मुझफ्फरनगर दंगलः भाजप नेत्यांवरचे खटले रद्द

मुझफ्फरनगर दंगलः भाजप नेत्यांवरचे खटले रद्द

मुझफ्फरनगरः २०१३ सालच्या मुझफ्फरनगर भीषण दंगलीतल्या आरोपी १२ भाजप नेत्यांविरोधातल्या सर्व तक्रारी रद्द कराव्यात असे आदेश येथील स्थानिक न्यायालयाने दिल

पत्रकारांचे ट्विट काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या देशांमध्ये भारत आघाडीवर
पत्रकारांवर हल्लेः देशभरातून निषेध
शेतकरी आंदोलनात ट्रॉली टाईम्स, ‘सांझी तत्थ’ आणि ग्रंथालय

मुझफ्फरनगरः २०१३ सालच्या मुझफ्फरनगर भीषण दंगलीतल्या आरोपी १२ भाजप नेत्यांविरोधातल्या सर्व तक्रारी रद्द कराव्यात असे आदेश येथील स्थानिक न्यायालयाने दिले आहेत. या नेत्यांमध्ये काही जण उ. प्रदेश सरकारमध्ये मंत्री व आमदार आहेत. त्यापैकी सुरेश रैना हे उ. प्रदेश सरकारमधील मंत्री असून संगीत सोम हे भाजपचे आमदार आहेत, भारतेंदू सिंग हे भाजपचे माजी खासदार तर साध्वी प्राची या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या आहेत. या नेत्यांनी दंगल भडकवणारी चिथावणीखोर भाषा केली होती व दंगलीत सहभाग घेतला होता, असे त्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते. या नेत्यांवर सरकारी कामात ढवळाढवळ करण्याचा त्यांच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा व जमावबंदीचा कायदा मोडल्याचेही आरोप होते.

२०१३ मध्ये मुझफ्फरनगरमध्ये हिंसाचाराला उद्युक्त करणारी महापंचायत बोलावण्यात आली होती. या महापंचायतीला हे नेते उपस्थित होते, असाही त्यांच्यावर आरोप होता.

शुक्रवारी न्या. राम सुध सिंग यांनी या १२ भाजप नेत्यांवरचे आरोप सरकारने मागे घ्यावेत असे सांगितले.  त्यानंतर सरकारी वकिलांनी व्यापक जनहित लक्षात घेता या १२ भाजप नेत्यांविरोधात पुन्हा खटले चालवले जाणार नाहीत व त्यांची पुन्हा चौकशी केली जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे.

२०१३ मध्ये मुझफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीत ६६ जण ठार झाले होते तर ५० हजाराहून अधिक स्थानिक रहिवाशांना आपले घर सोडावे लागले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: