भाजपच्या टी. राजा सिंग यांना फेसबुकवर बंदी

भाजपच्या टी. राजा सिंग यांना फेसबुकवर बंदी

नवी दिल्लीः तेलंगणमधील भाजपचे एकमेव आमदार टी. राजा सिंग यांनी फेसबुकच्या मार्गदर्शक तत्वे व नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचे खाते बंद करण्याचा निर्

महाराष्ट्रात काँग्रेसनेच काँग्रेसचा घात केला
‘भाजपच्या १२१ नेत्यांची फाईल ईडीला सोपवू’
सत्ता द्या, ५० रु.ला दारू देऊः भाजपचे आंध्रात आश्वासन

नवी दिल्लीः तेलंगणमधील भाजपचे एकमेव आमदार टी. राजा सिंग यांनी फेसबुकच्या मार्गदर्शक तत्वे व नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचे खाते बंद करण्याचा निर्णय फेसबुक इंडियाने घेतला आहे. त्यांना फेसबुकवर येण्यास बंदीही घातली आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुक इंडियाच्या एक वरिष्ठ अधिकारी आँखी दास यांनी कंपनीच्या व्यावसायिक हितासाठी व भाजपच्या प्रचाराला अप्रत्यक्ष समर्थन देत टी. राजा सिंग यांच्या धार्मिक तेढ निर्माण करणार्या मजकुरावर जाणूनबुजून दुर्लक्ष केले असे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर खळबळ माजून फेसबुकवर चोहोबाजूंनी टीका झाली होती. या टिकेनंतर संसदेच्या माहिती व तंत्रज्ञान समितीने फेसबुकच्या अधिकार्यांना चौकशीसाठी बोलावण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. तसेच दिल्लीतील आप सरकारनेही तसेच प्रयत्न सुरू केले होते. वॉल स्ट्रीट जर्नलने नंतर एक वृत्त प्रसिद्ध करून भाजपच्या विखारी प्रचाराला व मोदींच्या २०१४च्या निवडणूक प्रचाराला फेसबुकच्या आँखी दास यांची कशी थेट मदत होती याचाही पर्दाफाश केला होता.

अखेर बुधवारी द वायरला एक इमेल पाठवत फेसबुकने टी. राजा सिंग यांचे फेसबुक खाते बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे सांगितले. समाजात हिंसा व अस्थैर्य पसरवणारे सिंग यांचे फेसबुकवरील मजकूर होते, ते कंपनीच्या धोरणांविरोधात व मार्गदर्शक तत्वांविरोधात असल्याने त्यांच्या फेसबुक खात्यावर बंदी घातल्याचे फेसबुकने पाठवलेल्या इमेलमध्ये म्हटले आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार टी. राजा सिंग यांच्या नावाची ५ खाती फेसबुकवर असून त्यांचे फॉलोअर्स ३ लाखाहून अधिक होते. तसेच इन्स्टाग्रामवरही सिंग यांचा सतत वावर असे. जेव्हा द वायरने या खात्यांवर जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा या फेसबुककडून या खात्यावरचा मजकूर सध्या उपलब्ध नाही, असे सांगण्यात येत होते.

टी. राजा सिंगः माझे खाते हॅक

फेसबुकवरून गदारोळ सुरू असताना टी. राजा सिंग यांनी मात्र त्यांचे खाते २०१८मध्ये हॅक झाले होते, असा बचावाचा सूर लावला. माझी बदनामी चालवली असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. माझे सध्या एकच यूट्यूबवरचे अधिकृत खाते असून ट्विटरही आपण असतो, पण समाजात तेढ माजावी म्हणून कोणताही मजकूर आपण प्रसिद्ध केला नव्हता, असे सिंग यांचे म्हणणे होते.

द वायरला मिळालेल्या माहितीनुसार टी. राजा सिंग यांचे नाव फेसबुकने त्यांच्या काळ्या यादीत टाकले आहे. हे खाते ‘धोकादायक व्यक्तीचे व संघटनेचे’ असल्याचे फेसबुकचे म्हणणे होते. फेसबुकच्या वर्गवारीत ‘धोकादायक व्यक्ती व संघटना’ असा एक उपवर्ग असून आँखी दास या वर्गवारीत सिंग यांचे खाते जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होत्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0