नवी दिल्ली : केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊनची मर्यादा वाढवल्याने भारतीय रेल्वेने आपल्या सर्व प्रवासी सेवा ३ मे पर्यंत स्थगित केल्या आहेत. त्याचबरो
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊनची मर्यादा वाढवल्याने भारतीय रेल्वेने आपल्या सर्व प्रवासी सेवा ३ मे पर्यंत स्थगित केल्या आहेत. त्याचबरोबर सरकारने सर्व देशी व आंतरराष्ट्रीय हवाई सेवाही ३ मे पर्यंत स्थगित केल्या आहेत. त्याचबरोबर पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वे सर्व प्रवासी रेल्वेंचे अडव्हान्स बुकिंगही बंद केले आहे. पण परिस्थिती गंभीर, आपातकालिन झाल्यास रेल्वे आपली सेवा सुरू करू शकते असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच प्रवासी आपली तिकिटे ऑनलाईनही रद्द करू शकतात, या तिकिटांचे पैसे संबंधित प्रवाशाला मिळतील, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.
विमानसेवाही ३ मे पर्यंत स्थगित
नागरी उड्डाण मंत्रालयानेही मंगळवारी सर्व देशी व आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ३ मेपर्यंत बंद राहील असे जाहीर केले आहे. हा निर्णय ३ मेच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत लागू असेल असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. लॉकडाऊन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत अशा सेवा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेता येणार नाही पण तो संपल्यानंतर विचार केला जाईल असे नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले. प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल आपण दिलगीर आहोत, त्यांना होणारा त्रास समजून घेत आहोत, असेही ते म्हणाले.
COMMENTS