तुम्हाला सैन्यात यायला कुणी सांगितले? – व्ही.के. सिंग

तुम्हाला सैन्यात यायला कुणी सांगितले? – व्ही.के. सिंग

इंदूर/नवी दिल्ली/कोलकाताः भारतीय लष्करातील अग्निपथ भरती योजनेवरून केंद्रातील भाजपच्या मंत्र्यांनी वादग्रस्ते विधाने करण्यास सुरूवात केली आहे. रविवारी

अग्निपथला पायलट प्रकल्प ठरवणेही राजकीयदृष्ट्या फायद्याचे!
बिटविन द डेव्हिल अँड द डीप सी
‘अग्निपथ’ विरोधाचे लोण ७ राज्यात पसरले

इंदूर/नवी दिल्ली/कोलकाताः भारतीय लष्करातील अग्निपथ भरती योजनेवरून केंद्रातील भाजपच्या मंत्र्यांनी वादग्रस्ते विधाने करण्यास सुरूवात केली आहे. रविवारी भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी आपल्या कार्यालयात सुरक्षा रक्षकाला ठेवण्याची वेळ आल्यास ते काम अग्निवीरांना प्राधान्याने देऊ असे विधान केले.

विजयवर्गीय यांनी अग्निवीरांना भाजपच्या कार्यालयात काम करण्यास ठेवू हे विधान केल्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली. यावर प्रतिक्रिया देताना विजयवर्गीय यांनी अग्निवीर निश्चितच योग्य कौशल्यप्रधान असे काम करतील. ते निवृत्तीनंतर ज्या क्षेत्रात जातील तेथे आपल्या कौशल्याचा ठसा ठेवतील, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. माझे विधान टूलकिट टोळीतल्या काही जणांनी तोडून-मोडून कर्मवीरांचा अवमान केला, देशातल्या देशप्रेमी धर्मप्रेमींबाबत टूलकिट टोळ्याचे षडयंत्र देशाला माहिती आहे, असा उलटा आरोप विजयवर्गीय यांनी केला.

त्यानंतर केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी अग्निपथ योजनेत जवानांना ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन, धोबी व केशकर्तनाचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असल्याने त्यांच्या लष्करातील चार वर्षाच्या कार्यकालानंतर हे अग्निवर या व्यवसायात सहाय्यक म्हणून काम करू शकतील असे विधान केले. अशी कौशल्ये शिकण्यात काहीच गैर नाही अशीही पुष्टी रेड्डी यांनी जोडली.

तर केंद्रीय मंत्री व माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी अग्निपथ सेवेत प्रवेश घेण्यास कुणाला सक्ती नाही. ज्याला इच्छा असेल त्याने यावे, ही स्वयंसेवी योजना आहे. भारतीय लष्कर स्वयंसेवी सैन्य आहे, हा काही रोजगार नाही. लष्करात भरती होण्याची कुणावर सक्ती नाही, ज्याला यायचे नाही त्याने येऊ नये, तुम्हाला कोणी बोलावले आहे, असे वक्तव्य केले. सिंह पुढे असेही म्हणाले की, बस, रेल्वेला आगी लावणाऱ्यांना सैन्यात आम्ही प्रवेश देणार आहोत असे कुणी सांगितले? आमच्या पात्रता पूर्ण करा, त्या केल्या तर आम्ही तुम्हाला लष्करात घेऊ असे उद्दाम विधान केले.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: