‘लिव्ह इन रिलेशनशीप कायदेशीरच’

‘लिव्ह इन रिलेशनशीप कायदेशीरच’

नवी दिल्लीः कोणतीही सज्ञान व्यक्ती कोणाशीही लग्न अथवा लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू शकते, व तो तिला अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल पंजाब व हरयाणा उ

लाल परी आर्थिक संकटात !
रिहाना, ग्रेटाच्या एका ट्विटमुळे सरकार हादरले
भोंगे वाजले की हनुमान चालिसा म्हणाः राज ठाकरेंचे आदेश

नवी दिल्लीः कोणतीही सज्ञान व्यक्ती कोणाशीही लग्न अथवा लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू शकते, व तो तिला अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. ज्या व्यक्तीला अन्य व्यक्तीशी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहायचे असेल तर त्या नागरिकांना कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्या. सुधीर मित्तल यांच्या पीठाने हा आदेश दिला आहे.

समाजात लिव्ह इन रिलेशनशीपला मान्यता मिळत असल्याचे आपले निरीक्षण देत न्यायालयाने अशा संबंधांना कायद्यान्वये विरोध नाही व तो गुन्हाही नसल्याने अन्य नागरिकांबरोबरच असे संबंध असलेल्यांना कायद्याचे संरक्षण देणे महत्त्वाचे आहे. लिव्ह इन रिलेशनशीपमधील असलेल्या अनेक जोडप्यांनी घरातील व्यक्तींच्या विरोधात जाऊन असे संबंध प्रस्थापित केलेले असतात. अशा जोडप्यांनी आपल्या कुटुंबियांकडून संरक्षण मिळावे अशी मागणी केल्याने त्या जोडप्यांना घटनात्मक संरक्षण देणे महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

लिव्ह इन रिलेशनशीप हा विचार पाश्चिमात्य देशांमधून आला असला तरी त्याचा स्वीकार भारतीय समाजात हळुहळू केला जात आहे याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0