एल्गार परिषद प्रकरणातील ३ अन्य आरोपी कोरोनाबाधित

एल्गार परिषद प्रकरणातील ३ अन्य आरोपी कोरोनाबाधित

मुंबईः येथून नजीक तळोजा कारागृहात कैद असलेले एल्गार परिषद प्रकरणातील अन्य ३ आरोपी कोरोनाबाधित झाले आहे. या कारागृहातल्या ५७ कैद्यांची आरटी पीसीआर चाचण

गौतम नवलखा व तेलतुंबडे यांचे जामीन अर्ज फेटाळले
भीमा – कोरेगावचे ३४८ गुन्हे मागे
‘कबीर कला’च्या गोरखे, गायचोर यांना अटक

मुंबईः येथून नजीक तळोजा कारागृहात कैद असलेले एल्गार परिषद प्रकरणातील अन्य ३ आरोपी कोरोनाबाधित झाले आहे. या कारागृहातल्या ५७ कैद्यांची आरटी पीसीआर चाचणी केली असता एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी महेश राऊत, सागर गोरखे व रमेश गायचोर या तिघांना कोरोनाची लागण झाली असल्याचे दिसून आले. तर एल्गार परिषद प्रकरणातील अन्य आरोपी गौतम नवलाखा, आनंद तेलतुंबडे, रोना विल्सन, वर्नन गोन्साल्विस, सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे व अरुण फरेरा या सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. या अगोदर वरवरा राव, स्टेन स्वामी व हनी बाबू या तिघांना कोरोना झाल्याने ते उपचार घेत आहे.

वरवरा राव यांना जामीन मिळाला असून स्टेन स्वामी व हनी बाबू रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दोघांना मे महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.

अन्य एक आरोपी सुधा भारद्वाज या भायखळा येथील कारागृहात आहेत.

तळोजा कारागृहात एकूण कैदी २,९७२ असून एप्रिल व मे महिन्यात ५५६ कैद्यांची आरटी पीसीआर चाचणी झाली होती त्यातील १४ जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे.

मूळ बातमी