नवी दिल्ली : येत्या प्रजासत्ताकदिनानंतर होणाऱ्या भारतीय लष्कराच्या ‘बिटिंग द रिट्रिट’ या भव्य सोहळ्यात म. गांधींना आवडत असलेले एक पारंपरिक ख्रिश्चन गी
नवी दिल्ली : येत्या प्रजासत्ताकदिनानंतर होणाऱ्या भारतीय लष्कराच्या ‘बिटिंग द रिट्रिट’ या भव्य सोहळ्यात म. गांधींना आवडत असलेले एक पारंपरिक ख्रिश्चन गीत ‘एबाइड विद मी’ (Abide With Me) या गीताची धुन वाजवली जाणार नाही. त्या ऐवजी ‘वंदे मातरम’ या गीताची धुन वाजवली जाणार असल्याचे वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे.
१९५० सालापासून म्हणजे पहिल्या प्रजासत्ताकदिनापासून लष्कराचा ‘बिटिंग द रिट्रिट’ हा कार्यक्रम असतो. दरवर्षी या कार्यक्रमात स्कॉटिक गीतकार हेन्री फ्रान्सिस लाइटचे ‘एबाइड विद मी’ या गीताची धुन वाजवली जाते. या गीताला संगीत विल्यम हेन्री मॉँक यांनी दिले होते. पण यंदा या प्रथेला फाटा देत म. गांधींना आवडत असलेल्या ‘वंदे मातरम’ या गीताची धुन वाजवली जाणार असून ती सोहळ्याच्या अखेरीस असेल, असे लष्करातील सूत्रांनी सांगितले.
‘बिटिंग द रिट्रिट’मध्ये ३ ते ३५ अशा वेगवेगळ्या धुन लष्कराच्या बँडकडून वाजवल्या जात असतात आणि कालानुरुप या धुनमध्ये बदल केले जात असतात. या सोहळ्यात नव्या धुनही सामील केल्या गेल्या आहेत. त्याचाच हा भाग असल्याचे लष्कराचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षांत पाश्चात्य धुन बरोबर भारतीय पारंपरिक धुन समाविष्ट केल्या जात आहे.
‘बिटिंग द रिट्रिट’ हा कार्यक्रम दरवर्षी २९ जानेवारीला राजधानी नवी दिल्लीतील विजय चौकमध्ये आयोजित केला जातो. हा सोहळा प्रजासत्ताकदिनाची समाप्ती म्हणून ओळखला जातो.
मूळ बातमी
COMMENTS