तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात २५ टक्के वाढ

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात २५ टक्के वाढ

मुंबईः गेल्या एक-दोन वर्षांपासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक -प्राध्यापकांच्या वेतनवाढीसंदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरा

स्त्री अभ्यास केंद्रांवर संक्रांत!
एचके आर्ट्स कॉलेजच्या प्राचार्यांनी राजीनामा का दिला?
गुजरातमध्ये ६८ विद्यार्थींनींना नग्न केले

मुंबईः गेल्या एक-दोन वर्षांपासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक -प्राध्यापकांच्या वेतनवाढीसंदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष संघटनेच्या ( MUST) मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून शिक्षकांच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे.

मानधन वाढीचा शासन आदेश शनिवारी शासनाने जाहीर केला असून असून १ ऑक्टोबरपासून या वेतनवाढीची अंमलबजावणी होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष संघटनेने स्वागत केले आहे.

या पूर्वी पदवीस्तरावर काम करणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान शारीरिक शिक्षण आणि विधी महाविद्यालयातील शिक्षकांना केवळ ३०० रुपये प्रतितास एवढे तुटपुंजे मानधन मिळत होते. पुढे ते प्रतितास ५०० रुपये करण्यात आले मात्र नव्या आदेशानुसार ६२५ रुपये प्रतितास इतके मानधन मिळणार आहे.

जवळपास २५% इतकी वेतनवाढ देण्यात आली आहे. तसेच शारीरिक शिक्षण आणि विधी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर शाखेतील शिक्षकांना ७५० रुपये प्रतितास मानधन मिळणार असून प्रात्यक्षिकाच्या मानधनात देखील कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसाठी रुपये २५० तर विधी आणि शारीरिक शिक्षण शाखेसाठी रुपये ३०० प्रतितास इतकी वेतनवाढ करण्यात आली आहे.

मस्ट (MUST) संघटनेने तासिकाऐवजी कॉन्ट्रॅक्ट सेवा द्यावी आणि त्यानुसार वेतन द्यावे अशी मागणी केली होती मात्र यात तांत्रिक अडचण असल्याने, शासनाने तासिका तत्वाचे मानधन २५% वाढवून दिले आहे.

गेली दोन वर्षे ‘मस्ट’ संघटना शासनाकडे तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मागण्या संदर्भात आग्रही होती. आता या शिक्षकांना काही प्रमाणात का होईना न्याय मिळाला आहे अशी प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रा. विजय पवार यांनी दिली. आपली संघटना उर्वरित मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत राहील असे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0