‘आध्यात्मिक’ वाहिन्यांचे अर्थकारण : भाग २

‘आध्यात्मिक’ वाहिन्यांचे अर्थकारण : भाग २

अतिशय कमी नफा मिळवून देणारा व्यवसाय असूनही इतक्या मोठ्या संख्येने अध्यात्मिक वाहिन्या का सुरु झाल्या आहेत? आणि तरीही या क्षेत्रातले मोठे मासे अध्यात्मिक वाहिन्यांपासून दूर का आहेत?

पतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा
जगणं शिकवून गेलेला माणूस
तडफडणाऱ्या रुग्णांची रामदेवबाबांकडून थट्टा

हा कमी नफा देणारा व्यवसाय आहे. शिवाय या व्यावसायात ‘ना नफा ना तोटा’ पातळी गाठायलाही बराच वेळ लागतो, असेअध्यात्मिक वाहिन्याधारक म्हणतात.”आम्हाला जाहिरातीतून जवळपास काहीही मिळत नाही. ज्या काही जाहिराती मिळतात त्या ‘टेली शॉपिंग’ प्रकारातल्या असतात. त्यामुळे स्लॉट्सची विक्री हाच एकमेव पर्याय आमच्याकडे असतो.” विकोन मीडिया अँड ब्रॉडकास्टींगचे सीईओ रोहित रोहन श्रीवास्तव सांगतात. या कंपनीद्वारे कत्यायनी टीव्ही चालवला जातो आणि पूर्वी हार्व्हेस्ट टीव्हीही चालवला जायचा. (हार्व्हेस्ट टीव्ही हा ख्रिश्चन आध्यात्मिक टीव्ही होता जो आता तिरंगा टीव्ही नामक वृत्त वाहिनीत रूपांतरित झाला आहे.) अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले, “आम्ही आता आमच्या कार्यक्रमांमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत. आम्ही अलीकडे विविध धर्मनिरपेक्ष टीव्ही सीरियलसाठीचे हक्क विकत घेतले आहेत. बहुतेक वाहिन्या अध्यात्मिक गुरूंची भाषणे किंवा भक्तिगीत प्रसारित करतात. आम्हाला यापेक्षा वेगळे काहीतरी करायचे आहे. गुंतवणूकदार तसंही याकडे फायदेशीर व्यवसाय म्हणून बघत नाहीत. तोटा झाला तरीही गुंतवणूकदारांना वाहिन्या चालू ठेवायच्या असतात. पण माही यातून नफा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.”
विकोन मीडिया आणि ब्रॉडकास्टिंगने कंपनीने रजिस्ट्रार ऑफ कंपनी (आरओसी)मध्ये  दाखल केलेल्या माहितीनुसार, २०१७-१८ वर्षात ३.७६ कोटी रुपयांचे महसूल कमावला असून सुमारे ३७ लाखांचे नुकसान झाले आहे. आस्था टीव्ही आणि संस्कार टीव्हीचा दर्शक सर्वाधिक आहे. उत्तरेकडे साधना टीव्ही आणि दक्षिणेकडे भक्ती टीव्ही लोकप्रियता टिकवून आहेत. नरेंद्र चौधरी तुंमुला यांच्या रचना टेलिव्हिजन नेटवर्कच्या वतीने चालविला जाणारा भक्ती टीव्ही २००७मध्ये सुरु झाला. रचना नेटवर्कच्या वतीने तेलगू वृत्तवाहिनी एनटीव्ही आणि महिलांसाठी विनिथा टीव्ही देखील चालवला जातो.
राकेश गुप्ता यांच्या साधना ब्रॉडकास्टिंग लिमिटेडच्या वतीने साधना टीव्ही चालवला जातो. कंपनी बीएसई-सूचीबद्ध असून तीन वृत्त वाहिन्या आणि मनोरंजन वाहिनीसह ईश्वर टीव्ही ही  अध्यात्मिक वाहिनी चालवली जाते. कंपनीने २००३मध्ये साधना टीव्ही आणि २०१०मध्ये ईश्वर टीव्ही चालू केला. साधना ब्रॉडकास्टिंगने २०१७-१८ दरम्यान ५५.२ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल नोंदवली आहे आणि कंपनीच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, एक कोटीपेक्षाही अधिक नफा कमावला आहे. आरओसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, याच काळात रचना टेलिव्हिजन नेटवर्कने एकूण ६८कोटी रुपयांचा महसूल कमावला आणि ७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला.
साधना ब्रॉडकास्टिंग लिमिटेडचे ​​प्रवर्तक गौरव गुप्ता म्हणाले की, “हा अतिशय कमी नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. आमच्याकडे दहा पेक्षा जास्त टीव्ही वाहिन्या आहेत, ज्यामध्ये केवळ अध्यात्मिक वाहिन्या नाहीत तर वृत्त वाहिन्या आणि मनोरंजन वाहिन्या देखील आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या वाहिन्या असल्यामुळे जाहिरातदारांना जाहिरात स्लॉटचा गुलदस्ता आम्हाला देता येतो. ज्यामुळे आमच्या दोन अध्यात्मिक वाहिन्यांसाठी जाहिराती मिळविणे सोपे होते. पण तेच या क्षेत्रातील इतर लोक जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी संघर्ष करीत राहतात.”
उद्योगाची अर्थगणिते
हे सत्य आहे की  रामदेवबाबाचा माध्यम व्यवसाय पतंजलि आयुर्वेद लिमिटेड प्रमाणे नफा कमावून देणारानाही. त्यांच्या तीन माध्यम कंपन्यांनी एकत्रितपणे २०१७-१८ दरम्यान ८० कोटी रुपये कमावले होते. त्याच वर्षी पतंजलि आयुर्वेदने ८,१३५ कोटी रुपयांची कमाई केली. पतंजलिच्या कमाईच्या जेमतेम १ टक्के माध्यम व्यवसायाची कमाई आहे. तरीही या क्षेत्रातील निकषांनुसार रामदेवबाबाच्या माध्यम व्यवसायांनी नफाच कमावला आहे.

एकूणमहसूल (कोटीमध्ये) २०१७-१८ २०१६-१७ २०१५-१६
वेदिक ब्रॉडकास्टिंग लिमिटेड ३८.३ ४२.८ ३९.६
संस्कार इन्फो टीव्हीप्रायव्हेट लिमिटेड ३३. ५ ३२. २ २८.१
आस्था ब्रॉडकास्टिंग लिमिटेड ४.७ २.४ १.७

 

निव्वळ नफा (तोटा) (कोटीत) २०१७-१८ २०१६-१७ २०१५-१६
वेदिक ब्रॉडकास्टिंग लिमिटेड २.० ६.३ ५.७
संस्कार इन्फो टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड ८.८ ५.२ २.८
आस्था ब्रॉडकास्टिंग लिमिटेड -३.३ -०.९ -०.३

याचा नमुनाः संसार इन्फो टीव्हीने २०१७-१८ दरम्यानच्या ३३.४कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीत २६% प्रॉफिट मार्जिनने ८.७ कोटी रुपयांचा नफा कमावला. वैदिक ब्रॉडकास्टिंगने २०१६-१७ दरम्यान ४२.७कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीत १५%नफ्यासह ६.२ कोटींचा निव्वळ नफा कमावला. तथापि, आरओसीकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, पुढील वर्षांमध्ये ३८.२ कोटी रुपयांच्या उलाढालीत नफा दोन कोटी रुपयांनी कमी झाला.
नाव न लिहिण्याच्या अटीवरून एका अध्यात्मिक वाहिनीच्या मालकाने सांगितले, “आस्था टीव्ही आणि संस्कार टीव्ही यांना भरपूर नफा होतो आहे याचे एकमेव कारण पतंजलि आहे.पतंजलि ही रामदेवबाबांच्यावाहिन्यांची सर्वात मोठी जाहिरातदारकंपनीआहे आणि या चॅनलवर रामदेवबाबाचे स्वत:चे भरपूर अनुनायी आहेत. त्यांच्यासाठी ही प्रतीकात्मक कमाई आहे. कारण या वाहिन्यांतून तसे काहीच मिळत नाही फक्त पैसा फिरता ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. यात काहीही बेकायदेशीर नाही परंतू यातूनच त्यांना चांगला प्रॉफिट मार्जिन सांभाळता येतो.”
एका अध्यात्मिक वाहिनीचे पूर्वमालक आणि या क्षेत्रातील तज्ञ सांगतात, “आस्था टीव्ही आणि संस्कार टीव्हीला पाहिलेपणाचा फायदा होतो. त्यांनी सुरुवात केली असल्याने स्लॉट्स खरेदीविक्रीच्या बाजारावर त्यांचे प्रभुत्व आहे. तसेच डीटीएच सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांबरोबरही ते दरासाठी वाटाघाटी करतात. शिवाय वाटाघाटी फिसकटल्या आणि या दोन्ही वाहिन्यांशी व्यवहार झाले नाहीत तर ते डीटीएच कंपन्यांना तोट्यात नेणारे असते. त्यामुळे वाटाघाटी शक्यतो फिसकटू नयेत याकडे डीटीएच कंपन्यांचा कल असतो जे वाहिन्यांच्या पथ्यावर पडते.”
याव्यतिरिक्त, आस्था ब्रॉडकास्टिंगकडे देखील टेलिपोर्ट परवाना आहे, ज्यामुळे ते खर्चात मोठी बचत करतात. या व्यवसायातील इतर खेळाडू प्लॅनेटकास्ट मीडिया, इंडिझीन इत्यादीसारख्या कंपन्यांना टेलीपोर्ट सेवा आउटसोर्स करतात. टेलीपोर्ट परवान्यामुळे विद्यमान बँडविड्थ वापरुन कंपनी कमीतकमी १० नवीन वाहिन्या चालवू शकते.
हिंदू-धर्म अध्यात्मिक वाहिनी पलीकडे
“इतर खेळाडूंपेक्षा आस्था टीव्ही आणि संस्कार टीव्हीचेच अद्याप राज्य चालू आहे. आम्हाला त्यांच्याशी स्पर्धा करायची इच्छा देखील नाही. या बाजारपेठेत इतर खेळाडूंना कायम राखण्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध आहे, खासकरून गैर-हिंदू अध्यात्मिक वाहिन्यांसाठी..” असे आकाश जैन यांनी सांगितले. जैन २०१०पासून ‘पारस टीव्ही’ नावाची जैन धार्मिक वाहिनी चालवतात. दोन वर्षांपूर्वी जय पारस नावाच्या हिंदू धार्मिक वाहिनीचीही त्यांनी सुरुवात केली. परस टीव्ही ही सर्वात जुनी वाहिनी आहे. आणि अरिहंत टीव्ही (रामदेव यांच्या मालकीचा) आणि जिन्वंनी टीव्ही (पंकज आणि नीरज जैन यांच्या नेतृत्वाखालील सी-टीव्ही नेटवर्क मालकीचा) पेक्षाही अधिक बघितली जाणारी जैन धर्माला वाहिलेली वाहिनी आहे. अरिहंत टीव्ही, जैन धर्म वाहिनी म्हणून सुरु झाला, आणि आता गेल्या काही आठवड्यांपासून हिंदुत्व केंद्रीत अध्यात्मिक वाहिनी बनला आहे.
गैर-हिंदुत्व भक्तीवादी वाहिन्यांपैकी काही लोकप्रिय नावे म्हणजे-चेन्नईस्थित गुडन्यूज टेलिव्हिजन ग्रुप. नेहरू आणि अश्विन धार्यम ह्या वडील-मुलाच्या व्यवस्थानाअंतर्गत ही वाहिनी चालते. हा समूह चार ख्रिस्ती-केंद्रित भक्ती वाहिन्या चालवितो: सुभावार्थ (तेलगू), शुभसंदेश (हिंदी), नंबिक्कई (तमिळ) आणि गुडन्यूज (इंग्रजी). या समूहाने २०१६-१७दरम्यान १२ कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीत ५ लाख रुपयांपेक्षा अधिक नफा कमावला होता. दुसरा एक खेळाडू म्हणजे WIN वाहिनी. वर्ल्ड इस्लामिक नेटवर्क ही वाहिनी इस्लाम धर्माशी निगडित कार्यक्रम दाखवते. आरओसीकडील उपलब्ध माहितीनुसार सात वर्षापूर्वी सुरु झाल्यानंतर, या वाहिनीने २०१५-१६दरम्यान जवळजवळ दोन कोटींचा महसूल कमावला होता. आणखी एक हिंदुत्ववादी नसलेली पण लोकप्रिय वाहिनी म्हणजे बौद्ध धर्मावर आधारित भारताची पहिली धार्मिक वाहिनी – ‘भगवान बुद्ध टीव्ही’, जो अतिशय वेगाने लोकप्रिय झाला आहे. नागपूर स्थित सचिन आणि राजू मून यांच्यासह भय्याजी खैरकर यांनी २०१५मध्ये ही वाहिनी सुरु केली होती. ही वाहिनी नफा मिळवून देत असून या वाहिनीची २०१७-१८दरम्यान वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांची  आहे.
माध्यमातील मोठे मासे अजूनही दूर का?
आध्यात्मिक टीव्हीचे अवकाश निरनिराळ्या वाहिन्यांनी भरून गेलेले असताना प्रसारण व्यवसायातील जुने जाणते खेळाडू अजूनही आध्यात्मिक वाहिन्यांना स्वतःच्या पोर्टफोलिओमध्ये जोडण्यास तयार नाहीत. त्यापासून लांब आहेत. झी एंटरटेनमेंट वगळता माध्यमातील कुठल्याही मोठ्या माश्याने या वर्गात प्रवेश करण्याचा प्रयत्न केलेला नाही. झी एंटरटेनमेंटने २००३साली हिंदू धार्मिक अध्यात्मिक वाहिनीझी जागरण सुरु केली. झी सलाम ही इस्लाम अध्यात्मिक वाहिनी २०१०मध्ये सुरु केली. पण २०१४ नंतर झी सलामवर इस्लामेतर कार्यक्रम दाखवायला सुरुवात केली आणि पाठोपाठ एक वर्षांनी जागरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
“या क्षेत्रातले मोठे मासे धार्मिक वाहिन्यांच्या क्षेत्रात येत नाहीत कारण त्यांच्या मागे ‘ब्रँड’चे ओझे असते. वाहिनी चालवण्याचा त्यांचा खर्च प्रचंड असतो कारण ते महागडी यंत्रणा आणि तंत्रज्ञान वापरतात. कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्चही खूप जास्त असतात. या सगळ्या खर्चामुळे आधीच लो मार्जिन असलेल्या व्यवसायात त्यांचा नफा अधिकच घटतो. दुसरं म्हणजे वृत्त वाहिनीचे किंवा मनोरंजन वाहिनीचे फायदे आणि त्यातून मिळणारी अधिकारांची ताकद अध्यात्मिक वाहिनी देऊ शकत नाही. शिवाय वाहिनी रुजण्याची कालावधी खूप जास्त आणि नफा कमी हे गणित आहेच. त्यांच्या गुंतवणूक परताव्याच्या गणितात हे बसत नसल्याने त्यांना यात रस वाटत नाही.” आकाश जैन सांगतात.
रामदेवबाबाच्या हिंदू अध्यात्मिक वाहिन्यांना एकापेक्षा अधिक मार्गानी पतंजलिने ताकद मिळवून दिली आहे. त्याच्या एफएमसीजी विंगला अग्रगण्य मानले जाऊ शकते. प्रतिस्पर्धी वाहिन्यांना थोपवून धरण्यात त्यांना यश आले आहे. स्वतःचे प्रभुत्व अधोरेखित करत वाढ सुरु आहे. स्पर्धाच संपवून टाकल्याने अध्यात्मिक वाहिन्यांच्या संपूर्ण विभागाची मालकीच जणू त्यांच्याकडे आली आहे.
इतर वाहिन्यांनी स्वतःसाठी वेगळ्या जागा शोधल्या असल्याने सध्या तरी ते महत्वपूर्ण प्रतिस्पर्धी बनतील अशा शक्यता नाहीत.

ज्योतींद्र दुबे हे व्यापार पत्रकार आहेत.

मूळ इंग्लिश लेख येथे वाचावा.

लेखमाला समाप्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0