंबईः कोविड निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी पार पडले आहे. ९ दिवसांमध्ये ६ दिवसांचे कामकाज झाले. या अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या विधेयकांसह महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर करण्यात आली. या अधिवेशनात एकूण १० विधेयके मंजूर करण्यात आली.

  • भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाबाबत अभिनंदन प्रस्ताव
  • नवनियुक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव.
  • औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याबाबत, तसेच नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण करण्याचा केंद्र शासनाला शिफारस करण्याचा विधान मंडळाचा ठराव.
  • या अधिवेशनात विविध विभागांच्या २५ हजार ८२६.७२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागणीला मंजूरी देण्यात आली.
  • थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक.
  • राज्यात“एक दिवस बळीराजा” साठी ही संकल्पना राबवणार.
  • सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळणार. एनडीआरएफ पेक्षा दुप्पट मदत
  • पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर.
  • शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा.
  • आपत्तीप्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण.
  • मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटचे करणार. तीन वर्षात काम पूर्ण करणार.
  • धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास नेणार.
  • गिरणी कामगारांना ५० हजार सदनिका देण्यासाठी उपलब्ध होत आहेत. त्या त्यांना देण्यात येतील.
  • मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासाबाबत विशेष विकास नियंत्रण नियमावली.
  • बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी आवश्यकतेनुसार निधी.
  • बीडीडी चाळीतील पोलिसांना १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काचे घर.
  • मेट्रो मार्ग ५ चा विस्तार करण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील १०० टक्के व कक्षेबाहेरील ५० टक्के पदभरती करणार.
  • राज्यात सात हजार पोलिसांची भरती करणार.
  • २९ हजार सफाई कर्मचाऱ्यांची घरे मालकी हक्काने देण्यात येईल.
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरणार.
  • मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार.
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार.
  • हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर
  • आश्रमशाळांसाठी ६०० कोटी रु.ची तरतूद.
  • राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करणार.
  • कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स फी शासन भरणार
  • वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यातील मृतांच्या कुटुंबियांना २० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य
  • राज्यात साकवांचे रूपांतर पुलांमध्ये करण्याचा निर्णय.
  • रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची पूरक मागणी.
  • पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अडीचशे कोटी रुपये वर्ग.
  • स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा प्रकल्प आराखडा केंद्राला मान्यतेसाठी पाठवला.
  • खडकवासला-स्वारगेट पुलगेट हडपसर-लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प.
  • जलजीवन मिशन अंतर्गत रायगडमध्ये १ हजार ७० पाणी पुरवठा योजना मंजूर.
  • बहिर्जी नाईक, उमाजी नाईक यांच्या स्मारक परिसराच्या विकासासाठी निधी
  • दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: