अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ल्यात १०० हून अधिक ठार?

अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ल्यात १०० हून अधिक ठार?

काबूलः अफगाणिस्तानच्या आग्नेयकडील कुंदुझ शहरातल्या गोझार-इ-सयद अबाद मशिदीत शुक्रवारी शिया पंथीयांच्या मशिदीत एका आत्मघाती हल्लेखोराने केलेल्या बॉम्बस्

अफगाणिस्तान आता ‘इस्लामिक एमिरात ऑफ अफगाणिस्तान’
अफगाणिस्तान ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्णः तालीबान
अफगाणिस्तानातील ११० शीख भारतात येण्यास आतूर

काबूलः अफगाणिस्तानच्या आग्नेयकडील कुंदुझ शहरातल्या गोझार-इ-सयद अबाद मशिदीत शुक्रवारी शिया पंथीयांच्या मशिदीत एका आत्मघाती हल्लेखोराने केलेल्या बॉम्बस्फोटात १००हून अधिक भाविक ठार झाल्याचे वृत्त आहे. या बॉम्बस्फोटात मृतांचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्रांच्या मिशनने मृतांचा आकडा किमान १०० सांगितला आहे. तर अल-जझिराने डझनभर मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

अफगाणिस्तानात तालिबानने हातात सत्ता घेतल्यानंतर हा पहिलाच असा मोठा आत्मघाती हल्ला झाला आहे. या घटनेच्या व्हीडिओत अनेक भाविकांचे शरीर छिन्नविछिन्न अवस्थेत दिसून आले. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. पण आजपर्यंत  अफगाणिस्तानातील शिया पंथियांच्या धार्मिक कार्यक्रमात घडवलेल्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी आयसीस संघटनेने घेतलेली आहे.

शुक्रवारी स्फोट झाल्यानंतर कुंदुज प्रांतिक रुग्णालयात ३५ मृतदेह व शेकडो जखमींना आणण्यात आले होते. रुग्णालयातील सूत्रांनी जखमी व मृतांच्या आकड्यात वाढ होईल असे म्हटले आहे.

तालिबानच्या एका सूत्राने या बॉम्बस्फोटात २८ जण मृत झाल्याचे म्हटले आहे. तर तालिबानचा एक प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद यांनी ट्विटरवर शिया बंधुंच्या मशिदीत बॉम्बस्फोट होऊन आमचे अनेक सहकारी शहीद व जखमी झाल्याचे म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0