२०१९मध्ये देशद्रोहाच्या ९३ प्रकरणांची नोंद

२०१९मध्ये देशद्रोहाच्या ९३ प्रकरणांची नोंद

नवी दिल्लीः २०१९मध्ये देशभरात ९३ प्रकरणात ९६ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सरकारने बुधवारी राज्यसभेत दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी

आखिर शोले ‘क्लासिक’ क्यों है भाई
कलेवर नियंत्रण हे हुकुमशाहीचं लक्षण !
म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार

नवी दिल्लीः २०१९मध्ये देशभरात ९३ प्रकरणात ९६ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सरकारने बुधवारी राज्यसभेत दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लेखी उत्तरात ही माहिती देताना २०१९मध्ये ७६ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते त्यापैकी २९ जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असे स्पष्ट केले.

देशद्रोहाचे सर्वात अधिक २२ खटले कर्नाटकात नोंद झाले असून त्यातून १८ जणांना अटक करण्यात आली आहे. आसाममध्ये १७ देशद्रोहाचे खटले नोंदवण्यात आले आहेत, त्यात २३ जणांना अटक करण्यात आली. जम्मू व काश्मीरमध्ये देशद्रोहाचे ११ खटले दाखल करून त्यात १६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून उ. प्रदेशात १० देशद्रोहाच्या खटल्यात ९ जणांना अटक करण्यात आल्याचे रेड्डी यांनी सांगितले.

देशद्रोहाचा कायदा (आयपीसी कलम १२४ अ) अधिक कठोर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत का, या प्रश्नावर उत्तर देताना रेड्डी यांनी कायद्यातल्या दुरुस्त्या या सतत होत असतात असे सांगितले.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने २०१९मध्ये देशभरात सर्वाधिक देशद्रोहाचे व यूएपीएअंतर्गत प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती प्रसिद्ध केली होती. त्यात सरकार फक्त ३ टक्के आरोपच सिद्ध करू शकले असे नमूद केले होते.

देशात २०१९मध्ये देशद्रोहाचे ९३ खटले, २०१८मध्ये ७० व २०१७मध्ये ५१ खटल्यांची नोंद झाली होती.

त्याचबरोबर २०१९मध्ये यूएपीए अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांची संख्या १,२२६, २०१८मध्ये १,१८२ व २०१७मध्ये ९०१ इतकी झाली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0