वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार तिघांना विभागून

वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार तिघांना विभागून

२०१९चा वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार डॉ. विल्यम केलिन ज्यु., डॉ. पीटर रॅटक्लीफ व डॉ. ग्रेग सेमेन्झा या तिघांना विभागून देण्यात आला आ

सिद्धार्थ वरदराजन यांना ‘डीडब्ल्यू फ्रीडम ऑफ स्पीच’ पुरस्कार
डॉ. प्रभा अत्रेंना ‘पद्मविभूषण’, पुनावालांना ‘पद्मभूषण’
भयमुक्तीचे आग्रही स्वगत

२०१९चा वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार डॉ. विल्यम केलिन ज्यु., डॉ. पीटर रॅटक्लीफ व डॉ. ग्रेग सेमेन्झा या तिघांना विभागून देण्यात आला आहे. मानवी शरीरातील पेशींमध्ये ऑक्सिजन ग्रहण करण्याची क्षमता कशी येते याचा वेध घेणारे संशोधन या तीन तज्ज्ञांनी केले आहे.

शरीरात होणारे आजार व ऑक्सिजन यांच्यात संबंध असतो. पेशींना त्यांचे काम करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि त्यामुळे आपल्याला काम करण्यासाठी किती प्रमाणात ऑक्सिजन हवा आहे याचे उपजत ज्ञान त्यांच्याकडे असते. पेशींच्या ऑक्सिजन ग्रहण करण्याच्या क्षमतेवर शरीरात नव्या लालपेशी, नव्या वाहिन्या व ग्लायकोलायसिस तयार होते. अतिउंच ठिकाणी किंवा शरीर जेव्हा अनिमियाग्रस्त असते तेव्हा ऑक्सिजनची गरज असते. अशा परिस्थितीत किडनीकडून इरिथ्रोपोइटीन हे संप्रेरक स्रवले जाते.

या सगळ्या शारीरिक क्रिया प्रतिक्रियांवर या तिघांचे संशोधन सुरू होते. या तिघांच्या संशोधनामुळे अनिमिया, कर्करोग व अन्य रोगांचा मुकाबला करण्याचा नवा मार्ग सापडल्याचा उल्लेख नोबेल समितीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात केला आहे.

मुख्य बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0