गुजरात दंगलः मोदी व अन्य जणांची क्लिन चीट कायम

गुजरात दंगलः मोदी व अन्य जणांची क्लिन चीट कायम

नवी दिल्लीः २००२ गुजरात दंगल प्रकरणी तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासहित ६४ जणांना एसआयटी विशेष न्यायालयाने दिलेल्या क्लिन चीटवर शुक्रवारी स

ड्रग्ज प्रकरणे हाताळण्याचा एनसीबी ‘पॅटर्न’
‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा
शहाबाझ शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

नवी दिल्लीः २००२ गुजरात दंगल प्रकरणी तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासहित ६४ जणांना एसआयटी विशेष न्यायालयाने दिलेल्या क्लिन चीटवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करत या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची जकिया जाफरी यांची याचिका फेटाळली. जकिया जाफरी यांचे पती एहसान जाहरी हे काँग्रेसचे खासदार होते व त्यांना गुजरात दंगलीत जमावाने ठार मारले होते.

गुजरात दंगल हा मोठा व्यापक कट असून त्यात नरेंद्र मोदी व अन्य जणांचा समावेश असल्याचा जकिया जाफरी यांचा दावा ५ ऑक्टोबर २०१७ रोजी अहमदाबाद महानगर दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळत या सर्वांना क्लिन चीट दिली होती. या वर जकिया जाफरी यांनी आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

या पूर्वी गुजरात दंगलीचा तपास करणाऱ्या एसआयटीने ८ फेब्रुवारी २०१२ रोजी मोदी व अन्य ६३ जणांविरोधात गुजरात दंगल पेटवल्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याने क्लिन चीट देत क्लोजर रिपोर्ट तयार केला होता. या रिपोर्टविरोधात जकिया जाफरी यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण गुजरात उच्च न्यायालयाने ५ ऑक्टोबर २०१७ रोजी याचिका फेटाळली होती. या निर्णयाला आव्हान देणारी एक याचिका जकिया जाफरी यांनी २०१८मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. ती याचिका आता सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0