मुंबई, कोलकाता, जयपूर, इंदूर, पुण्यातील परिस्थिती गंभीर

मुंबई, कोलकाता, जयपूर, इंदूर, पुण्यातील परिस्थिती गंभीर

कोविड-१९च्या संदर्भात मुंबई, पुणे, इंदूर, जयपूर, कोलकाता व प. बंगालमधील काही ठिकाणची परिस्थिती अत्यंत गंभीर असून तेथे लॉकडाऊनचे उल्लंघन होत असल्याने क

रशियाच्या स्पुटनिक लसीचे परिणाम सकारात्मकः लँसेट
कोरोना संकटात अमित शहांच्या राजकीय आरोळ्या
पालावरचा ‘कोरोना’

कोविड-१९च्या संदर्भात मुंबई, पुणे, इंदूर, जयपूर, कोलकाता व प. बंगालमधील काही ठिकाणची परिस्थिती अत्यंत गंभीर असून तेथे लॉकडाऊनचे उल्लंघन होत असल्याने कोरोना संसर्ग पसरू शकतो, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे केंद्रातील एक विशेष पथक महाराष्ट्र, मध्य प्रदेश, प. बंगाल, राजस्थानात पाठवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. हे केंद्रीय पथक या राज्यांचा तीन दिवसांचा दौरा करेल, परिस्थितीची पाहणी करेल व तसा अहवाल केंद्राला सादर करणार आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नुसार महाराष्ट्रात मुंबई, पुणे, राजस्थानात जयपूर, मध्य प्रदेशात इंदूर व प. बंगालमध्ये कोलकाता, हावडा, पूर्व मेदिनीपूर, उत्तर २४ परगणा, दार्जिलिंग, कालिमपोंग , जलपाईगुडी येथील परिस्थिती अत्यंत गंभीर असून तेथे ताबडतोब उपाय योजना करण्याची गरज आहे, असे केंद्राचे मत आहे.

दरम्यान सोमवारी देशात कोविड-१९मुळे मरणार्यांची संख्या ५४३ झाली असून संक्रमितांची संख्या १७,२६५ इतकी झाली आहे.

तर महाराष्ट्रात मुंबईमध्ये सोमवारी दिवसभरात कोरोनाचे १५५ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ९० इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत मुंबईत कोरोनाने ७ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यू १३८ झाले आहेत. मुंबईत सोमवारी कोरोनाचे ८४ रुग्ण पूर्ण बरे झाले असून आतापर्यंत ३९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

इंदूरमध्ये कोरोना मृतांची संख्या ५२

मध्य प्रदेशात इंदूर जिल्हा हा कोरोनाने सर्वाधिक प्रभावित जिल्हा झाला आहे. सोमवारी येथे तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे येथील मृतांची आकडेवारी ५२ झाली आहे. ही आकडेवारी काही दिवसांतील मृतांचे प्रमाण पाहता राष्ट्रीयस्तरावर अधिक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0