कोरोनाचा पुनःसंक्रमणाचा धोकाः आयसीएमआर

कोरोनाचा पुनःसंक्रमणाचा धोकाः आयसीएमआर

नवी दिल्लीः कोरोनातून रुग्ण पूर्ण बरा झाला असला तरी ५ महिन्यांनंतर त्यांच्या शरीरातील अँटीबॉडीज कमी झाल्या तर त्याला पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो,

कोरोना आणि तृतीयपंथी समुदाय
‘लसीकरणावर ३५ हजार कोटी रु. कसे खर्च केले?’
करोना थकून मरावा, माणसं जिवंत रहावीत

नवी दिल्लीः कोरोनातून रुग्ण पूर्ण बरा झाला असला तरी ५ महिन्यांनंतर त्यांच्या शरीरातील अँटीबॉडीज कमी झाल्या तर त्याला पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी सांगितले.

आम्ही सध्या कोरोनाचा संसर्ग किती जणांना झाला आहे, किती जण त्यातून किती बरे झाले आहेत, याची माहिती गोळा करत असून कोरोना संसर्गानंतर पूर्ण बरे झाल्यानंतर शरीरात तयार होणार्या अँटीबॉडिज ५ ते ७ महिन्यांनी कमी होतात व त्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होऊ शकतो, अशा निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहोत, असे भार्गव म्हणाले.

ज्या व्यक्तींना ९० दिवसांनंतर पुन्हा कोरोनाची लागण होत असेल तर त्याला पुनःसंक्रमण म्हटले जाते. आम्ही अशा आकडेवारीकडे लक्ष ठेवून आहोत, त्या संदर्भातील माहिती मिळाल्यास ती पुढे ठेवण्यात येईल असे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचा हवाला देत भार्गव यांनी माहिती दिली.

कोरोना हा नवा आजार आहे, याची माहिती मर्यादित आहे. त्यामुळे त्याविषयीचे आडाखे बांधता येत नाहीत, असेही भार्गव म्हणाले.

गेल्या सप्टेंबर महिन्यात गुजरातमध्ये चार जणांना कोरोनाची पुन्हा लागण झाली होती. या चौघांना मेमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्याचबरोबर कर्नाटकात बंगळुरूतही एका महिलेला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते.

या महिलेची जुलैमध्ये कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तिच्यावर उपचार केल्याने पुढील तिच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. पण नंतर एक महिन्याने तिला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: