महाविकास आघाडीचे ५, तर भाजपचे ५ उमेदवार विजयी

महाविकास आघाडीचे ५, तर भाजपचे ५ उमेदवार विजयी

मुंबई : शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ आणि कॉँग्रेसचा १ असे महाविकास आघाडीचे ५ उमेदवार विजयी झाले. भारतीय जनता पक्षाचे ५ उमेदवार विजयी झाले. कॉँग्रेस

उ. प्रदेश, उत्तराखंडमध्ये बसपा स्वतंत्र लढणार
स्वदेशी की परदेशी ?
बस गैरव्यवहारात गडकरी कुटुंबिय : स्वीडिश मीडियाचे वृत्त

मुंबई : शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ आणि कॉँग्रेसचा १ असे महाविकास आघाडीचे ५ उमेदवार विजयी झाले. भारतीय जनता पक्षाचे ५ उमेदवार विजयी झाले.

कॉँग्रेसच्या ४४ पैकी ४१ मते दोन्ही उमेदवारांना पडली. चंद्रकांत हंडोरे यांना २२ मते मिळाली. तर भाई जगताप यांना १९ मते मिळाली. कॉँग्रेसची ३ मते फुटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दुसऱ्या फेरीपर्यंत कॉँग्रेसचा एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. दुसऱ्या फेरीमध्ये भाई जगताप विजयी झाले आणि चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडे एकूण ५१ मते होती. मात्र राष्ट्रवादी कॉँग्रेसचे एकनाथ खडसे यांना २९ तर रामराजे निबाळकर यांना २८ मते मिळाली त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसने एकूण ५७ मते मिळविल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादी कॉँग्रेसने

शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झाले. सचिन आहीर यांना २६ तर आमरश्या पडवी, यांना २६ मते मिळाली. शिवसेनेकडे ५५ मते होती मात्र त्यांच्या उमेदवारांना ५१ मते मिळाली.

भाजपला पहिल्या पसंतीच्या २८३ पैकी १३३ मते मिळाली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची मते फुटल्याचे भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी सांगितले. भाजपचे प्रवीण दरेकर यांना २९, श्रीकांत भारतीय यांना ३०, उमा खापरे यांना २७ मते मिळाली. राम शिंदे यांना ३० मते मिळाली. दुसऱ्या फेरीमध्ये प्रसाद लाड विजयी झाले.

कॉँग्रेसची मते फुटल्याचे स्पष्ट झाल्याचे कॉँग्रेसचे विधानसभेतील नेते बाळासाहेब थोरात यांनी मान्य केले. ही वेळ आम्ही आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीची जबाबदारी मी स्वीकारत असल्याचे ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मते मिळवली होती आता १३४ मते मिळवली. आमच्या ५ व्या उमेदवाराकडे एकही मत नसताना आमचा ५ उमेदवार निवडून आला. सरकारवर अनेक लोक नाराज आहेत, हे या निवडणुकीत सिद्ध झाले. परिवर्तनाची ही नांदी आहे. “

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0