अंगणवाडी सेविकांना २ हजार भाऊबीज भेट

अंगणवाडी सेविकांना २ हजार भाऊबीज भेट

मुंबई: एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका कर्मचा-यांना भाऊबीज भेट म्हणून २ हजार रूपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी दिली.

२०२१-२०२२ या वित्तीय  वर्षासाठी भाऊबीज भेट २ हजार रूपये देण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २८ ऑक्टोबर २०२१ रोजी जारी करण्यात आले आहे. या साठी यंदाच्या वित्तिय वर्षात एकूण ३७ कोटी ९७ लाख ३२ हजार रु. इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना ही भाऊबीज भेट देण्यात येणार आहे.

COMMENTS