ही लस भारताच्या नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग आहे.
सामोआमध्ये गोवराच्या गंभीर साथीमध्ये ७० लोकांचा मृत्यू झाला असला तरीही भारतामध्ये किमान २३ लाख मुलांमध्ये या रोगासाठी लसीकरण केलेले नाही असे आढळून आले आहे.
यामुळे गोवराचे लसीकरण न झालेल्या मुलांची सर्वाधिक संख्या असलेल्या देशांमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. २४ लाख मुलांसह नायजेरिया सर्वात वरच्या स्थानी आहे.
लसीकरणाने गोवराला प्रतिबंध करणे शक्य असते, आणि हे लसीकरण भारताच्या नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग आहे. तरीही २०१८ मध्ये देशात ७०,००० गोवराचे रुग्ण आढळून आले. या वर्षी, रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून भारताद्वारे जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठवलेल्या अहवालात रुग्णांची संख्या २९,००० कळवण्यात आली.
भारतसरकारच्या डेटानुसार ३२ कोटी ४० लाख मुले आणि किशोरांना गोवर आणि रुबेला लस टोचण्यात आली आहे.
गोवरामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांची संख्या सर्वाधिक असते. जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या डेटानुसार २०१८ मध्ये मृत्यू झालेल्या १,४०,००० लोकांमध्ये या वयोगटातील मुलांची संख्या सर्वाधिक आहे.
२०१८ मध्ये जगभरात गोवराचे किमान १ कोटी रुग्ण आढळले, ज्यापैकी १ लाख चाळीस हजार जणांचा मृत्यू होतो.
नायजेरिया आणि भारतानंतर लसीकरण न झालेल्या मुलांची सर्वाधिक संख्या असलेले देश आहेत पाकिस्तान (१४ लाख), इथियोपिया (१३ लाख), इंडोनेशिया (१२ लाख) आणि फिलिपिन्स (७ लाख).
गोवराच्या लसीकरणामध्ये दोन डोस असतात, जे वयाच्या २४ महिन्यांपूर्वी दिले जातात. जागतिक आरोग्य संघटना दोन्ही डोसचे किमान प्रमाण ९५% असले पाहिजे अशी शिफारस करते. मात्र मागे पडणाऱ्या देशांमध्ये पहिला डोसही पूर्ण प्रमाणात दिला जात नाही. गोवर हा साथीचा रोग असून वेगाने पसरू शकतो. त्यामध्ये पुरळ उठण्यापासून न्यूमोनियापर्यंत विविध लक्षणे दिसू शकतात आणि अंधत्व तसेच मृत्यू होऊ शकतो.
मागच्या काही वर्षांमध्ये, “लसीकरण विरोधी चळवळ” वाढू लागल्यामुळे जगभरात गोवराचे रुग्ण आढळू लागले आहेत. अमेरिकेमध्ये जानेवारी ते मे २०१९ मध्ये गोवराचे ८८० रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी १९९४ मध्ये तिथे ९६३ रुग्ण आढळून आले होते.
COMMENTS