एक तृतीयांश शाळा-अंगणवाड्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित

एक तृतीयांश शाळा-अंगणवाड्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित

नवी दिल्लीः केंद्रीय जलसंधारण खात्याने रविवारी देशातील ६६ टक्के शाळा (६ लाख ८५ हजार), ६० टक्के अंगणवाड्या (६ लाख ८० हजार) व ६९ टक्के (२ लाख ३६ हजार) ग

अंगणवाडी सेविकांना २ हजार भाऊबीज भेट
अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा प्रोत्साहन भत्ता थेट बँक खात्यात
लॉकडाऊनमुळे अंगणवाडीसेविका आर्थिक संकटात

नवी दिल्लीः केंद्रीय जलसंधारण खात्याने रविवारी देशातील ६६ टक्के शाळा (६ लाख ८५ हजार), ६० टक्के अंगणवाड्या (६ लाख ८० हजार) व ६९ टक्के (२ लाख ३६ हजार) ग्राम पंचायती व प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत  नळातून पिण्याचे पाणी पोहोचवल्याचा दावा केला होता. या दाव्यावरूनच देशातल्या एक तृतीयांश सरकारी शाळांमध्ये व अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी पोहोचले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशात कोरोना महासाथीत हात-पाय धुण्यासंदर्भात प्रबोधन केले जात असताना प्रत्यक्षात मात्र अनेक राज्यांमधील मोठा जनसमुदाय व संस्था पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याचे सरकारच्या या आकडेवारीवरून स्पष्ट होताना दिसते.

केंद्र सरकारने असेही म्हटले आहे की, कोरोना-१९ व लॉकडाऊनची परिस्थिती असतानाही आंध्र, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, पंजाब, सिक्कीम, तामिळनाडू ही राज्ये व अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील सर्व बेटांवर नळातून पिण्याचे पोहोचवले गेले आहे. एकदा शाळा व अंगणवाड्या खुल्या झाल्या की मुलांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल व त्याने आरोग्य, स्वच्छता योजनांना गती मिळेल.

९ महिन्यांपूर्वी गांधी जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते १०० दिवसांचे जल जीवन मिशन सुरू करण्यात आले होते. या मिशननुसार देशभरातील सर्व सरकारी शाळा व अंगणवाडीत शिकणार्या मुलांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट्य होते. त्याच बरोबर २०२४पर्यंत देशातील सर्व महिला व मुलांपर्यंत नळाचे पाणी आणण्याचेही उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले होते. हे १०० दिवसांचे मिशन १० जानेवारी २०२१मध्ये संपुष्टात आले होते. त्या संदर्भात द हिंदूने जारी केलेल्या आकडेवारीनुसार १५ फेब्रुवारीपर्यंत देशातल्या केवळ ४८.५ अंगणवाडी व ५३.३ टक्के शाळांमध्ये मुलांना नळातून पिण्याचे पाणी उपलब्ध होते. या मिशनला ३१ मार्च २०२१ पर्यंत काळ वाढवून देण्यात आला होता व त्या संदर्भात राज्य व केंद्रशासित प्रदेशांना उद्दिष्ट्य गाठण्याचे निर्देश दिले होते.

पण आता ४ महिन्यानंतर सरकारने देशातल्या ५० हजार सरकारी शाळा व ४० हजार अंगणवाड्यांमध्ये नळातून पिण्याचे पाणी पोहचवले आहे. ही माहिती २५ जूनच्या अहवालातून दिसून आली आहे. उद्दिष्ट्य न गाठण्यामागे कोरोना महासाथीचे कारण सरकारकडून सांगितले जात आहे.

झारखंड व प. बंगालमधील १५ टक्क्याहून कमी सरकारी शाळांमध्ये व १० टक्क्याहून कमी अंगणवाड्यांमध्ये नळातून पिण्याचे पाणी मिळते. तर उ. प्रदेशात २० टक्क्याहून कमी सरकारी शाळा व अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी पोहचलेले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0