केरळमध्ये विमान रनवेवरून दरीत कोसळले;१६ ठार

केरळमध्ये विमान रनवेवरून दरीत कोसळले;१६ ठार

नवी दिल्लीः एअर इंडियाचे दुबई-कोझीकोड हे १९१ प्रवाशांचे विमान शुक्रवारी रात्री पावणे आठच्या सुमारास कोझीकोडमधील करिपूर विमानतळावरच्या धावपट्टीवर घसरून

भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील वृद्धीत लक्षणीय घट
एअर इंडियाची थकबाकी चुकवावी; केंद्राचे आदेश
एअर इंडिया, भारत पेट्रोलियमची विक्री : सीतारामन

नवी दिल्लीः एअर इंडियाचे दुबई-कोझीकोड हे १९१ प्रवाशांचे विमान शुक्रवारी रात्री पावणे आठच्या सुमारास कोझीकोडमधील करिपूर विमानतळावरच्या धावपट्टीवर घसरून दरीत कोसळल्याने विमानातील १६ प्रवासी ठार झाले. मृतांमध्ये भारतीय हवाईदलातील वैमानिक कॅप्टन डी. व्ही. साठे व त्यांचे सहकारी अखिलेश कुमार यांचा मृत्यू झाला. या अपघातात विमानाचे दोन तुकडेही झाले असून विमानातील ३५ प्रवाशी जखमी झाले आहेत.

परदेशात अडकलेल्या प्रवाशांना मायदेशी आणण्यासाठी सुरू केलेल्या वंदे भारत मोहिमेंतर्गत एअर इंडियाचे आयएक्स १३४४ हे विमान दुबईहून केरळमध्ये कोझीकोडस्थित करिपूर विमानतळावर उतरले. त्यावेळी मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे धावपट्टी  निसरडी झाल्याने विमानावर नियंत्रण राहिले नाही आणि ते ४० फूट दरीत कोसळले. यात विमानाचे तुटून दोन भाग झाले. ही दुर्घटना घडल्यानंतर त्वरित मदतीची पथके घटनास्थळी रवाना झाली व मृत वा जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले.

या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केले आहे. मोदींनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून माहिती घेतली.

अशाच स्वरुपाचा अपघात २०१०मध्ये मंगळुरू विमानतळावर घडला होता, त्यात ८ प्रवासी ठार झाले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0