लंडनमध्ये स्वतंत्र मणिपूरची घोषणा

लंडनमध्ये स्वतंत्र मणिपूरची घोषणा

लंडन : मणिपूरचे राजा लेशेंम्बा सनाजाओबा यांचे आपण प्रतिनिधी असल्याचा दावा करत दोन असंतुष्ट नेत्यांनी भारतातून मणिपूर स्वतंत्र होत असल्याची घोषणा केली.

नागालँडमध्ये १३ नागरिक सुरक्षा दलाकडून ठार
स्वतंत्र मणिपूरची घोषणा करणाऱ्याला एनआयएकडून अटक
‘ड्रग तस्कराला सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दबाव’

लंडन : मणिपूरचे राजा लेशेंम्बा सनाजाओबा यांचे आपण प्रतिनिधी असल्याचा दावा करत दोन असंतुष्ट नेत्यांनी भारतातून मणिपूर स्वतंत्र होत असल्याची घोषणा केली. या दोन असंतुष्ट नेत्यांची नावे याम्बेन बिरेन व नरेंगबाम समरजीत असून बिरेन यांनी स्वत:ला ‘मणिपूर स्टेट कौन्सिलचे मुख्यमंत्रीपद’ व समरजीत यांनी स्वत:ला ‘मणिपूर स्टेट कौन्सिलचे संरक्षण व परराष्ट्रमंत्री’ म्हणून घोषित केले. आम्हा दोघांच्या मार्फत आता स्वतंत्र मणिपूरचा कारभार लंडन येथून हाकला जाईल असे त्यांनी घोषित केले.

या दोघांनी आपली पत्रकार परिषद मणिपूरचे राजा लेशेम्बा सनाजाओबा यांचा संदेश देण्याकरिता बोलावली असल्याचा दावा करत आजपासून मणिपूर हे एक स्वतंत्र राष्ट्र असल्याचे सांगत या राष्ट्राला पाठिंबा देण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायापुढे केले. या दोघांच्या मते तीस लाख मणिपुरी जनतेला स्वत:चे वेगळे राष्ट्र हवे आहे. आणि आमची भारत सरकारशी चर्चा करण्याचे सर्व प्रयत्न संपले आहेत. भारताकडून आम्हाला नेहमीच सापत्नभावाची व द्वेषाची भावना मिळाली असून भारताच्या सर्वोच्च न्यायालयात मणिपूरमध्ये आजपर्यंत झालेल्या हत्यांचे १५२८ प्रकरणे निलंबित आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: