जि. प., पं. समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ६३ टक्के मतदान

जि. प., पं. समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ६३ टक्के मतदान

मुंबई: धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांतील ८४; तर त्या अंतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४१ रिक्तपदांच्या पोटनिवडणु

४ राज्ये व पुड्डूचेरी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर
गोव्यात ७८ टक्के, उत्तराखंडमध्ये ६० टक्के मतदान
ग्रामपंचायत पोटनिवडणुकाः २१ डिसें.ला मतदान

मुंबई: धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांतील ८४; तर त्या अंतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ६३ टक्के मतदान झाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या ६ जिल्हा परिषदेच्या ८५ निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या १४४ निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी धुळे जिल्हा परिषदेच्या एका आणि शिरपूर (जि. धुळे) पंचायत समितीच्या दोन; तर अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. सर्व ठिकाणी बुधवारी मतमोजणी होईल.

प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी: धुळे- ६०, नंदुरबार-६५, अकोला- ६३, वाशीम- ६५, नागपूर- ६० आणि पालघर- ६५. एकूण सरासरी- ६३.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0