‘आता चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवर’

‘आता चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवर’

नवी दिल्ली : भविष्यात पाकिस्तानशी चर्चा व्हायची असेल तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीरवर होईल असे  वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका सभेत केले.

मिझोराममध्ये आयोग – भाजप- स्थानिक पक्षात वाद
पंजाबमध्ये मनपा निवडणुकांत भाजपचा धुव्वा
‘स्वतःमध्ये बदल करण्याची काँग्रेसची इच्छा नाही’

नवी दिल्ली : भविष्यात पाकिस्तानशी चर्चा व्हायची असेल तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीरवर होईल असे  वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका सभेत केले. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने कालका येथून जनआशीर्वाद रॅली सुरू केली असून त्याचे उद्धाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी पाकिस्तानसोबत होणारी चर्चा अन्य कोणत्याही विषयावर न होता पाकव्याप्त काश्मीरवर होईल असे ते म्हणाले. पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवावे. आम्ही त्यांच्याशी का व कोणत्या मुद्द्यावर चर्चा करावी असाही सवाल त्यांनी केला.

३७० कलम रद्द केल्याने पाकिस्तान कमजोर झाला असून तो स्वत:ला वाचवण्यासाठी जगातल्या अनेक देशांचे दरवाजे ठोठावत आहे. पण त्यांना तसा प्रतिसादही कोणी देत नाही. त्यांना अमेरिकेनेही प्रतिसाद दिलेला नाही. उलट अमेरिकेने भारताशी चर्चा करण्याचा पाकिस्तानला सल्ला दिल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: