आसामात वधुवराला धर्म, उत्पन्न घोषित करण्याची सक्ती?

आसामात वधुवराला धर्म, उत्पन्न घोषित करण्याची सक्ती?

नवी दिल्लीः विवाहाच्या एक महिना आधी वधु व वराला आपल्या धर्माचा व उत्पन्नाचा दाखला सरकारला सादर करावा लागेल अशा प्रस्तावाचा कायदा आसाममधील भाजप सरकार आ

‘एनआरसी’ : जर्मनीतील राईश नागरिकत्व कायद्यासारखा
आसाम : दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना सरकारी नोकरी नाही
रिजिजूंच्या चकमा-हाजोंग विधानावरून अरुणाचलमध्ये गदारोळ

नवी दिल्लीः विवाहाच्या एक महिना आधी वधु व वराला आपल्या धर्माचा व उत्पन्नाचा दाखला सरकारला सादर करावा लागेल अशा प्रस्तावाचा कायदा आसाममधील भाजप सरकार आणण्याच्या तयारीत आहे. देशातील अनेक भाजपशासित राज्यांनी लव जिहादसंदर्भात कायदे आणण्याचे प्रयत्न सुरू असताना आसाम सरकारने हे नवे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यातल्या सर्व धर्माच्या बहिणींचे सबलीकरण व विवाह व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न या कायद्यामागे आहेत. हा कायदा लव जिहादच्या विरोधात नाही अशी प्रतिक्रिया आसामचे मंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे.

या कायद्यात केवळ धर्म नव्हे तर वधु-वरांच्या उत्पन्नाचे स्रोत, नोकरी व व्यवसायाची माहिती, कुटुंबियांची माहिती, शिक्षण, कायमस्वरुपी पत्ता यांचीही माहिती सरकारला द्यावी लागेल. अनेकदा एकाच धर्मात लग्न झाल्यानंतर पतीचा व्यवसाय बेकायदा असल्याचे पत्नीला आढळून येते, हे गैरप्रकार टाळण्यासाठी व मुलींना लग्नाआधी मुलाची सर्व माहिती कळावी म्हणून हा कायदा आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे सरमा म्हणाले. या कायद्यात म. प्रदेश व उ. प्रदेशातील कायद्यांमधील काही तरतुदी आहेत, त्याने महिलांचे सबलीकरण होईल, असाही दावा सरमा यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: