‘अग्निपथ वरून बिहार पेटले

‘अग्निपथ वरून बिहार पेटले

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या अग्निपथ या लष्कर भरती प्रक्रियेवर आता विरोध वाढू लागला आहे. या विरोधाचा केंद्रबिंदू बिहार राज्य ठरत असून गुरुवारी बिहारच्

भारतबंद संमिश्र प्रतिसाद, रेल्वे सेवेवर मात्र परिणाम
बिटविन द डेव्हिल अँड द डीप सी
अग्निपथ योजना रद्द केली जाणार नाहीः लष्कर

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या अग्निपथ या लष्कर भरती प्रक्रियेवर आता विरोध वाढू लागला आहे. या विरोधाचा केंद्रबिंदू बिहार राज्य ठरत असून गुरुवारी बिहारच्या जहानाबाद, नवादा, कैमूर, छपरा, मोतिहारी व सहरसा या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण रस्त्यावर उतरून सरकारविरोधात निदर्शने करताना दिसले. बिहारमध्ये काही जिल्ह्यात संतप्त तरुणांनी रेल्वे मार्गावर ठिय्या मारला होता. तर काही ठिकाणी रेल्वे डब्यांना आगी लागल्या. गोरखपूर-पाटलीपुत्र एक्स्प्रेसच्या काही डब्यांना आग लावल्या. जहानाबादमध्ये संतप्त तरुणांनी एनएच ८३ व एनएच ११० या महामार्गावर ठिय्या मारून वाहतूक रोखून धरली. जहानाबाद रेल्वे स्थानकात घुसून रेल्वे डब्यांवर दगडफेक केली. निदर्शकांनी पटना-गया रेल्वे मार्ग बंद केला. आरा रेल्वे स्थानकात घुसून तरुणांनी हुल्लडबाजीही केली. नवादामध्ये तरुणांनी भाजपच्या आमदार अरुणा देवी यांच्या घरावर हल्ला केला.

सहरसामध्येही तरुणांची उग्र निदर्शने दिसून आली. विद्यार्थ्यांनी क्लोन हमसफर, सुपरफास्ट व पटनाला जाणारी राजरानी सुपरफास्ट ट्रेन अनेक तास रोखून धरली. कैमुर जिल्ह्यातही रस्त्यावर तरुण उतरले होते. या जिल्ह्यातल्या भभुआ रोड स्थानकावरच्या इंटरसिटी एक्प्रेसवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली.

अग्निपथ योजनेविरोधात पश्चिम उत्तर प्रदेशातही तरुण रस्त्यावर उतरले होते. अलिगडमध्ये जागोजागी तरुणांनी निदर्शने केली. अलीगड-गाजियाबाद महामार्गावरील वाहतूक निदर्शकांनी रोखून धरली होती.

दरम्यान बिहारमध्ये अग्निपथ योजनेविरोधात लोण वाढले असताना सत्ताधारी जेडीयूने केंद्र सरकारला विद्यार्थ्यी संघटनांशी चर्चा करावी अशी विनंती केली आहे. हे प्रकरण केंद्राने गंभीरपणे घेतले पाहिजे असे नितीश कुमार सरकारमधील कॅबिनेट मंत्री बिजेंद्र यादव सांगितले.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0