मेवानी यांना जामीन मंजूर पण दुसऱ्या गुन्ह्याखाली अटक

मेवानी यांना जामीन मंजूर पण दुसऱ्या गुन्ह्याखाली अटक

नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींविरोधात ट्विट केल्या प्रकरणी गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाममधील न्यायालयाने जामीन मंजूर केला. पण एका महिल

‘सीएए’ला विरोधामुळे मोदींचा आसाम दौरा रद्द
रिजिजूंच्या चकमा-हाजोंग विधानावरून अरुणाचलमध्ये गदारोळ
ट्विट प्रकरणी जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांकडून अटक

नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींविरोधात ट्विट केल्या प्रकरणी गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाममधील न्यायालयाने जामीन मंजूर केला. पण एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर मेवानी यांना आसाम पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले.

सोमवारी मेवानी यांना स्थानिक न्यायालयाने जामीन दिला पण क्रोकाझार पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचारी महिलेने मेवानी यांनी आपल्याविरोधात अपशब्द उच्चारले. मेवानींना सरळ व्यवस्थित वागण्याची समज दिली होती पण मेवानी यांनी आपल्याविरुद्ध अपशब्द उच्चारले, आपल्याकडे पाहून बोटे दाखवली, धमकी दिली व धक्का दिला असा आरोप या महिला पोलिसाने केला आहे. सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप मेवानी यांच्यावर लावण्यात आला आहे.

पण मेवानी यांच्यावर नेमके कोणते गुन्हे लावण्यात आले आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री एका ट्विट प्रकरणी आसाम पोलिसांनी जिग्नेश मेवानी यांना बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरातून अटक केली होती. मेवानी यांना नंतर अहमदाबाद येथे व त्यानंतर गुरुवारी सकाळी विमानाद्वारे आसाममध्ये नेण्यात आले होते.

मेवानी यांनी १८ एप्रिलला दोन समाजात तेढ निर्माण होईल असे ट्विट केल्याची तक्रार कोकराझार येथे पोलिसांत करण्यात आली होती. हे ट्विट नथुराम गोडसे संदर्भात होते. हे ट्विट नंतर मेवानी यांनी आपल्या अकाउंटवरून हटवलेही होते. मेवानी यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ व आयपीसी कलम १५३ अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.  मेवानी यांना कोकराझार पोलिसांनी अटक केली होती. त्यांना जामीन मिळवण्यासाठी त्यांचे वकील आनंद याज्ञिक आसाम उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

मेवानी हे वडगाम मतदारसंघातील अपक्ष आमदार असून ते गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0