चीनकडून १० भारतीय सैनिकांची सुटका

चीनकडून १० भारतीय सैनिकांची सुटका

नवी दिल्लीः लडाखमधील गलवान खोर्यात भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत २० भारतीय सैनिक शहीद झाले होते पण या घटनेत १० भारतीय सैनिकही बेपत्ता होते,

भारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प
मुंबईत कोरोनाचे दोन संशयित, चीनमध्ये २६ मृत्यू
चीनचाच भारताला खरा धोकाः रावत

नवी दिल्लीः लडाखमधील गलवान खोर्यात भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत २० भारतीय सैनिक शहीद झाले होते पण या घटनेत १० भारतीय सैनिकही बेपत्ता होते, असा कयास होता. मात्र याला भारतीय लष्कराने पुष्टी दिली नव्हती. पण द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार गुरुवारी संध्याकाळी चीनने ताब्यात घेतलेल्या १० भारतीय सैनिकांना भारतीय लष्कराकडे सोपवले. या सैनिकांमध्ये एक लेफ्टनंट कर्नल व तीन मेजर दर्जाचे अधिकारी आहेत.

लष्करी सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार बुधवारी भारत-चीनमध्ये मेजर जनरल स्तरावर चर्चा झाली. या चर्चेत या सैनिकांची सुटका करण्यावर भर दिला गेला होता. त्यानुसार त्यांना भारतीय लष्कराकडे पुन्हा सोपवण्यात आले. या सैनिकांच्या शरीराला कोणतीही दुखापत झाली नव्हती असेही सांगण्यात आले.

महत्त्वाची बाब अशी की भारतीय लष्कराने गलवान खोर्यातील हाणामारीनंतर एकही भारतीय सैनिक बेपत्ता झालेला नाही असे म्हटले होते. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी होती.

हाणामारीत ७६ सैनिक जखमी

दरम्यान गलवान खोर्यातील हाणामारीत भारताचे ७६ सैनिक जखमी झाले असून या सर्वांवर उपचार सुरू आहेत. या सैनिकांमध्ये कोणीही गंभीर जखमी नाही. प्रत्येकाची प्रकृती स्थिर असून १८ सैनिक लेह येथील रुग्णालयात तर १५ सैनिक आपल्या सेवेवर रुजूही झाले आहेत. उर्वरित ५८ सैनिक वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते पुढील आठवड्यात आपल्या कामावर रुजू होतील असे लष्करी सूत्रांनी सांगितले.

भारतीय सैनिकांकडे शस्त्रे होती

गलवान खोर्यात चिनी सैनिकांशी हाणामारी होताना भारतीय सैनिकांकडे शस्त्रे नव्हती अशी माहिती उघडकीस आली होती. पण परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उपस्थित सर्व सैनिकांकडे शस्त्रे होती असे म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भारतीय सैनिकांकडे शस्त्रे का नव्हती असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना जयशंकर यांनी, सीमेवर ड्युटी करणार्या सैनिकांकडे शस्त्रास्त्रे असतात विशेषतः आपली चौकी सोडून जाणारे सैनिक शस्त्र बाळगत असतात. १५ जूनला गलवानमध्ये सैनिकांनी असेच केले. हाणामारीत शस्त्र न बाळगण्यासंदर्भात करार १९९६ व २००५मध्ये झाला होता व तो पाळला जात असल्याचे ट्विट त्यांनी केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: