ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान म्हणून लिझ ट्रस यांची नियुक्ती

ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान म्हणून लिझ ट्रस यांची नियुक्ती

ब्रिटीश परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांनी सोमवारी भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचा कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्वासाठीच्या स्पर्धेत पराभव केला आणि आता बोरिस जॉन्सननंतर त्या पंतप्रधान म्हणून त्यांची जागा घेत आहेत.

४ कोटी आधुनिक गुलामांना वॉल स्ट्रीट मुक्त करू शकतो…
जॉन्सन, पोस्ट ट्रुथ आणि बहुसांस्कृतिवाद
लोकशाहीचं मातेरं

लंडन: महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी मंगळवारी औपचारिकपणे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांची ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.

ट्रस या देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. ९६ वर्षीय राणीला भेटण्यासाठी त्या  स्कॉटलंडमधील अबर्डीनशायर येथील बालमोरल कॅसल येथील राणीच्या निवासस्थानी गेल्या होत्या. राणीने औपचारिकपणे ट्रस यांना नवीन सरकार स्थापन करण्यास सांगितले.

तत्पूर्वी, माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला राजीनामा राणीकडे सुपूर्द केला. राणी त्यांच्या वार्षिक सुट्टीसाठी त्यांच्या एबर्डीनशायर निवासस्थानी आहे.

४७ वर्षीय ट्रस पंतप्रधान म्हणून काही प्रमुख कॅबिनेट मंत्र्यांची नावे जाहीर करतील.

बुधवारी, त्या पंतप्रधान म्हणून हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सुरुवातीच्या प्रश्नांना (पीएमक्यू) उत्तरे देतील आणि लेबर पक्षाचे नेते सर कीर स्टार्मर यांना देखील सामोरे जातील.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ट्रस यांनी सोमवारी माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचा पराभव केला होता. ब्रिटीश परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांनी माजी अर्थमंत्री भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्वासाठीच्या स्पर्धेत पराभूत केले आणि आता बोरिस जॉन्सन यांची पंतप्रधानपदाची जागा त्या घेतील. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या १ लाख ७० हजारहून अधिक सदस्यांनी ऑनलाइन आणि पोस्टल मते टाकली.

८२.६ टक्के मतदान झाले, त्यात सुनक यांना ६०, ३९९ तर ट्रस यांना ८१, ३२६ मते मिळाली. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे १ लाख ७२ हजार ४३७ सदस्य मतदानासाठी पात्र होते, तर ६५४ मते नाकारण्यात आली. ट्रस यांना ५७.४ टक्के आणि सुनक यांना ४२.६ टक्के मते मिळाली.

सुनक यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “पूर्ण प्रचारात मी म्हटले आहे की कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य एक कुटुंब आहे. कठीण काळात देशाचे नेतृत्व करणाऱ्या नवीन पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मागे आम्ही आता एक म्हणून उभे आहोत.”

ट्रस यांनी विजयी घोषित झाल्यानंतर आपल्या भाषणात म्हटले की, “आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करू.’ मी दीर्घकालीन समस्यांवरही लक्ष देईन.”

ट्रस यांनी सुनक यांच्यासह विद्यमान पंतप्रधान जॉन्सन यांचेही आभार मानले. ट्रस म्हणाल्या, ‘बोरिस, तुम्ही ब्रेक्झिट केले, तुम्ही (विरोधी पक्षनेते) जर्मी कॉर्बिनचा पराभव केला, तुम्ही लसीकरण सुरू केले, तुम्ही व्लादिमीर पुतीन यांच्यासमोर ठाम राहिलात. कीव्ह ते कार्लिलेपर्यंत तुमचे कौतुक होत आहे.

“निर्णायक विजयासाठी” जॉन्सन यांनी ट्रस यांचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विटरवर ट्रस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला एकजूट राहण्याचे आवाहन केले.

जॉन्सन म्हणाले, “मला माहित आहे की सर्व परिस्थितींना तोंड देण्यासाठी, आपला पक्ष आणि आपला देश एकसंध ठेवण्याचे महान कार्य सुरू ठेवण्यासाठी त्याच्याकडे योग्य योजना आहे. आता पक्षाच्या  सर्व सदस्यांनी पूर्ण पाठिंबा देण्याची वेळ आली आहे.”

मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे यांच्यानंतर ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान असतील. ट्रस म्हणाल्या की कर कमी करण्यासाठी आणि ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांच्याकडे “धाडसी योजना” आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0