२०१९-२० वर्षांतील भाजपची संपत्ती ४,८४७ कोटी

२०१९-२० वर्षांतील भाजपची संपत्ती ४,८४७ कोटी

नवी दिल्लीः २०१९-२० या वर्षांत भाजपने ४८४७.७८ कोटी रु.ची संपत्ती घोषित केली आहे. त्या खालोखाल बसपाने ६९८.३३ कोटी रु. व काँग्रेसने ५८८.१६ कोटी रु.ची सं

आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम
लखीमपूर हत्याकांडः सुनियोजित कट, एसआयटीचा दावा
एकाधिकारशाहीची संसदेत स्पष्ट झलक

नवी दिल्लीः २०१९-२० या वर्षांत भाजपने ४८४७.७८ कोटी रु.ची संपत्ती घोषित केली आहे. त्या खालोखाल बसपाने ६९८.३३ कोटी रु. व काँग्रेसने ५८८.१६ कोटी रु.ची संपत्ती घोषित केली आहे. द असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर)ने राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावरचे राजकीय पक्ष यांना मिळालेल्या देणग्या व त्यांची एकूण संपत्ती यावर आपला अहवाल तयार केला आहे.

२०१९-२० या वित्तीय वर्षांत देशातल्या ७ राष्ट्रीय व ४४ प्रादेशिक राजकीय पक्षांनी आपली संपत्ती घोषित केली. ही एकूण संपत्ती अनुक्रमे ६,९८८.५७ कोटी रु. व २१२९.३८ कोटी रु. इतकी आहे.

राष्ट्रीय पक्षांमध्ये सर्वाधिक संपत्ती भाजपची (४८४७.७८ कोटी रु.) असून त्या खालोखाल बसपा (६९८.३३ कोटी रु.), काँग्रेस (५८८.१६ कोटी रु. इतकी आहे. तर प्रादेशिक पक्षांमध्ये समाजवादी पार्टी (५६३.४७ कोटी रु.)ची संपत्ती सर्वाधिक असून त्या खालोखाल टीआरएस (३०१.४७ कोटी रु.) व अण्णा द्रमुकची (२६७.६१ कोटी रु.) आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: