देशातील प्राचीन २४ संरक्षित स्मारके, वास्तू गायब

देशातील प्राचीन २४ संरक्षित स्मारके, वास्तू गायब

नवी दिल्ली : देशातील प्राचीन २४ स्मारके व वास्तूंबद्दल माहिती भारतीय पुरातत्व खात्याकडे नसल्याची कबुली सोमवारी सरकारने लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावे

नितीश कुमार यांचा एनआरसीवरून संभ्रम
तिसरे महायुद्ध विनाशकारी असेल: सिर्गेइ लाव्हरोव्ह
मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय

नवी दिल्ली : देशातील प्राचीन २४ स्मारके व वास्तूंबद्दल माहिती भारतीय पुरातत्व खात्याकडे नसल्याची कबुली सोमवारी सरकारने लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली. भारतीय पुरातत्व खात्याच्या यादीत संरक्षित अशी ३,६९१ स्मारके आहेत, त्यातील ३२१ संरक्षित स्मारकांमध्ये अतिक्रमण झाले असून अन्य २४ स्मारकांबद्दल कोणतीही माहिती पुरातत्व खात्याकडे नाही, असे केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी सांगितले.

स्क्रोल डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार गायब झालेल्या स्मारके वा वास्तूंमध्ये अर्ध्या वास्तू वा स्मारके एकट्या उत्तर प्रदेशातील असून तेथे बौद्ध व हिंदू मंदिरांचे अवशेष मिळत नाहीत. त्याचबरोबर महाराष्ट्रात एका विशाल खडकावर शिलालेख आहे तोही सापडत नाही. आसाममध्ये १६ व्या शतकातील शेरशाह सूरची बंदूक, हरियाणात मध्ययुगीन काळातील शिलालेख, उत्तराखंडमध्ये एक मंदिर व अन्य प्राचीन अवशेष पुरातत्व खात्याला मिळत नाहीत, असे सरकारचे म्हणणे आहे.

सरकारने देशातील प्राचीन ५०० नगरांमधील ७० हजार स्मारके, वास्तू अबाधित राखण्याची एक योजना तयार केली असून हस्तिनापूर, राखीगढी, शिवसागर, धोलविरा, आदिचनल्लूर ही भारतीय इतिहासातील पाच महत्त्वाची पुरातत्व ठिकाणे विकसित केली जाणार आहेत, असे पटेल यांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: