१०वी परीक्षाः आवेदनपत्रे १८ नोव्हें.पासून स्वीकारणार

१०वी परीक्षाः आवेदनपत्रे १८ नोव्हें.पासून स्वीकारणार

मुंबईः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेची आव

जूनअखेर दहावीचा निकाल; अकरावीसाठी प्रवेश परीक्षा
१२वी परीक्षाः १२ नोव्हें.पासून आवेदनपत्र स्वीकारले जाणार
सावधान – वैदिक शिक्षण मंडळ येत आहे!

मुंबईः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार १८ नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डेटाबेसवरून नियमित शुल्कासह गुरूवार १८ नोव्हेंबर ते गुरूवार ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत भरावयाची आहेत. तर माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार १० डिसेंबर ते सोमवार २० डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने भरावयाची आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज सोमवार २० डिसेंबर ते मंगळवार २८ डिसेंबर २०२१ या कालावधीत भरता येतील. तर, माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी गुरूवार १८ नोव्हेंबर ते गुरूवार ३० डिसेंबर २०२१ असा आहे.

माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट मंगळवार ४ जानेवारी २०२१ रोजी जमा करावयाची आहे. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळवले आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: