राज्यात लवकरच शिवसेना आणि आघाडीचे सरकार

राज्यात लवकरच शिवसेना आणि आघाडीचे सरकार

राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली असली, तरी लवकरच शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन केले जाईल, हे आजच्या घडामोडींवरून स्प

‘एमपीएससी’च्या सदस्यांची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार
अफगाणिस्तान : जी ७ देशांची तातडीची बैठक
तळईमध्ये दरड कोसळून ३६ मृत्यू , ४० बेपत्ता

राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली असली, तरी लवकरच शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन केले जाईल, हे आजच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले.

आज सकाळी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत याना रुग्णालयामध्ये भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्या सगळ्यांनी जवळच एका ठिकाणी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. ही भेट अनौपचारिक असल्याचे सांगण्यात आले असले, तरी चर्चा सुरु झाल्या आहेत.

रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येत असल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना घरी सोडण्यात आले. रुग्नालाय्तून बाहेर येताच राऊत यांनी पुन्हा एकदा ‘महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच’, असे स्पष्ट केले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेबरोबर चर्चा सुरु झाल्याचे मान्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये किमान सामान कार्यक्रम आणि सत्ता वाटप याबाबत चर्चा सुरु असून, टी चर्चा पूर्ण झाली, की शिवसेनेबरोबर चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्याबाबत आधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा नकारात्मक दृष्टीकोन होता. पण सर्व नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांचा दृष्टीकोन बदलल्याचे चव्हाण यांनी सांगितले. शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र देण्यासाठी काँग्रेसचा निर्णय झाला होता, पण शरद पवार यांनी किमान सामान कार्यक्रम होईपर्यंत थांबावे, असे सोनिया गांधी यांना सांगितल्याने तेंव्हा पत्र गेले नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, “आम्ही वारंवार देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री असतील असे सांगत होतो तेव्हा शिवसेनेने आक्षेप का नाही घेतला? असा सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला विचारला. जनतेने युतीला जनादेश देऊनही सेनेने आमच्या बरोबर सरकार स्थापन करायला नकार दिला, असे ते म्हणाले.

शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचे ठरले नव्हते. मात्र निवडणूक निकालानंतर शिवसेना नव्या मागण्या घेऊन समोर आली, असा आरोप करून ते म्हणाले, की बंद दाराआड शिवसेनेशी काय चर्चा झाली, हे सांगणे मला प्रशस्त वाटत नाही. शिवसेनेचे केंद्रीय मंत्रीमान्दालातून बाहेर पडणे आणि आजचे अमित शहा यांचे वक्तव्य पाहता शिवसेना ‘एनडीए’तून बाहेर पडल्याचे आणि भाजप-सेना युती तुटल्याचे चित्र आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0