मुंबई विद्यापीठाच्या १२ लाख पदव्या डिजीलॉकरवर उपलब्ध

मुंबई विद्यापीठाच्या १२ लाख पदव्या डिजीलॉकरवर उपलब्ध

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतातील सर्व शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्रे नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरीच्या (NAD) माध्यमातून ड

१०वी, १२वीच्या खासगी विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी
झीरो बजेट नैसर्गिक शेतीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह
खेलो इंडिया स्पर्धाः महाराष्ट्र-हरियाणात पहिल्या क्रमांकासाठी चुरस

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतातील सर्व शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्रे नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरीच्या (NAD) माध्यमातून डीजीलॉकरमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले होते. यानुसार मुंबई विद्यापीठाने मागील ७ वर्षाचे १२ लाखापेक्षा जास्त पदवी प्रमाणपत्रे डिजीलॉकरवर उपलब्ध करून दिले आहेत. डिजीलॉकरवर पदवी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठ प्रथम स्थानावर आहे. विद्यार्थ्याने  डिजीलॉकरवर नोंदणी केल्यास त्याला त्याचे पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध होईल.

महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठाचा ५०% वाटा

मुंबई विद्यापीठाने पहिल्या टप्प्यात वर्ष २०१४ ते २०२० या ७ वर्षाचे १२ लाख ४३ हजार ५३४ पदवी प्रमाणपत्रे डिजीलॉकरवर उपलब्ध करून दिलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण ५ विद्यापीठांची २४ लाख ८८ हजार ७२२ पदवी प्रमाणपत्रे डिजीलॉकरवर उपलब्ध आहेत. यात मुंबई विद्यापीठाचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. दुसऱ्या टप्प्यात मागील पाच वर्षाचे ५ लाखापेक्षा जास्त पदवी प्रमाणपत्रे डिजीलॉकरवर उपलब्ध केली जाणार आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील  केंद्रीय संगणक सुविधा कक्षाचे वरिष्ठ यंत्रणा प्रोग्रामर डॉ. प्रविण  शिनकर हे नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरीचे  (NAD)  मुंबई विद्यापीठाचे नोडल ऑफिसर म्हणून कार्य करीत आहेत. त्यांनी १२ लाख पदवी प्रमाणपत्रे डीजीलॉकरमध्ये उपलब्ध करून दिले आहेत.

डीजीलॉकरमध्ये असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्राचा तपशील

अ. क्र. वर्ष पदवी प्रमाणपत्राची संख्या
१. २०१४ १,८५,४६७
२. २०१५ १,६१,९१४
३. २०१६ १,६८,७४३
४. २०१७ १,८९,५३८
५. २०१८ १,८५,९८१
६. २०१९ १,६८,२३९
७. २०२० १,९७,९२७

डीजीलॉकरवर पदवी प्राप्त करण्याची पद्धत

१. विद्यार्थ्यांनी https://www.digilocker.gov.in/dashboard या संकेतस्थळाला जाऊन आपले आधारकार्ड व मोबाईल फोन क्रमांकाच्या आधारे अकाउंट उघडावे.

२. Mumbai University हा शब्द टाकावा.

३. यानंतर शेवटच्या सत्राचा /वर्षाचा रोल क्रमांक / आसन क्रमांक टाकावा.

४. रजिस्ट्रेशन नं : हा रजिस्ट्रेशन नंबर विद्यार्थ्यांच्या मूळ पदवी प्रमाणपत्राच्या खालील डाव्या बाजूस असतो. उदा. 19-MCOE-18D-0570-00021487

५. विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेवर असलेले संपूर्ण नाव लिहावे.

६. परीक्षेचे वर्ष टाकावे, यानंतर विद्यार्थ्यास त्याचे पदवी प्रमाणपत्र दिसते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: