नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव प्रकरणात पोलिसांना समर्पण होण्याआधी या प्रकरणातील एक आरोपी व सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी यूएपीए कायद्यावर टीका केली.
नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव प्रकरणात पोलिसांना समर्पण होण्याआधी या प्रकरणातील एक आरोपी व सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी यूएपीए कायद्यावर टीका केली. अशा कायद्याने सामाजिक न्यायाचा अवमान होतो. वास्तविक एखाद्या आरोपीवरील गुन्हे जोपर्यंत शाबित होत नाहीत तोपर्यंत तो दोषी नसतो पण यूएपीए कायद्यात आरोपी जोपर्यंत आपले निर्दोषत्व सिद्ध करू शकत नाही, तोपर्यंत दोषी असतो, असे गृहित धरले जाते, अशी नवलखा यांनी टीका केली.
नवलखा यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणात पोलिसांनी जमा केलेल्या पुराव्यांविषयी साशंकता व्यक्त केली. पोलिसांनी गोळा केलेले पुरावे शंका घेण्यासारखे आहेत व ते न्यायालयात ज्या पद्धतीने सादर केले तेही शंकास्पद आहे. यूएपीए कायद्यातील काही तरतूदी कडक आहेत पण त्यातील प्रक्रिया कडक नाही, या दोन्ही मापदंडामुळे जामीन हा केवळ अपवादात्मक राहतो तर तुरुंगवास हा अटळ असतो असे ते म्हणाले.
नवलखा यांनी लॉकडाउनमुळे एनआयएपुढे आत्मसमर्पण केले नसल्याचे स्पष्ट केले. लॉकडाऊनमुळे आपण मुंबईला पोहचू शकत नाही असे ते म्हणाले.
८ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने नवलखा यांनी एनआयएला आत्मसमर्पण करावे असे आदेश दिले होते. पण नवलखा यांनी कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयापुढे आत्मसमर्पणासाठी अधिक वेळ मागितला आहे.
मूळ बातमी
COMMENTS