अग्निपथ योजना रद्द केली जाणार नाहीः लष्कर

अग्निपथ योजना रद्द केली जाणार नाहीः लष्कर

नवी दिल्लीः भारतीय लष्कराची अग्निपथ भरती योजना रद्द केली जाणार नाही असे स्पष्टपणे तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. अग्निपथ

‘अग्निपथ वरून बिहार पेटले
तुम्हाला सैन्यात यायला कुणी सांगितले? – व्ही.के. सिंग
‘अग्निपथ’ विरोधाचे लोण ७ राज्यात पसरले

नवी दिल्लीः भारतीय लष्कराची अग्निपथ भरती योजना रद्द केली जाणार नाही असे स्पष्टपणे तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. अग्निपथ योजनेला विरोध म्हणून देशातल्या बऱ्याचशा राज्यात हिंसाचार सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची एक बैठक झाली. या बैठकीचा वृत्तांत प्रसार माध्यमांपुढे स्पष्ट करताना लेफ्ट. जनरल अनिल पुरी यांनी स्पष्ट केले की, अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नाही. जे तरुण अग्निपथ योजनेला विरोधात हिंसाचारात सामील होते, त्यांना लष्करात प्रवेश दिला जाणार नाही. या योजनेतील काही तरतुदींवर तरुणांनी प्रश्न उपस्थित केले होते, त्या मध्ये बदल करण्यात आले असले तरी हे बदल कोणत्याही दबावाखाली नव्हते तर ते प्रस्तावात होते. ही योजना देशातील तरुणांसाठी फायद्याची असून भारतीय लष्करात ३० वय असलेल्या जवानांची संख्या अधिक असून जवानांचे वय हा एक चिंतेचा विषय आहे. त्यामुळे लष्करात चैतन्य व जोश आणण्यासाठी ही योजना आणण्यात आल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले. चार वर्षानंतर जवान निवृत्त होत असले तरी ही योजना निवृत्तीसाठी तयार करण्यात आलेली नाही. सैन्यातून दरवर्षी सुमारे १७,६०० जवान, अधिकारी सेवाकाल संपण्याआधीच निवृत्ती घेत असतात. अग्निवीरांना सियाचेन वा अन्य संवेदनशील भागात जो भत्ता दिला जाईल तो नियमांनुसार असून जे भत्ते सध्या कार्यरत जवानांना दिले जातात तोच कायम राहील असे पुरी यांनी स्पष्ट केले. या भत्त्यांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटुंबियाला एक कोटी रु.ची नुकसान भरपाई देण्यात येईल. येत्या ४-५ वर्षांत ५० ते ६० हजार जवानांची भरती होईल नंतर ती वाढत जाऊन ९० हजार ते १ लाख एवढी होईल. ही भरती योजना भारतीय लष्कराचा पाया मजबूत करण्यासाठी असून त्यासाठी पहिल्यांदा ४६ हजार जवानांची भरती करण्यात येईल, त्याचे विश्लेषण होईल. या अनुभवातून सैन्य अधिक तरुण बनवण्याचा प्रयत्न असेल, असे अनिल पुरी म्हणाले.

भरती दरम्यान शपथ अनिवार्य

भारतीय लष्कराचा पाया हा शिस्त आहे. तो महत्त्वाचा असल्याने येथे तोडफोड, हिंसाचाराला धारा नाही. भरतीदरम्यान आलेल्या प्रत्येक उमेदवाराला आपण हिंसाचारात सामील नव्हतो असे प्रमाणपत्र द्यावे लागेल. त्या शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. ज्यांचे नाव पोलिस फिर्यादीत असेल अशांना लष्करात प्रवेश दिला जाणार नाही असेही अनिल पुरी यांनी स्पष्ट केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: