अभिजित बॅनर्जी, इस्थर डुफ्लो व मायकेल क्रेमर यांना अर्थशास्त्राचे नोबेल

अभिजित बॅनर्जी, इस्थर डुफ्लो व मायकेल क्रेमर यांना अर्थशास्त्राचे नोबेल

स्टॉकहोम : २०१९चा अर्थशास्त्राचा प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार अभिजित बॅनर्जी, इस्थर डुफ्लो व मायकेल क्रेमर या तीन अर्थतज्ज्ञांना विभागून देण्यात आला. जग

गरिबीचे अर्थशास्त्र
नोबेल पुरस्कार – मर्यादा आणि शक्यता
डुफ्लो-बॅनर्जी, नोबेल विजेता सिद्धांत

स्टॉकहोम : २०१९चा अर्थशास्त्राचा प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार अभिजित बॅनर्जी, इस्थर डुफ्लो व मायकेल क्रेमर या तीन अर्थतज्ज्ञांना विभागून देण्यात आला. जगभर पसरलेल्या गरीबीच्या उच्चाटनासाठी या तीन अर्थतज्ज्ञांचे गेल्या दोन दशकांपासून संशोधनपर प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नातून विकासात्मक अर्थशास्त्रात आमूलाग्र बदल झाले असून ही शाखा वेगाने संशोधनाच्या दृष्टीने वाढत असल्याचे गौरवोद्गगार नोबेल समितीचे काढले आहेत. या तिघा अर्थशास्त्रांनी सुचवलेले गरीबी उच्चाटनाचे मॉडेल भारतातील शाळांना फायदेशीर ठरल्याचाही मुद्दा नोबेल अकादमीने नमूद केला आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानामुळे जग आधुनिक जीवनशैलीकडे जात असले तरी आजही जगातील ७०० दशलक्षाहून अधिक लोकसंख्येचे उत्पन्न अत्यंत तुटपुंजे आहे. ही लोकसंख्या गरीबीत राहात असून दरवर्षी पाच वर्षांहून कमी वयाची सुमारे ५० लाख मुले विविध आजारांनी विनाऔषधोपचार मरण पावत आहेत तर जगातील एकूण लोकसंख्येतील अर्ध्याहून मुले लिहायला वाचायला येण्याअगोदर शाळा सोडताना आढळतात.

(जान्हवी सेन यांनी ‘द वायर’साठी अभिजित बॅनर्जी यांची २० डिसेंबर २०१७ मध्ये घेतलेली मुलाखत जशीच्या तशी इथे सादर करीत आहोत.)

या वर्षी गरीबी निर्मूलनाचा एक भाग म्हणून या मुलांना शैक्षणिक व्यवस्थेत पुन्हा सामावून घेण्यासाठी बॅनर्जी, डुफ्लो व क्रेमर या तिघांनी काही उपाय सुचवले होते. त्यांनी गरीबीला कारणीभूत असणाऱ्या विविध घटकांची फोड करून या घटकांची छोट्या छोट्या भागात विभागणी करून ते प्रश्न सोडवणाचे प्रयत्न केले. उदाहरणार्थ त्यांनी शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या वाढवली, मुलांच्या आरोग्यावर लक्ष दिले. या अशा घटकवार प्रश्नांवर काम केल्याने समस्या सुटण्यास मदत झाली, असे नोबेल समितीचे म्हणणे आहे.

१९९०मध्ये क्रेमर व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी केनियाच्या पश्चिम भागात मुलांची शैक्षणिक प्रगती सुधारण्यावर अनेक उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यानंतर क्रेमर यांच्या साथीला अभिजीत बॅनर्जी, ड्यूफ्लो आले व या तिघांनी विकासात्मक अर्थशास्त्र विकसित करण्यासाठी काही देशांमध्ये विविध प्रयोग सुरू केले. या तिघांच्या प्रयत्नांचे परिणाम प्रत्यक्ष दिसू लागले. भारतातही त्यांनी काही प्रयोग सुरू केले. त्यामुळे भारतातील ५० लाख मुलांचा शैक्षणिक स्तर सुधारला, गळतीचे प्रमाण कमी झाले व गरीबीचे प्रमाण खाली येताना दिसू लागले.

आरोग्यावर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्यानंतर त्या देशाचे आरोग्य सुधारते असे मॉडेल या तिघांनी काही देशांमध्ये राबवले होते. त्याचेही परिणाम चांगले दिसून आले होते. अखेर नोबेल समितीने मुलांचे शिक्षण व आरोग्य यामधील या तिघांचे उल्लेखनीय कार्य पाहून त्यांची नोबेल पुरस्कारासाठी निवड केली.

बॅनर्जी व डुफ्लो हे अमेरिकेतील एमआयटी तर क्रेमर हे हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. २००९मध्ये अमेरिकी महिला अर्थतज्ज्ञ एलिनॉर ऑस्ट्रॉम यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवलेल्या डुफ्लो या दुसऱ्या महिला अर्थतज्ज्ञ आहेत.

अभिजीत बॅनर्जी हे भारतीय वंशाचे असून डुफ्लो या त्यांच्या पत्नी आहेत. अभिजीत बॅनर्जी व डुफ्लो ‘अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी अॅक्शन लॅब’चे सहसंस्थापक आहेत. अभिजित बॅनर्जी यांनी १९८१मध्ये कोलकाता विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले, त्यानंतर १९८३ मध्ये जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतून एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. १९८८ मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: