काश्मीरमध्ये २ जिल्ह्यात फोरजी सेवा सुरू

काश्मीरमध्ये २ जिल्ह्यात फोरजी सेवा सुरू

श्रीनगरः जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम गेल्या वर्षी ५ ऑगस्टला भारतीय संसदेने रद्द केले होते. त्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये वेगवान 4G मो

अयोध्येच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट बंद
अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत
संघराज्य संबंधांना आव्हान देणारे एनआयए

श्रीनगरः जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम गेल्या वर्षी ५ ऑगस्टला भारतीय संसदेने रद्द केले होते. त्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये वेगवान 4G मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. पण रविवारी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सुमारे एक वर्षानंतर जम्मूमधील उधमपूर तर काश्मीरमधील गंदेरबल जिल्ह्यात 4G मोबाइल इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. ही सेवा चाचणीपुरती असेल असे प्रशासनाने स्पष्ट केले. ही वेगवान इंटरनेट सेवा सुरू केल्यानंतर काश्मीरच्या शांतता व सुरक्षिततेला बाधा येत असेल तर या निर्णयाचा पुनर्विचारही केला जाणार आहे.

काश्मीरातील तैनात असलेल्या सर्व सुरक्षा यंत्रणांनी मंजुरी दिल्यानंतर 4G मोबाइल सेवा सुरू करण्याबाबतचे आदेश जम्मू व काश्मीर प्रशासन गृहविभागाने दिले आणि रविवारी ही सेवा दोन जिल्ह्यात सुरू करण्यात आली. उधमपूर व गंदेरबल हे दोन्ही जिल्हे जम्मू व काश्मीरमधील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत कमी संवेदनशील असून सुरक्षिततेच्या दृष्टीने 4G सेवा येथे सुरू केल्यास त्याचे काय परिणाम दिसून येतात, यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान 4G सेवा सुरू केल्याचा निर्णय म्हणजे काश्मीरात काही तरी घडले आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक व लेखक गौहार गिलानी यांनी फेसबुकवर दिली आहे. एक वर्षाने गंदेरबालमध्ये व्हीडिओ रेकॉर्ड करता येऊन तो अपलोड करून उधमपूरमध्ये पाहता येतो, असे गिलानी म्हणाले. तर हुसैनी वजाहात या नागरिकाने काश्मीरमध्ये फार चांगली घडामोड घडल्याची उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

उधमपूर व गंदेरबालमध्ये सुरू करण्यात आलेली 4G मोबाइल इंटरनेट सेवा फक्त पोस्टपेड ग्राहकांना उपलब्ध असून प्री पेड धारकांना ही सेवा मिळवण्यासाठी व्हेरिफिकेशन प्रक्रियेतून जावे लागणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0