अफगाण शांतता चर्चेत शस्त्रसंधी, महिला हक्कांवर भर

अफगाण शांतता चर्चेत शस्त्रसंधी, महिला हक्कांवर भर

दोहाः अनेक दशके सुरू असलेल्या यादवीचा अंत व्हावा व अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने शनिवारी अफगाणिस्तान सरकार व तालिबान यांच्यात क

महिलांना संपूर्णपणे झाकून घेण्याचा तालिबानचा आदेश
तालिबानकडून पाकिस्तान सीमा बंद, भारताच्या आयातीवर परिणाम
मुल्ला बरादरकडे अफगाणिस्तानची सूत्रे जाण्याची शक्यता

दोहाः अनेक दशके सुरू असलेल्या यादवीचा अंत व्हावा व अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने शनिवारी अफगाणिस्तान सरकार व तालिबान यांच्यात कतारची राजधानी दोहा येथे शांतता चर्चा सुरू झाली. या चर्चेत अफगाणिस्तानातील राजकीय व्यवस्थेव्यतिरिक्त महिलांच्या हक्कावरही भर देण्यात येणार आहे.

अफगाणिस्तान सरकार आणि या देशातील तालिबान व अन्य दहशतवादी गटांनी एकत्र यावे व शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा सुरू करावी, यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले होते, त्यात अमेरिका अग्रस्थानी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित व्हावी, तेथे पुन्हा निवडणुका व्हाव्यात म्हणून आपला देश सर्व मदत करेल याची तयारी दाखवली होती. गेल्या आठवड्यात ९/११ घटनेला १९ वर्षे झाली, त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पईओ यांनी अफगाणिस्तानी युद्धखोर संघटनांना शांततेसाठी पुढे येण्याचे आवाहन करत पुढील आव्हानांचा सर्वांना मुकाबला करावा लागेल असे सांगितले. ते कतारची राजधानी दोहा येथे आले आहेत. अफगाणिस्तानच्या जनतेने आपली राजकीय व्यवस्था निवडण्याची वेळ आली आहे, ती त्यांनी निवडावी असे स्पष्ट करत पॉम्पईओ यांनी अफगाण जनतेच्या हक्कांचे, अधिकारांचे संरक्षण व्हावे अशी व्यवस्था या देशात यावी व कायमस्वरुपी येथे हिंसा थांबावी अशी अमेरिकेची इच्छा असल्याचे सांगितले.

अफगाणिस्तान शांतता परिषदेचे अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी, दोन्ही पक्ष सर्वच मुद्द्यांवर सहमत होणार नाहीत पण त्यांना तडजोड स्वीकारावी लागेल असे स्पष्ट केले. आम्ही लाखो अफगाणिस्तान जनतेच्या आशा-आकांक्षा घेऊन चर्चेला आलो आहोत. अफगाणिस्तानच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत, असे अब्दुल्ला म्हणाले.

तर तालिबान नेते मुल्ला बरादर अखूंद यांनी, आम्हाला अपेक्षित असलेल्या इस्लामी व्यवस्थेत अफगाणिस्तानातील सर्वच प्रकारच्या वांशिक, आदिवासी टोळ्यांचे हितसंबंधांचे रक्षण केले जाणार असून येथे कोणताही भेदभाव केला जाणार नाही. या व्यवस्थेत बंधुभाव जपला जाणार आहे, असे स्पष्ट केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: