सुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात

सुविधांसाठी प्रवाशांच्या खिशात हात

नवी दिल्लीः रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मिळणार्या सोयीसुविधांचा खर्च भारतीय रेल्वे, आता प्रवाशांकडून ‘यूजर चार्ज वा शुल्क’च्या माध्यमातून वसूल करणार

पाम ऑइल वादावर मलेशियाकडून साखर खरेदीचा उतारा
फ्रान्सकडून ४०० पुरातन वस्तू पाकिस्तानला परत
बिहारच्या ऊसाला नेपाळमध्ये मागणी

नवी दिल्लीः रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मिळणार्या सोयीसुविधांचा खर्च भारतीय रेल्वे, आता प्रवाशांकडून ‘यूजर चार्ज वा शुल्क’च्या माध्यमातून वसूल करणार आहे. जी रेल्वे स्थानके प्रचंड गर्दीची असतील व अशा स्थानकांचे पुनर्निर्माण करण्याची गरज असेल अशा ठिकाणी ‘यूजर चार्ज वा शुल्क’ आकारण्यात येणार आहे. हे शुल्क अत्यंत मामूली स्वरुपाचे असेल व ते देशातील सुमारे ७ हजार रेल्वे स्थानकांपैकी १०-१५ टक्के स्थानकांवर लागू करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी दिली. येत्या ५ वर्षांत वाढणार्या प्रवाशांची गर्दी पाहून ही रेल्वे स्थानके निश्चित करण्यात येतील असे यादव यांनी सांगितले.

सध्या रेल्वे क्षेत्रात खासगीकरण करण्याचे प्रयत्न व भाडेवाढ होण्याची शक्यता असताना रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

यावेळी नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी रेल्वेच्या विकासावर भर देण्याची गरज असल्याचे सांगत जपान व द. कोरियाने आपल्या देशातील रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर भर दिला होता. त्यामुळे त्यांची रेल्वेसेवा अधिक फायद्याची ठरली. आपल्याकडे रेल्वेवर असा भर दिला तर देशाच्या जीडीपीत रेल्वे १-२ टक्के वृद्धी आणू शकते, असे दावा केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0